Sunday , August 16 2026
Breaking News

मद्यपींची ‘गटारी’; पोलिसांची ‘खबरदारी’

Spread the love

 

हॉटेल, चिकन मटण दुकानासमोर रांगा

निपाणी (वार्ता) : गुरुवारपासून श्रावण महिना सुरू झाला आहे. आता महिनाभर हात लावायचा नाही. असे स्वतःलाच बजावत मद्यपी आणि मांसाहारप्रेमी निपाणीकरांनी यंदाची ‘गटारी अमावस्या’ बुधवारी (ता. १२) साजरी केली. त्या पार्श्वभूमीवर हॉटेल्समध्ये टेबलमिळवण्यासाठी ‘वेटिंग’, चिकन मटन दुकानासह वाईन्स शॉपसमोर रांगा लावण्याची वेळ तळीरामांवर आली. या संधीचा फायदा उठवत हॉटेलचालकांनीही मटण-चिकनचे दर वाढवले. मात्र श्रावणापूर्वीची ‘पेटपूजा’ करण्यासाठी खिशाला बसणारा भुर्दंड सहन करत अमावस्या साजरी केली.
‘गटारी’ निमित्त हॉटेल्स आणि वाईन्स शॉप्सवर गर्दी असताना
दुसरीकडे शहरातील रस्त्यांची अवस्था
बिकट झाली आहे. रस्त्यांवर खड्डे आहेत की खड्ड्यांत रस्ते, अशी स्थिती आहे. त्यामुळे मद्याच्या नशेत वाहने पळवणाऱ्यांची ‘गटारी’ थेट रस्त्यातल्या चिखलात व खड्ड्यांतून वाट काढली.
मद्यपींची रस्त्यांवरील हुल्लडबाजी मोडून काढण्यासाठी पोलीस प्रशासन असे होते. दिवसभर शहराच्या कानाकोपऱ्यात पोलिसांची कडक नाकाबंदी करून या वेळी ‘ब्रेथ अॅनालायझर’ने तपासणी द्वारे ३४ वाहनधारकावर कारवाई केली.

 

About Belgaum Varta

Check Also

निपाणीतील महादेव गल्लीतील महादेव मंदिरात श्रावणानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

Spread the love  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील पुरातन महादेव मंदिरातील श्री महादेव जप मंडळ, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *