कागल पोलिसांची कारवाई; एक ताब्यात निपाणी : कत्तलीसाठी चार दिवस व एक आठवडे वयाची १८ गायींची वासरे व त्याच वयाची म्हशींची ३४ रेडके बेकायदेशीररीत्या टेम्पो गोठ्यात ठेवली आहेत, अशी माहिती गोरक्षण सेवा समिती निपाणीचे प्रमुख सागर श्रीखंडे यांना मिळाली. यावेळी सागर श्रीखंडे यांनी कागल पोलीस यांच्या मदतीने या वासरांची …
Read More »शिवापुरवाडी येथे शॉर्टसर्किटने आग लागून ६ एकरातील ऊसाचे नुकसान
निपाणी (वार्ता) : ऊसाच्या शेतामध्ये लोंबकळणाऱ्या विद्युत वाहिन्यांचे घर्षण होऊन शिवापुर वाडी येथील ऊसाला आग लागली. त्यामध्ये सहा एकरातील ऊस जळून खाक झाला. परिसरातील शेतकऱ्यांनी सतर्कता दाखवून पुढील काही सयामधील ऊस तोडून टाकल्याने मोठा अनर्थ टळला. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, शिवापूरवाडी येथे जोमा, कुरणे, बन्ने, चव्हाण, खोत यांच्यासह …
Read More »काळ्या दिनी एकजूट दाखवा कार्यकर्त्यांची बैठक : महाराष्ट्र एकीकरण समितीचे आवाहन
निपाणी : १ नोव्हेंबरला निपाणीसह सीमाभागात काळा दिन पाळण्याची परंपरा आहे. निपाणी तालुक्यात मराठी भाषिकांची संख्या मोठी आहे. यामुळे काळ्या दिनी एक दिवस मराठी भाषिकांनी एकजूट दाखविण्याचे आवाहन निपाणी तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती व महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने केले आहे. त्यासाठी निपाणी तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती व महाराष्ट्र एकीकरण …
Read More »ऊस, सोयाबीन दरासह शेतकऱ्यांच्या समस्यांबबाबत सदाभाऊ खोत यांच्याशी चर्चा
निपाणी (वार्ता) : माजी मंत्री व विधान परिषद सदस्य सदाभाऊ खोत यांनी कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. त्यानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ऊस, सोयाबीन दरासह शेतकऱ्यांच्या विविध समस्या बाबत चर्चा करण्यात आली. यंदाच्या हंगामात महाराष्ट्रातील कारखान्या प्रमाणे कर्नाटकातील साखर कारखान्यांनी दर …
Read More »बेडकिहाळ दसरा महोत्सवात श्रीनय बाडकरची हॅट्ट्रिक
निपाणी : बेडकिहाळ दसरा महोत्सवामध्ये स्वर्गीय श्री. अशोक टी. नारे एजुकेशन अँड सोशल वेल्फेअर फाऊंडेशन यांच्या वतीने दरवर्षी वेगवेगळ्या गटात चित्रकला स्पर्धा राबविल्या जातात. या स्पर्धेत निपाणीचा श्रीनय बाडकर २०२२ मध्ये प्रथम, २०२३ मध्ये प्रथम, आणि या वर्षी २०२४ मध्ये तृतीय क्रमांक घेऊन आपले स्थान विजेत्यांच्या रांगेत कायम ठेऊन …
Read More »गणेशोत्सवातील खर्चाला फाटा देऊन मूकबधीर शाळेला साऊंड सिस्टिमची भेट
निपाणी (वार्ता) : येथील आर्केडिया गणेशोत्सव मंडळातर्फे नितिनकुमार कदम मूकबधीर निवासी विद्यालयातील दिव्यांग मुलांसाठी साउंड सिस्टिमची भेट देण्यात आली. जहाजावर जीवन जगणारे लोक आणि त्यांनी दिव्यांग मुलांप्रती असणारा प्रेम जिव्हाळा या भेट वस्तुतून दिसून आला. मुख्याध्यापिका पंकजा कदम यांनी स्वागत केले. पर्यावरणप्रेमी शिक्षक नामदेव चौगुले यांनी, प्रत्येक व्यक्तीने समजभान …
Read More »ऊसाला योग्य दरासाठी शेतकऱ्यांनी एकत्र यावे
राजू पोवार; चांद शिरदवाडमध्ये जागृती मेळावा निपाणी (वार्ता) : दरवर्षी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना विविध संकटांचा सामना करावा लागत आहे. तर कारखानदाराकडूनही ऊसाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी कर्जाच्या विळख्यात सापडत आहे. त्यामुळे ऊसाला खर्चाच्या तुलनेत दर मिळाला पाहिजे. त्यासाठी ऊस दरासाठी जागृत होऊन सर्व शेतकऱ्यांनी जात पात -पक्ष विसरून …
Read More »बाळूमामा व बालाजीनगरातील प्लॉट विक्रीस बंदी
निपाणी : निपाणी मुरगूड रस्त्यानजीक असणाऱ्या बाळूमामा नगर व बालाजी नगर मधील रहिवाशांना मूलभूत सुविधा न दिल्यामुळे या दोन नगरा मधील प्लॉट विक्री करण्यास उपजिल्हाधिकाऱ्यांनी मनाई केली आहे. तसे पत्र चिकोडीच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी निपाणीच्या उपनिबंधकांना दिले आहे. बाळूमामा नगर व बालाजी नगर मधील रहिवाशांना गेल्या अकरा वर्षापासून मूलभूत सुविधांपासून वंचित …
Read More »उरुसातील मानाच्या फकिरांची रवानगी
कमिटी पदाधिकारी, मानकऱ्यांची उपस्थिती; बिदागीचे वितरण निपाणी (वार्ता) : सर्वधर्मियांच्या ऐक्याचे प्रतीक संत बाबामहाराज चव्हाण प्रस्थापित महान अवलिया हजरत पिरानेपीर दस्तगीर साहेब ऊरूसानिमीत्त विविध ठिकांणाहून दर्गाह मंडपात दाखल झालेल्या मानाच्या फकिरांची गुरुवारी (ता.१७) रवानगी झाली. परंपरेप्रमाणे चव्हाण वारसांच्या हस्ते भंडारखान्याचे साहित्य सुपूर्द करण्यात आले. उरूस कमिटी अध्यक्ष, नगरसेवक बाळासाहेब …
Read More »निपाणी उरुसानिमित्त दर्गाहमध्ये नैवेद्य दाखविण्यासह दर्शनासाठी भाविकांची गर्दी
निपाणी (वार्ता) : येथील संत बाबा महाराज चव्हाण प्रस्थापित हजरत पिरानेपीर दस्तगीर साहेब यांच्या उरुसाला दोन दिवसापासून प्रारंभ झाला आहे. सोमवारी (ता.१४) संदल बेडीचा उरुस पार पडला. मंगळवारी (ता.१५) भर उरूस झाला. त्यानिमित्त नैवेद्य अर्पण करण्यासह दर्शनासाठी भाविकांनी दिवसभर गर्दी केली होती. फकीर आणि मानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दर्गाह …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta