Sunday , September 20 2026
Breaking News

वीरराणी कित्तूर चन्नम्मा सौहार्दची लवकरच शाखा : मलगौडा पाटील

Spread the love

संकेश्वर (महंमद मोमीन) : वीरराणी कित्तूर चन्नम्मा अर्बन सौहार्द क्रेडिट सहकारी संस्था लवकरच शाखेचा शुभारंभ करीत असल्याचे संस्थेचे अध्यक्ष मलगौडा ऊर्फ बसनगौडा पाटील यांनी सांगितले. ते वीरराणी कित्तूर चन्नम्मा सौहार्दच्या २६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानी बोलत होते. सभेच्या प्रारंभी दिवंगत गाणकोकिळा लता मंगेशकर, मंत्री उमेश कत्ती, डी.एन. कुलकर्णी, नगरसेवक संजय नष्टी यांना दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रध्दांजली वाहण्यात आली. अहवाल वाचन आनंद पाटील यांनी केले. प्रगतीचा आढावा विश्वनाथ मिर्जे (सीईओ) यांनी सादर केला.
अध्यक्ष मलगौडा पाटील पुढे म्हणाले, संस्थेला चालू आर्थिक वर्षात २५ लाख ९४ हजार ६४० रुपये नफा झाला आहे. सभासदांना २०% लाभांश देत आहोत. सभासदांना घर बांधणीसाठी, वाहन खरेदीसाठी कमी व्याजदर कर्ज योजना प्रारंभ केली जाणार आहे. त्याचा सदुपयोग सभासदांनी करुन घ्यावयाचा असल्याचे त्यांनी सांगितले. सभेला संस्थेचे उपाध्यक्ष अप्पासाहेब पचंडी, संचालक बसगौडा पाटील, सचिन पाटील, नागेश उपाध्ये, अशोक शिंदे, रावसाहेब कुरबेट, शंकर शिरकोळी, महेश बाडकर, अण्णप्पा शेलार, इरगौडा पाटील, सौ. रेखा दुंडगे, सौ. श्रीदेवी वैरागी, सौ. सरोजनी पचंडी, विनय चौगला, कलप्पा गस्ती, सुरेश मळनाईक सभासद उपस्थित होते. आभर विश्वनाथ मिर्जे यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

गणेशोत्सवासाठी यमकनमर्डी पोलिसांकडून गणेश मंडळाना मार्गदर्शक सूचना : पीएसआय आर. बी. पाटील

Spread the love  मंडप, मिरवणूक व विसर्जनावेळी नियमांचे पालन करण्याचे आवाहन दड्डी वार्ताहर.. आगामी गणेशोत्सवाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *