Monday , September 7 2026
Breaking News

कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल मंत्री शिवराज तंगडगी यांचा सत्कार

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निर्वाचित मंत्री आणि भोवी समाजाचे प्रेरणादायी नेतृत्व शिवराज तंगडगी यांची कर्नाटक राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाले आहे. त्यानिमित्त माजी जिल्हा पंचायत सदस्य व ओ सी सी आय डायरेक्टर राजेंद्र पवार -वडर यांनी बेंगळुरू येथे भेट घेऊन कोल्हापूरचे आराध्य दैवत अंबाबाई देवीचीची मूर्ती देऊन सत्कार केला.
यावेळी राजेंद्र वडर यांनी, वडर समाजाच्या समस्या मांडून या पुढील काळात समाजाच्या प्रगतीसाठी शैक्षणिक आणि सामाजिक सुविधा देण्याची मागणी केली. यावेळी मंत्री तंगडगी यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून वडार समाजाच्या विकासासाठी नवनवीन योजना राबवून विकास करण्याची ग्वाही दिली. यावेळी वडर, भोवी समाजाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते..

About Belgaum Varta

Check Also

शालेय स्पर्धा सकारात्मक दृष्टिकोन वाढविणारे प्रभावी माध्यम; दशरथ कुंभार

Spread the love  कुर्लीत कथालेखन स्पर्धा निपाणी (वार्ता) : शालेय स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना जिंकणे, हरणे यापेक्षा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *