Tuesday , March 3 2026
Breaking News

संकेश्वर

सोयाबीनची तांबेऱ्यांने वाट लागली…

  उत्पादन घटले, दरातही घसरण.. संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर भागात अतिवृष्टी आणि तांबेरा रोगाच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीनचे उत्पादन चांगलेच घटलेले दिसत आहे. दरात देखील मोठी घसरण झाल्याने शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळालेले दिसत आहे. सोयाबीनचा दर प्रति क्विंटल ४८०० रुपये आहे. शेतकऱ्यांनी यावर्षी सोयाबीनचे बंपर पीक हाती येणार अशी आशा बाळगली …

Read More »

निलगार गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या… भावपूर्ण निरोपाने विसर्जन

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरातील नवसाला पावणाऱ्या निलगार गणपतीचे सोमवार दि. १९ रोजी रात्री १.१० वाजता हिरण्यकेशी नदीत निलगार गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या, असा भावपूर्ण निरोप देत विसर्जन करण्यात आले. निलगार गणपतीची विसर्जन मिरवणूक फटाक्यांच्या तुफान आतषबाजीत तासभर चाललेली दिसली. परंपरागत पद्धतीने विसर्जन.. संकेश्वरातील नवसाला पावणाऱ्या निलगार …

Read More »

पिपल्स को-ऑप. सोसायटी प्रगतीपथावर : शहनाज गडेकाई

संकेश्वर (महंमद मोमीन) : पिपल्स मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटी अल्पावधीत प्रगतीपथावर वाटचाल करीत असल्याचे संस्थेच्या अध्यक्षा शहनाज गडेकाई यांनी सांगितले. त्या संस्थेच्या ८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानी बोलत होत्या. प्रारंभी दिवंगत मंत्री उमेश कत्ती आणि दिवंगत महनिय व्यक्तींना श्रध्दांजली वाहण्यात आली. उपस्थितांचे स्वागत आणि अहवाल वाचन शामलिंग हालट्टी (सीईओ) यांनी …

Read More »

संकेश्वर श्री दुरदुंडीश्वर सौहार्दला १ कोटी २२ लाख रुपये नफा, सभासदांना २५% लाभांश जाहीर..

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर श्री दुरदुंडीश्वर अर्बन क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेला चालू आर्थिक वर्षात १ कोटी २२ लाख ५२३ रुपये नफा झाला असून सभासदांना २५ टक्के लाभांश देत असल्याचे संस्थेचे अध्यक्ष शिवानंद जी. संसुध्दी यांनी सांगितले. ते संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानी बोलत होते. सभेच्या प्रारंभी दिवंगत मंत्री …

Read More »

मुत्नाळ येथे बुधवारी सुप्रसिद्ध किर्तनकार चैतन्य महाराज वाडेकर यांचे किर्तन..

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर येथून पाच कि.मी. अंतरावर असलेल्या मुत्नाळ तालुका गडहिंग्लज येथील एस. डी. हायस्कूल येथे बुधवार दि. २१ सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजता सुप्रसिद्ध किर्तनकार चैतन्य महाराज वाडेकर यांच्या किर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कै.लक्ष्मीबाई नवलाज यांच्या द्वितीय पुण्यतिथी निमित्त किर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात …

Read More »

निलगार दर्शनाला भक्तसागर लोटला…

  दर्शनाला लांबचलांब एक कि.मी रांगा.. संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरातील नवसाला पावणाऱ्या निलगार गणपती दर्शनासाठी आज भक्तगणांनी मोठी गर्दी केलेली दिसली. अदमासे एक लाख भाविकांनी निलगार गणपतीचे दर्शन घेतल्याचे सांगितले जात आहे. उद्या सोमवार दि. १९ रोजी निलगार गणपतीचे विसर्जन होणार असल्याने शनिवार आणि रविवारी भक्तगण मोठ्या संख्येने दर्शनासाठी …

Read More »

संकेश्वर सौहार्दची यशस्वी वाटचाल : अमर नलवडे

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर सौहार्द क्रेडिट सहकारी संस्था सभासदांचे प्रेम आणि उदंड सहकार्यातून २३ व्या वर्षांत यशस्वी पदार्पण करत असल्याचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक, संस्थेचे अध्यक्ष अमर नलवडे यांनी सांगितले. ते संकेश्वर सौहार्दच्या २३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानी बोलत होते. प्रारंभी हुक्केरीचे लोकप्रिय आमदार राज्याचे वन …

Read More »

संकेश्वर नागरिक मंचतर्फे छायाचित्रकार राघवेंद्र देवगोजी यांचा सन्मान…

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरचे प्रसिद्ध छायाचित्रकार राघवेंद्र देवगोजी यांना हंम्पी येथे पार पडलेल्या राष्ट्रीय फोटोग्राफी स्पर्धेत पाचव्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाल्याने संकेश्वर नागरिक मंचतर्फे त्यांचा नुकताच शाल श्रीफळ पुष्पहार पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना डॉ. जयप्रकाश करजगी म्हणाले, राघवेंद्र देवगोजी यांची फोटोग्राफी निश्चितच कौतुकास्पद राहिली आहे. ते …

Read More »

वीरराणी कित्तूर चन्नम्मा सौहार्दची लवकरच शाखा : मलगौडा पाटील

संकेश्वर (महंमद मोमीन) : वीरराणी कित्तूर चन्नम्मा अर्बन सौहार्द क्रेडिट सहकारी संस्था लवकरच शाखेचा शुभारंभ करीत असल्याचे संस्थेचे अध्यक्ष मलगौडा ऊर्फ बसनगौडा पाटील यांनी सांगितले. ते वीरराणी कित्तूर चन्नम्मा सौहार्दच्या २६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानी बोलत होते. सभेच्या प्रारंभी दिवंगत गाणकोकिळा लता मंगेशकर, मंत्री उमेश कत्ती, डी.एन. कुलकर्णी, नगरसेवक …

Read More »

अंकले ग्रामपंचायत अध्यक्षपदी भरत फुंडे बिनविरोध..

संकेश्वर (महंमद मोमीन) : अंकले ग्रामपंचायत नूतन अध्यक्षपदी भरत फुंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. बेळगांव जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार आज अंकले ग्रामपंचायत सभागृहात निवडणूक प्रक्रिया पार पडली. अंकले ग्रामपंचायतचे अध्यक्ष एकनाथ पोवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने ११ महिन्यांच्या कालावधीसाठी भरत फुंडे निवडले गेले आहेत. नूतन अध्यक्षांंवर गुलालाची उधळण …

Read More »