निपाणी (वार्ता) : गेल्या तीन-चार दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे येथील बस स्थानकावर पडलेल्या खड्ड्यामध्ये पाणी साचून त्याच्या आकारात वाढ झाली आहे. त्यामुळे चालक, वाहकासह प्रवाशांची गैरसोय होत आहे. दरवर्षी पडणाऱ्या खड्ड्यामुळे प्रवाशातून संताप व्यक्त होत आहे. याशिवाय स्थानकातील सार्वजनिक स्वच्छतागृह जवळ पाणी साठल्याने प्रवाशांना ये -जा करणे कठीण झाले …
Read More »दमदार पावसामुळे यमगर्णी, वेदगंगेचे पाणी पात्रबाहेर
कोकण भागातील पावसाने पातळी वाढली; विद्युत मोटारी काढण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ निपाणी (वार्ता) : दोन दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे वेदगंगा आणि दूधगंगा नदीच्या पाणी पातळीत गेल्या दोन दिवसापासून वाढ झाली आहे. त्यामुळे वेदगंगेचे पाणी पात्रा बाहेर पडले असून गवताचे गड्डे पाण्याखाली जाण्याच्या मार्गावर आहेत. तर नदीकाठच्या विद्युत मोटारी काढण्यासाठी ग्रामपंचायत …
Read More »पृथ्वी सूर्यापासून सोमवारी जाणार सर्वाधिक दूर
‘अपसूर्य’ स्थितीचा अनुभव; डोळ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घ्या निपाणी (वार्ता) : पृथ्वीची सूर्याभोवतीची कक्षा पूर्णपणे गोल नसून ती लंबवर्तुळाकार (इलिप्टिकल) असल्यामुळे पृथ्वी आणि सूर्या मधील अंतर वर्षभरात कमी-अधिक होत असते. साधारणपणे ३ जानेवारीच्या सुमारास हे अंतर सर्वात कमी असते. या स्थितीला उपसूर्य (पेरिहेलियन) असे म्हणतात. त्यानंतर हे अंतर वाढत जाऊन …
Read More »निपाणी नगरपालिका कर्मचारी संघटना अध्यक्षपदी लहु मधाळे, उपाध्यक्षपदी विजय कुरंगी यांची निवड
निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्य नगरसेवा कर्मचारी संघाच्या अंतर्गत येणाऱ्या येथील नगरपालिका कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी नगरपालिकेतील प्रथम दर्जा सहाय्यक लहू मधाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी विजय कुरंगी, सचिवपदी राहुल कदम तर खजिनदारपदी नगरपालिकेची लेखा अधीक्षक नागेंद्र बहाद्दुरी यांची निवड करण्यात आली. निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा नगरपालिका आयुक्त गणपती …
Read More »विद्यामंदिरची निपाणीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद
दहावी परीक्षेत इंग्रजी विषयात ९ गुणवंतांचा विक्रम; भूमी वात्सल्य फाउंडेशनतर्फे पारितोषिके निपाणी (वार्ता) : विद्यामंदिर निपाणी शाळेच्या सन १९४४ पासूनच्या इतिहासात प्रथमच दहावी परीक्षेत इंग्रजी विषयात तब्बल नऊ विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करून नवा इतिहास रचला. या ऐतिहासिक यशाचा गौरव करण्यासाठी “भूमी वात्सल्य” फाउंडेशनतर्फे येथील साई चैतन्य लेटेक्स कॉलनीत …
Read More »मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थी प्रतिनिधींपदी लोकेश मुगळे याची निवड
निपाणी (वार्ता) : बेळगाव मराठा मंडळ संचालित येथील मॉडर्न इंग्लिश मेडियम स्कूल मध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२७ सालची विद्यार्थी प्रतिनिधी निवडणूक पार पडली. यामध्ये विद्यार्थ्यांनी प्रतिनिधी म्हणून आपली उमेदवारी जाहीर केली होती. यामध्ये विद्यार्थी व शिक्षकांनी आपला निवडणुकीचा हक्क बजावला. मुख्याध्यापिका स्नेहा घाटगे यांनी उद्घाटन करून आपला मतदान हक्क बजावला. …
Read More »बेलेवाडी काळम्माचा हरित संकल्प गायरान ते हिरवेगार स्वप्न; राणेवाडी मार्गाच्या दुतर्फासह गायरानवर वृक्षारोपण
निपाणी (वार्ता) : वाढत्या तापमानाने, अनियमित पावसाने आणि झपाट्याने कमी होत चाललेल्या हरित क्षेत्राने जगासमोर गंभीर पर्यावरणीय संकट उभे केले आहे. अशा परिस्थितीत बेलेवाडी काळम्मा ग्रामस्थांनी कृतीतून पर्यावरण संवर्धनाचा आदर्श घालून दिला आहे. गावातील रानेवाडी रस्त्याकडील गायरान जमिनीवर तसेच रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करून “हरित गाव, समृद्ध गाव” या संकल्पनेला …
Read More »हिटणी येथील सरकारी मराठी शाळेतील शिक्षकांच्या बदलीची मागणी; अन्यथा ३ ऑगस्टपासून बेमुदत उपोषणाचा इशारा
हुक्केरी : हुक्केरी तालुक्यातील हिटणी येथील सरकारी प्राथमिक मराठी मुलांच्या शाळेतील शिक्षणाची घसरलेली गुणवत्ता, शिक्षकांची कथित बेजबाबदार वर्तणूक आणि विद्यार्थ्यांचे होत असलेले शैक्षणिक नुकसान याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत एका ग्रामस्थाने गट शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे. शाळेतील सर्व शिक्षकांची बदली करून त्यांच्या जागी कर्तव्यनिष्ठ शिक्षकांची नियुक्ती करावी, अन्यथा ३ …
Read More »अर्जुननगर मधील मोहनलाल दोशी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती परीक्षेत यशाचा डंका
निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता. कागल) येथील मोहनलाल दोशी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी 2025-26च्या शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश मिळवून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत जान्हवी वडगुले हिने राज्यात सहावा तर तालुक्यात पहिला येण्याचा मान मिळवला आहे. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी)मध्ये तब्बल 21 विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र …
Read More »घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ६१९ घरांचे हस्तांतरण करा, अन्यथा आंदोलनाची तयारी : विलास गाडीवड्डर
निपाणी (वार्ता) : सत्ता आणि हाती मंत्रिपद असूनही आमदार शशिकला जोल्ले यांना सर्वसामान्यांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण करता आले नाही. त्यांना केवळ खोटे अश्रू दाखवून गरीबांचा राजकारण आणि त्यांच्या मतांसाठी वापर करावयाचा असल्याचे दिसून येत आहे. त्यांना खरोखरोखरच आपल्या नव्हे, तर गरीबांच्या स्वप्नाची काळजी असेल तर त्यांनी त्यांच्या अट्टाहासाप्रमाणे ६०० …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta