निपाणी : श्री विरुपाक्षलिंग समाधी मठाचे प.पू. प्राणलिंग स्वामीजी यांनी स्थापन केलेल्या गोरक्षण सेवा समिती यांच्या वतीने महाराष्ट्र मधून कर्नाटक मध्ये कत्तलीसाठी जाणाऱ्या दहा गोवंश यांना जीवदान देण्यात आले. पेठ वडगाव येथून कत्तलीसाठी दहा बैल घेवून जाणार आहेत, अशी माहिती गोरक्षण सेवा समितीचे प्रमुख सागर श्रीखंडे यांना मानद पशुकल्यान …
Read More »महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची अक्कोळ येथे सदिच्छा भेट
निपाणी (वार्ता) : सद्गुरु पंत महाराज बाळेकुंद्री यांचे वंशज व दत्त संस्थान ट्रस्टी अक्कोळ येथील डॉ. संजय पंतबाळेकुंद्री यांच्या निवासस्थानी महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सदिच्छा भेट देऊन पंतप्रतिमेचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला.प्रकाश आबिटकर यांची महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालक मंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल डॉ. संजय …
Read More »सीमाप्रश्नी निपाणीत २५ ला धरणे; साहित्य संमेलनात ठरावाची मागणी
निपाणी : सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी व जागृतीसाठी २५ फेब्रुवारीला येथील नरवीर तानाजी चौकात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्याचा निर्धार येथील महाराष्ट्र एकीकरण समिती, शिवसेना व मराठी भाषिक कार्यकर्त्यांनी घेतला. येथील मराठा मंडळ संस्कृतिक भवनात आज महाराष्ट्र एकीकरण समिती, शिवसेना व मराठी भाषिक कार्यकर्त्यांची बैठक झाली. बैठकीत विविध महत्त्वाचे ठराव करण्यात …
Read More »फासेपारध्यांच्या आंतरराज्य दरोडेखोर टोळीला कागलजवळ अटक
निपाणी पोलिसांची कारवाई : कोगनोळीतील दरोड्याचा उलगडा; ८ तोळे सोन्यासह १० लाखांचा मुद्देमाल; म्होरक्या फरार निपाणी : विविध चोरीच्या गुन्ह्यात कर्नाटक, महाराष्ट्र या दोन राज्यासह चार जिल्ह्यातील पोलिसांसाठी वाॅण्टेड असलेल्या आंतरराज्य फासेपारधी दरोडेखोर टोळीतील तिघांना निपाणी ग्रामीण पोलिसांनी बुधवारी अटक केली. दरम्यान या टोळीकडून ८ जानेवारी २०२३ रोजी कोगनोळी …
Read More »हद्दवाढीतील मतदारांची नावे नगरपालिकेत नोंदवा
निपाणी : येथील नगरपालिका क्षेत्राची हद्दवाढ झाली आहे. पाच ग्रामपंचायत हद्दीतील एकूण ७५ सर्व्हे नंबर नगरपालिका हद्दीत आले आहेत. त्यामुळे नगरपालिकेची सध्या असणाऱ्या ३१ प्रभागांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे समाविष्ट झालेल्या सर्व्हे नंबरमधील मतदारांची नावे ग्रामपंचायतीमधून कमी करून नगरपालिका मतदार यादीत नोंद केल्यानंतरच नगरपालिका निवडणुका घ्याव्यात, अशा मागणीचे …
Read More »निपाणी नगरपालिकेने ४ कोटी रुपयांची थकबाकी द्यावी : कंत्राटदार जैन इरिगेशनची मागणी
निपाणी (वार्ता) : येथील नगरपालिकेची २४ तास पाणी योजना देखभालीचे काम जैन इरिगेशन कंपनीला देण्यात आले आहे. एप्रिल २०२३ पर्यंतच्या कामाचे बिल पालिकेने कंत्राटदारांना दिले आहे. त्यानंतर दोन वर्षापासून कोणतीच रक्कम दिलेली नाही. तरीही पालिकेच्या आदेशानुसार अतिरिक्त पाईपलाईन टाकली आहे. पण दोन वर्षापासून गळती दुरुस्ती व इतर कामांचे बिल …
Read More »सीमाभागात रोजगार मेळावा घेण्याचे मंत्री उदय सामंत यांचे निपाणी युवा समितीला आश्वासन
निपाणी : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी, पदाधिकाऱ्यांनी मुंबई मुक्कामी महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन बेळगाव सीमा भागातील तरुणांच्या बेरोजगारी संदर्भात व्यथा मांडल्या. त्याचबरोबर बेळगाव सीमाभागात रोजगार मेळावा आयोजित करून बेळगाव सीमाभागातील तरुणांना महाराष्ट्र सरकारने रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी केली. त्यावेळी उदय सामंत …
Read More »निपाणी तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी आप्पाचीवाडीत मंगळवारी मोफत सीईटी फॉर्म
निपाणी (वार्ता) : आप्पाचीवाडी, कुरली, हदनाळ, भाटनांगनूर, सुळगाव, मतिवडेसह निपाणी तालुक्यातील बारावी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यासाठी मंगळवारी (ता.४) सकाळी दहा वाजल्यापासून आप्पाचीवाडी येथील रायगड को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मध्ये मोफत सीईटी अर्ज भरण्याची व्यवस्था केली आहे. शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजीनियरिंग तर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. …
Read More »निपाणीतील मास्क ग्रुपतर्फे ऋतिकाबेन मेहता यांचा आनंदोत्सव
निपाणी (वार्ता) : येथील कोठीवाले कॉर्नर वरील डॉ. वैशाली आणि विलास पारेख महावीर आरोग्य संघ सेवार्थ दवाखान्याचे विश्वस्त राजेंद्र मेहता यांची कन्या ऋतिकाबेन मेहतायांनी जैन धर्माची दीक्षा घेतली. त्यानिमित्त येथील मास्क ग्रुपतर्फे त्यांचा आनंद उत्सव आणि स्वागत कार्यक्रम पार पडला. यापुढील मुख्य कार्यक्रम रविवारी (२५ मे) दीक्षाविधी गुजरातमधील संखेश्वरपुरम …
Read More »निपाणीतील युवती घेणार संन्यास
प्रकाश शाह; ५० वर्षानंतर पहिली घटना निपाणी (वार्ता) : येथील कोठीवाले कॉर्नर वरील डॉ. वैशाली आणि विलास पारेख महावीर आरोग्य संघ सेवार्थ दवाखान्याचे विश्वस्त राजेंद्र मेहता यांची कन्या ऋतिकाबेन मेहता (वय २३) यांनी जैन धर्माची दीक्षा घेऊन संन्याशी राहण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी रविवारी (२५ मे ) त्यांचा दीक्षाविधी …
Read More »