Sunday , August 16 2026
Breaking News

गुड्सशेड रोडच्या कायमस्वरूपी दुरुस्तीसाठी रहिवाशांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Spread the love

 

बेळगाव : आज गुड्सशेड रोड, शास्त्रीनगर, आठले गुरुजी रोड, एसपीएम रोड, गोडसे कॉलनी, गोकुळनगर तसेच परिसरातील रहिवाशांनी गुड्सशेड रोडची कायमस्वरूपी दुरुस्ती व विकास करण्याच्या मागणीसाठी माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
गेल्या जवळपास ७ वर्षांपासून हा रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असून, यामुळे परिसरातील रहिवासी, पादचारी, विद्यार्थी तसेच दररोज या मार्गाने प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास आणि सुरक्षिततेच्या समस्या निर्माण होत आहेत.
माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी नागरिकांच्या समस्या गांभीर्याने ऐकून घेतल्या असून, उद्या दुपारी १२ ते ३ या वेळेत स्वतः गुड्सशेड रोडची पाहणी करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच परिस्थितीचा आढावा घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याचेही त्यांनी सांगितले.
नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याबद्दल माननीय जिल्हाधिकारी महोदयांचे मनःपूर्वक आभार.
आता त्यांच्या प्रत्यक्ष पाहणीमुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या गुड्सशेड रोडच्या कायमस्वरूपी दुरुस्ती व विकासाचा प्रश्न मार्गी लागेल, अशी आम्हाला आशा आहे.

About Belgaum Varta

Check Also

शांतीनगर टिळकवाडी येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

Spread the love  बेळगाव : टिळकवाडी शांतीनगर, स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान येथे ८० वा भारतीय स्वातंत्र्यदिन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *