Tuesday , March 3 2026
Breaking News

संकेश्वर

पालिकेला “बकेट” वाटपाला मुहूर्त मिळेना…

  संकेश्वर  (महंमद मोमीन) : संकेश्वर पालिकेला बकेट वाटपाला मुहुर्त मिळेनासा झाला आहे. संकेश्वरकरांना ओला आणि सुका कचरा गोळा करण्यासाठी पालिकेतर्फे प्लास्टिक बकेट वाटप केले जाणार आहेत. पण बकेट वाटपाचे कार्य आज-उद्यावर पुढे ढकलले जात आहे. त्यामुळे संकेश्वर नागरिकांतून बकेट वाटप कधी? असा प्रश्न विचारला जात आहे. यापूर्वी पालिकेने एका …

Read More »

संकेश्वरात ईद- मिलाद जल्लोषात….

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात मुस्लिम बांधवांनी हजरत मोहम्मद पैगंबर जयंती, ईद मिलादुन्बी उत्साही वातावरणात जल्लोषात साजरी केली. ईद-मिलाद निमित्त जुम्मा मशीद येथून गावातील प्रमुख मार्गे जुलूस (मिरवणूक) काढण्यात आली. मिरवणुकीत सुन्नत जमात तंजिम कमिटी, महेदि (मोमीन) समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जुलूसमध्ये पैगंबरांचा (नारा) जयोघोष चाललेला …

Read More »

संकेश्वर पतंजली योग समितीतर्फे जागतिक टपाल दिन साजरा

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर पतंजली योग समितीतर्फे जागतिक टपाल दिन उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. टपाल दिनाचे औचित्य साधून योग साधकांना टपाल वाटप करण्यात आली. टपाल दिनानिमित्त सर्वांनी टपाल लिहिण्याविषयी सांगण्यात आले. त्यानुसार सौ. शैलजा जेरे यांनी बोलके पत्र लिहून सर्वांना योग करा निरोगी राहा. हा संदेश दिला आहे. …

Read More »

सोयाबीन काढणीला आता “नाईंटी हवी”….

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर परिसरात सोयाबीन काढणी मळणीच्या कामाची धांदल उडालेली दिसत आहे. एकाच वेळी सर्वत्र सोयाबीन काढणी मळणीचे काम सुरू झाल्याने शेतमजूरांचा तुटवडा जाणवू लागला आहे. शेतमालकांना सोयाबीन काढणी मळणीसाठी शेतमजुरांची मनधरणी करावी लागत आहे. शेतमजूरांच्या मागण्या वाढल्याने शेतकरी, शेतमालक डोक्याला हात लावून बसलेले दिसत आहेत. शेतमजूर सांगताहेत …

Read More »

संकेश्वरात रस्त्यावर कचरा फेकणाऱ्यांना दंड…..

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर जुन्या पुणे-बेंगळूर महामार्गावरील शिवशक्ती जनरल स्टोअर्सने घनकचरा रस्त्यावर फेकून दिल्याने आज पालिकेने दंडात्मक कारवाई केलेली दिसत आहे. शिवशक्ती दुकान मालकाने कचरा रस्त्यावर फेकून दिल्याचे दिसून येताच आज पालिका सॅनेटरी सुपरवायझर श्रीधर बेळवी, मुकादम सुनिल पाटील, परशराम सत्यनाईक, कृष्णा खातेदार यांनी दुकान मालक वागाराम माळी …

Read More »

संकेश्वरात श्री बसवेश्वर यात्रोत्सव….

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर बसवाण गल्लीतील श्री बसवेश्वर देवस्थानची यात्रा विविध कार्यक्रमांनी, भक्तीमय वातावरणात पार पडली. गेले अकरा दिवस झाले मंदिरात अहोरात्र टाळ वाजवून शिवाची आराधना करण्यात आली. आज निडसोसी मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींचे टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. श्रींनी देवाची पूजा करुन आपल्या प्रवचनात बसवेश्वरांची महती …

Read More »

प्रभागात विकासकामांंना चालना देऊन “नारळ फोडणार” : सुचिता परीट

  संकेश्वर (महंमद मोमीन) : प्रभागातील लोकांना आश्वासनाच्या झुल्यावर झुलवत ठेवण्याचे काम आपण कदापी करणार नाही. नगरोथान योजनेतून निधी मिळवून विकास कामांना चालना देऊनच आपण विकास कामांचा नारळ फोडणार असल्याचे प्रभाग क्रमांक १० मधील नगरसेविका सौ. सुचिता श्रीकांत परीट यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. त्या म्हणाल्या, प्रभाग १० मधील कोण-कोणती …

Read More »

संकेश्वरात श्रीनिधी-जगदीश यांचे सहर्ष स्वागत

  संकेश्वर (महंमद मोमीन) : सायकलवरून “निसर्ग वाचवा” चा संदेश घेऊन मंगळूर ते काश्मीर प्रवास दौऱ्यावर निघालेले सायकलपटू श्रीनिधी शेट्टी, जगदीश कोलार यांचे संकेश्वरात हाॅटेल मालक संघ आणि वंदे मातरम् योग केंद्रातर्फे सुधाकर शेट्टी यांनी सहर्ष स्वागत केले. यावेळी बोलताना सुधाकर शेट्टी म्हणाले, श्रीनिधी शेट्टी, जगदीश कोलार हे निसर्ग वाचवा, …

Read More »

संकेश्वरातील स्केटिंग स्पर्धेला उदंड प्रतिसाद..

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात नुकतीच खुली रोलर स्केटिंग स्पर्धा पार पडली. त्याला स्पर्धकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. हुक्केरी तालुका रोलर स्केटिंग अकॅडमी, शाखा संकेश्वरच्या वतीने खुल्या रोलर स्केटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. संकेश्वर अकॅडमीच्या स्केटरनी स्पर्धेत सहभागी होऊन घवघवीत यश मिळवले आहे. स्पर्धेचे उदघाटन हिरण्यकेशी साखर कारखान्याचे व्यवस्थापक …

Read More »

संकेश्वरात परंपरागत पद्धतीने दसरा सण साजरा

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात परंपरागत पद्धतीने विजयदशमी (दसरा) सण भक्तीमय आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. खंडेनवमीनिमित्य शस्त्रांचे पूजन करण्यात आले. संकेश्वरकरांनी बुधवारी सायंकाळी पादगुडी येथे श्री बसवेश्वर देवदर्शनांने सिमोल्लंघन केले. पादगुडी येथे संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठाचे श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजींनी शमीच्या पानांचे (आपट्यांची पाने) …

Read More »