Sunday , August 16 2026
Breaking News

निपाणीतील महादेव गल्लीतील महादेव मंदिरात श्रावणानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील पुरातन महादेव मंदिरातील श्री महादेव जप मंडळ, निलांबिका महिला बळग, महादेव गल्लीतर्फे श्रावण महिन्याचे औचित्य साधून येथील पुरातन महादेव मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही २३ व्या जपनाम सोहळ्यसब सव मल्लिकार्जुन वामीजी, श्री. मुरुधेद्र स्वामी विरक्तमठ यांच्या सानिध्यात प्रारंभ झाला. जपनाम कार्यक्रमात दररोज पहाटे ५-४५ ते ६ नमनांजली, ६ ते ७ सामुहीक जपनाम, ७, ते ७-१० वचन, सकाळी ७-१० ते ७:२० आरती हे नित्य कार्यक्रम होत आहेत. हा जपनाम सोहळा महिनाभर चालणार आहे.
शुक्रवारी (ता.२८) दुपारी ४ ते ६ पर्यंत हळदी-कुंकु कार्यक्रम आयोजित केला आहे. रविवारी (१६) सायंकाळी जगद्गुरू पंचम शिवलिंगेश्वर महास्वामीजी, सिद्ध संस्थानमठ, निडसोसी यांच्या सानिध्यात स्वामीजींचे प्रवचन होणार आहे. बुधवारी (ता.९) रोजी श्रावण समाप्ती होणार आहे.
श्रवणाच्या पहिल्या दिवसापासूनच मंदिर परिसर ॐ नमः शिवाय आणि हर हर महादेव च्या जयघोषाने दुमदुमून गेला असून परिसरातील हजारो भाविक या धार्मिक उत्सवात सहभागी होत आहेत. जपनाम या सोहळ्यामुळे शहरात भक्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. नामजपामध्ये सहभागी होण्यासाठी महिला, तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांची गर्दी मंदिरात पाहायला मिळत आहे. महिनाभर हा नामजप सोहळा अखंडपणे सुरू राहणार असून, सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर समितीने केले आहे. याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष सुनील पाटील, गणेश कोठीवाले, बाबू कागले, शिवकांत चंद्रकुडे, इराण्णा शिरगावे, गगपा पाटील, राजू गुणके, संजय मोळवाडे, बसवराज पाटील, बाबासाहेब चंद्रकुडे, चंद्रकांत चौगुले, रवींद्र चंद्रकुडे, विजय चंद्रकुडे यांच्यासह भाविक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

मद्यपींची ‘गटारी’; पोलिसांची ‘खबरदारी’

Spread the love  हॉटेल, चिकन मटण दुकानासमोर रांगा निपाणी (वार्ता) : गुरुवारपासून श्रावण महिना सुरू …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *