Sunday , September 20 2026
Breaking News

निपाणी

हरतालिका, गणेश चतुर्थी एकाच दिवशी : तब्बल २६ वर्षांनंतर योग; पंचांगमधील माहिती

  निपाणी (वार्ता) : यंदा हरतालिका आणि श्री गणेश चतुर्थी एकाच दिवशी म्हणजे सोमवारी (ता. १४ सप्टेंबर) आले आहेत. तब्बल २६ वर्षांनंतर असा योग जुळून आल्याची माहिती पौरोहित्यांनी दिली. यापूर्वी १९९६ आणि २००० मध्ये सुद्धा एकाच दिवशी हे दोन्ही सण आले होते. यावेळी हे सण एकाच दिवशी आल्याने आणि तिथीच्या …

Read More »

हजारांचा दंड भरण्याऐवजी हेल्मेट घ्या; निपाणी शहरात विना हेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई

  निपाणी (वार्ता) : निपाणी शहर पोलिसातर्फे हेल्मेट सक्ती केली आहे. पोलिस आयुक्तांच्या आवाहनानंतरही प्रतिसाद न मिळाल्याने पोलिसांनीथेट दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलिसांनी चार दिवसात ४३ दुचाकीस्वारांवर १ हजार हजार रुपयांचा दंड ठोठावला. त्यापैकी २२ हजार रुपयांचा दंड जागीच वसूल केला. आता यापुढे दंड भरण्याऐवजी या पैशांत हेल्मेट खरेदी …

Read More »

बोरगावमधील विकासकामांना मंजुरी देण्यासाठी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना निवेदन

  निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील विविध प्रलंबित विकासकामांना मंजुरी देऊन ती तात्काळ मार्गी लावावीत, अशा मागणीचे निवेदन माजी जिल्हा पंचायत सदस्य आणि चिक्कोडी जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अण्णासाहेब हवले यांनी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना दिले. मंत्री सतीश जारकीहोळी बोरगाव येथे आले असता हावले यांनी त्यांची भेट घेऊन विविध विकासकामांबाबत …

Read More »

निपाणीतील आरोग्य शिबिरास शहरासह परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

  निपाणी (वार्ता) : महागाव येथील संत गजानन महाराज हॉस्पिटल व निपाणी ‌येथील माजी जनसेवक जुबेर बागवान, माजी जस्मिन जुबेर बागवान माजी नगरसेविका यांच्या संयुक्त विद्यमानाने रविवारी घेण्यात आलेल्या मोफत उपचार शिबिरस शहर व परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रारंभी व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. शिबिरात जनरल चेकअप औषधसह …

Read More »

डीजेमुक्त गणेशोत्सव अन् ‘एक गाव एक गणपती’वर भर

  जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्तांचा संकल्प; मंडळ पोलीस निरीक्षक तळवार यांची माहिती निपाणी (वार्ता) : यंदाचा गणेशोत्सव गतवर्षीप्रमाणेच डीजेमुक्त व्हावा, यासाठी जिल्हा पोलिस पोलीस प्रमुख, चिक्कोडी जिल्हा पोलीस उपाधीक्षकांनी शांतता कमिटीच्या बैठका बोलावल्या आहेत. यावेळी डॉल्बी, डी.जे. वाले, गणेश मंडळाचे पदाधिकारी देखील उपस्थित असणार आहेत. तत्पूर्वी, शहरा आणि ग्रामीणमधील पोलिस ठाण्याच्या …

Read More »

जैन समाजासाठी स्वतंत्र विकास महामंडळ स्थापना करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन

  निपाणी (वार्ता) : जैन समाजासाठी स्वतंत्र विकास महामंडळ स्थापन करावे, ही समाजाची अनेक वर्षांची मागणी आहे. या पार्श्वभूमीवर बेंगळुरू येथे जैन समाजाचे भट्टारक स्वामीजी आणि प्रमुख नेत्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची भेट घेऊन या बाबत निवेदन देऊन चर्चा केली. या प्रसंगी राष्ट्रसंत आचार्य श्री १०८ गुणधरनंदी महाराज …

Read More »

आडी मल्लिकार्जुन डोंगरावर शिवलिंगाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी; शिवलिंगाच्या पूजेससह हर हर महादेवाचा गजर

    निपाणी (वार्ता) : आडी (तालुका निपाणी) येथील संजीवनगिरी वरीलश्री मल्लिकार्जुन देवाची यात्रा श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी भरत असते. आज श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी हजारो भाविकांनी श्री मल्लिकार्जुन शिवलिंगाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांची गर्दी झाली होती. भाविकांच्या अलोट गर्दीत, हर हर महादेवाच्या गजरात, भक्तिमय वातावरणात श्रावण तिसऱ्या सोमवारची यात्रा पार …

Read More »

बोरगाव-घोसरवाड सीमाभागातील दूधगंगा नदीवर नवीन बंधारासाठी पालकमंत्र्यांना निवेदन

  निपाणी (वार्ता) : बोरगाव-घोसरवाड सीमाभागातील दूधगंगा नदीवर असलेले जुने धरण नादुरुस्त झाल्याने त्याचा फटका बोरगाव परिसरातील शेतकरी आणि नागरिकांना बसत आहे. पावसाळ्यासह उन्हाळ्यात काळम्मावाडी धरणातून नदीला सोडण्यात येणारे पाणी बोरगाव परिसरात पुरेशा प्रमाणात साठून न राहता महाराष्ट्रातील घोसरवाडच्या दिशेने वाहून जाते. परिणामी काही दिवसांतच नदीपात्र कोरडे पडून शेतीसह बोरगाव …

Read More »

पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक रात्री अपरात्री; नागरिक झोपेत अन् पाणी गटारीत

    निपाणी (वार्ता) : निपाणी शहरातील काही भागांत पाणीपुरवठा विभागाकडून रात्री उशिरा किंवा अपरात्री पाणीपुरवठा सुरू केला जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. दिवसभर कष्ट करून थकलेल्या नागरिकांना पाणी भरण्यासाठी रात्री जागवत ठेवण्यामागील कारण काय? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. रात्री नागरिक झोपेत असल्याने पुरवठा करण्यात …

Read More »

अण्णाभाऊ साठेंचे लेखणीच्या माध्यमातून समाज प्रबोधन : पालकमंत्री सतीश जारकीहोळी

  कर्नाटक-महाराष्ट्रातील मान्यवरांची उपस्थिती निपाणी (वार्ता) : मातंग समाजासह तळागाळातील‌ बहुजन समाजातील गरीब, वंचित जनतेसाठी अण्णाभाऊ साठे यांचे कार्य प्रेरणादायी आहे. स्वतः कमी शिक्षित असूनही लेखणीच्या माध्यमातून त्यांनी समाजप्रबोधनाचे कार्य केले. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेताना समाजाने मानसिक गुलामगिरीच्या चौकटीतून बाहेर पडण्याची गरज आहे. समाजातील लहान-सहान कामांमध्येच आयुष्य न घालवता …

Read More »