शिवानंद महाविद्यालयातील मराठी विभागात साने गुरुजींची पुण्यतिथी साजरी कागवाड : भारतीय स्वातंत्र्यसैनिक, सामाजवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते आणि मराठी साहित्यिक म्हणून प्रचलित असणारे पांडुरंग सदाशिव साने म्हणजेच साने गुरूजी. दुसर्यांना हसवणे सोपे असते. मात्र, दुसर्यांसाठी रडणे हे तितकेच अवघड आहे. त्यासाठी अंतकरण लागते अशी शिकवण देणार्या आणि आपणास प्रिय असणार्या साने …
Read More »जैनापूरनजीक सैनिक टाकळीच्या दाम्पत्याला डंपरची धडक, पत्नी ठार, पती जखमी
चिकोडी : डंपर व दुचाकीच्या झालेल्या अपघातात पत्नी जागीच ठार तर पती गंभीर जखमी झाला. ही घटना आज (दि. ४) दुपारी जैनापूरनजीक घडली. ज्योती राहुल शिरट्टी (वय २८, रा. सैनिक टाकळी) असे मृत पत्नीचे नाव असून राहुल शिरटी (वय ३२) असे जखमी पतीचे नाव आहे. अपघातानंतर डंपर चालक घटनास्थळावरुन पसार …
Read More »भोगावती नदीत बुडून शाळकरी मुलीचा मृत्यू
कोगनोळी : राधानगरी धरणातून भोगावती नदीतील पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्यामुळे पोहायला गेलेल्या एका शाळकरी मुलीचा बुडून मृत्यू झाला. ही दुर्घटना सोन्याची शिरोली (तालुका राधानगरी) येथे घडली. सई नामदेव चौगुले (वय 10) असे या मुलीचे नाव असून, ती गावातील प्राथमिक शाळेत तिसरीमध्ये शिकत होती. दरम्यान, नदीच्या काठावर कपडे धुण्यासाठी आलेल्या महिलांनी …
Read More »स्वाभिमानाने जगले पाहिजे : खासदार शरद पवार
बेळगाव : ब्रिटिशांच्या विरोधात वीरराणी कित्तूर चन्नम्मा या स्वाभिमानाने लढल्या. त्यांच्या स्वाभिमानामुळेच आज देशाला स्वातंत्र्य मिळाले. प्रत्येकाने लाचारी न स्वीकारता स्वाभिमानाने जगले पाहिजे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले. अंकली (तालुका चिकोडी) येथे काल मंगळवारी वीरराणी कित्तूर चन्नम्मा पुतळ्याचे अनावरण, चिदानंद कोरे सहकारी साखर कारखान्याच्या मद्यार्क निर्मिती …
Read More »बहुजन क्रांती मोर्चातर्फे रविवारी तालुकास्तरीय संमेलन
जरारखान पठाण : रॅलीचेही आयोजन निपाणी (वार्ता) : विखुरलेल्या बहुजन समाजाला एकत्रित आणण्याच्या उद्देशाने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून बहुजन क्रांती मोर्चा तर्फे रविवारी (ता.१७) डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महापुरुषांची जयंती, तालुका स्तरीय संमेलन आणि रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी निपाणी व परिसरातील बहुजन समाजातील नागरिकांनी …
Read More »पिण्याचे, सिंचनाचे पाणी पुरवण्यास सरकारचे प्राधान्य : मंत्री जे. सी. माधुस्वामी
चिक्कोडी : चिक्कोडी तालुक्यातील कोडनी गावात चिकोत्रा नदीवर बांधण्यात आलेल्या पूल वजा बंधार्याचे लघु पाटबंधारे आणि संसदीय व्यवहार मंत्री जे. सी. माधुस्वामी यांनी उद्घाटन केले. लघु पाटबंधारे आणि अंतर्जल विकास खात्यातर्फे बुदीहाळ गावात वेदगंगा नदीवर आणि चिकोत्रा नदीवर बांधण्यात आलेल्या पूल वजा बंधार्याचे रविवारी लघु पाटबंधारे आणि संसदीय व्यवहार मंत्री …
Read More »चिक्कोडीत ६ बोगस एसएसएलसी परीक्षार्थी ताब्यात
चिक्कोडी : एसएसएलसी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी आज चिक्कोडी शहरात 6 बोगस परीक्षार्थींना रंगेहात पकडण्यात आले. राज्यभरात आज सोमवारपासून एसएसएलसी परीक्षेला प्रारंभ झाला. चिक्कोडी शहरातही या परीक्षेला प्रारंभ झाला. मात्र आज पहिल्याच दिवशी चिक्कोडीतील एका केंद्रावर बहिःस्थ विद्यार्थ्यांच्या वतीने परीक्षा देण्यास आलेल्या 6 बोगस परीक्षार्थींना रंगेहात पकडण्यात आले. शिक्षण खात्याचे अधिकारी …
Read More »बोरगावमध्ये वळीवाचा अनेक कुटुंबाना फटका!
घरांचे मोठे नुकसान : उत्तम पाटील यांच्याकडून तातडीने मदतीचा हात निपाणी : शनिवारी (ता. १९) बोरगाव आणि परिसरात वादळी वाऱ्यासह वळीवाचा जोरदार पाऊस झाला. त्यामुळे अनेक घरावरील छत उडून गेल्याने सर्वसामान्य कुटुंबीयांचे मोठे नुकसान झाले तर काही कुटुंबे उघड्यावर पडली आहेत. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेची माहिती …
Read More »चोरी करण्यासाठी आले अन् स्वतःची गाडी सोडून गेले!
निपाणी चोरट्यांचा प्रताप : विद्यार्थ्यांच्या सतर्कतेमुळे टाळला अनर्थ निपाणी (वार्ता) : शहर, उपनगर आणि ग्रामीण भागात चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. गुरुवारी (ता.१७) पहाटे तीन ते चार या वेळेत प्रगतीनगरमध्ये दोन ठिकाणी सराईत चोरट्यांनी घरफोडीचा प्रयत्न केला. दरम्यान विद्यार्थ्याच्या सतर्कतेमुळे चोरीचा प्रयत्न फसला. यावेळी पोलिसांना वेळीच पाचारण करण्यात आले. चोरट्यांनी घटनास्थळीच …
Read More »कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या तयारीला लागावे
माजी आमदार काकासाहेब पाटील : निपाणीत डिजिटल मतदार नोंदणी कार्यक्रम निपाणी(वार्ता) : राज्यात निवडणूकांचे वारे वाहू लागले असून भाजपा सरकारच्या पाया खालची वाळू सरकली आहे. जनहिताच्या विरोधात सुरू असलेल्या कामकाजामुळे विद्यमान भाजपा सरकार कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे. डिसेंबर महिना अखेर गुजरात राज्याबरोबरच कर्नाटकातही निवडणूका लागण्याची शक्यत आहे. पक्षाच्या सर्व …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta