Friday , April 17 2026
Breaking News

अंकले ग्रामपंचायत अध्यक्षपदी भरत फुंडे बिनविरोध..

Spread the love


संकेश्वर (महंमद मोमीन) : अंकले ग्रामपंचायत नूतन अध्यक्षपदी भरत फुंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. बेळगांव जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार आज अंकले ग्रामपंचायत सभागृहात निवडणूक प्रक्रिया पार पडली. अंकले ग्रामपंचायतचे अध्यक्ष एकनाथ पोवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने ११ महिन्यांच्या कालावधीसाठी भरत फुंडे निवडले गेले आहेत. नूतन अध्यक्षांंवर गुलालाची उधळण करीत त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला.
अंकले ग्रामस्थांच्या पदस्पर्शाला नमस्कार…
निवडी नंतर पत्रकारांशी बोलताना भरत फुंडे म्हणाले, अंकले ग्रामस्थांच्या पदस्पर्शाला नमस्कार आणि पाठिंबा दर्शविलेल्या सदस्यांना आपण धन्यवाद देतो. माजी अध्यक्ष एकनाथ पोवार यांनी कांही अपरिहार्य कारणास्तव राजीनामा दिलेला असला तरी ते आंमच्या पाठीशी आहेत. अंकले ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांना बरोबर घेऊन विकास कामे करणार आहे. अंकलेत जातीचे राजकारण कोणी केलेले नाही आणि करणार देखील नाही. पण कांही विरोधक आपण जातीचे राजकारण करीत असल्याचे सांगताहेत. अंकले गावातील सर्व समाजाचे लोक आपल्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. त्यामुळे जातीचे राजकारण करीत असल्याचे सांगते बिनबुडाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी अंकले ग्रामपंचायत उपाध्यक्षा अनिता आजरेकर, विश्वनाथ पाटील, ईश्वर बाडकर, ईश्वर कोनकेरी, गंगव्वा खातेदार, राजेश्री डोणे, सुजाता गस्ती, ललिता सुतार, तसेच कुमार किंवडा ग्रामस्थ अभिमानी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

संकेश्वरातील बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला ३० वर्षे कारावास; १ लाख रुपये दंड

Spread the love  संकेश्वर : संकेश्वर शंकर नगर येथील आरोपी दर्शन भगवंत हुणश्याळी (वय २३) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *