

बेळगाव: येत्या दिनांक 4 व 5 सप्टेंबर रोजी संपन्न होणाऱ्या श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) च्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त इस्कॉनच्या शुक्रवार पेठ टिळकवाडी येथील श्री श्री राधा गोकुलानंद मंदिरासमोर उभारण्यात येणाऱ्या मंडपाची मुहूर्तमेढ नुकतीच करण्यात झाली. इस्कॉन बेळगावचे अध्यक्ष ज्येष्ठ संन्यासी परमपूज्य भक्तीरसामृत स्वामी महाराज यांच्या हस्ते मुहूर्तमेढ रोवण्यात आली. याप्रसंगी भजन, कीर्तन व आरती करण्यात आली. यावेळी संकर्षण दास, राम प्रभू, नागेंद्र प्रभू, मदन गोविंद दास, वदन्यचैतन्य, गोपालचंद्र प्रभू, नंदनंदन प्रभू, वल्लभ निमाय प्रभू, शंकरराव कडोलकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
जन्माष्टमी निमित्त विविध कमिट्या नेमण्यात आल्या असून कार्यकर्ते जोमाने कार्यास लागले आहेत.

Belgaum Varta Belgaum Varta