निपाणी परिसरात नुकसानीची पाहणी निपाणी (वार्ता) : वादळी वारे व पावसामुळे निपाणी तालुक्यात अनेक घरे, गॅरेज, दुकान, मालमत्तेसह झाडांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचा सर्व्हे करून पंचनाम्यासह तात्काळ नुकसान भरपाई दिली जाईल. तसा आदेश तहसीलदारांना दिल्याची माहिती पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली. माजी मंत्री वीरकुमार पाटील, माजी आमदार काकासाहेब …
Read More »बेळगाव लोकसभा मतदारसंघात 71.38 टक्के तर चिक्कोडीत 78.51 टक्के मतदान
बेळगाव : लोकशाहीचा सण असलेली निवडणूक शांततेत पार पडली असून चिक्कोडी लोकसभा मतदारसंघ 78.51 टक्के तर बेळगाव लोकसभा मतदारसंघ 71.38 टक्के तसेच बेळगाव जिल्ह्यातील खानापूर विधानसभा मतदारसंघात 73.87 टक्के आणि कॅनरा लोकसभा मतदारसंघातील कित्तूर विधानसभा मतदारसंघात 73.87 टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली. एकूण गतवेळच्या तुलनेत …
Read More »बेळगावात २४.०२ तर चिक्कोडीत २७.२३ टक्के मतदान
बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत २४.०२ टक्के तर चिक्कोडीत २७.२३ टक्के मतदान झाले आहे. बेळगाव लोकसभा मतदारसंघातील बेळगाव शहर परिसरात विविध ठिकाणी मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदारांनी मतदानाला सुरुवात केली आहे. मतदारांनी मतदानासाठी सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला आहे. वाढत्या उन्हामुळे वयोवृद्ध तसेच महिलांना मतदान केंद्राकडे जाण्यास त्रास …
Read More »प्रियांका जारकीहोळी यांना मताधिक्य मिळेल
जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांचा विश्वास निपाणी (वार्ता) : विधानसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली आहे.चिकोडी लोकसभा मतदारसंघात ५ लाख ६८ हजार महिलांना ९ महिन्यांपासून दर महिन्याला २००० रुपये दिले जात आहेत. १ लाख ५० हजार कुटुंबांचे वीज बिल माफ झाले आहे. ७ लाखांवर कुटुंबांना मोफत …
Read More »शिवसेनेचा काँग्रेसला पाठिंबा : बाबासाहेब खांबे यांची माहिती
निपाणी (वार्ता) : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी प्रमाणेच सीमा भागामध्ये निपाणी शिवसेना सीमाप्रश्नाची बांधीलकी जपत काँग्रेसच्या उमेदवार प्रियांका सतीश जारकीहोळी यांना बिनशर्त पाठींबा देत असल्याची माहिती बेळगाव जिल्हा शिवसेनाप्रमुख बाबासाहेब खांबे यांनी दिली. खांबे म्हणाले, शिवसेना वरिष्ठांच्या आदेशानुसार निपाणी शिवसेना काँग्रेसच्या उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांना पाठिंबा देत आहे. निपाणी सीमाभागामध्ये …
Read More »चिक्कोडी लोकसभा मतदारसंघाचे रिटर्निंग ऑफिसर राहुल शिंदे यांनी बजावला मतदानाचा हक्क
चिक्कोडी : चिक्कोडी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी तथा ग्रा.पं. सीईओ राहुल शिंदे यांनी बुधवारी (१ मे) पोस्टल बॅलेटद्वारे मतदानाचा हक्क बजावला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना पोस्टल मतदानाद्वारे मतदानाचा हक्क बजावण्याची संधी देण्यात आली आहे. लोकसभा निवडणूक-2024 संदर्भात चिक्कोडी …
Read More »चिक्कोडी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्षपदी उद्योजक रोहन साळवे यांची निवड
निपाणी (वार्ता) : येथील साखरवाडीतील साळवे परिवार अनेक दशकांपासून काँग्रेस पक्षाचे काम करीत आहे. या कामाचा विचार करून युवा उद्योजक रोहन साळवे यांची चिक्कोडी जिल्हा काँग्रेस पक्षाच्या उपाध्यक्षपदी निवड केल्याचे पत्र सार्वजनिक बांधकाम व बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी साळवे यांना दिले. पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनुसार ही निवड करण्यात आली …
Read More »मोदी सरकारकडून विरोधकावर केवळ टीकास्त्र
माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्र पवार; काँग्रेसच्या प्रचारार्थ सभा निपाणी(वार्ता) : मोदी सरकार विविध प्रकारची आश्वासने देऊन सत्तेवर आले. पण एकाचीही पूर्तता केली नाही. विरोधकावर केवळ टीका करण्याचे काम केले. दिल्लीत लोकाभिमुख सरकार असताना मोदी सरकारने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कारागृहात पाठवले. त्यामुळे मोदींची वाटचाल हुकूमशाहीकडे सुरू असल्याचे माजी केंद्रीय …
Read More »महागाईमुळे देशात परिवर्तनाची लाट
उत्तम पाटील : निपाणीत प्रचारसभा निपाणी (वार्ता) : महागाईला महिलांसह जनता कंटाळली आहे. त्यामुळे देशभरात परिवर्तनाची लाट आली आहे. चिक्कोडीतही विद्यमान खासदारांच्या विकासकामातील अपयशामुळे काँग्रेस उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांचा मताधिक्याने विजय होईल, असा विश्वास सहकाररत्न उत्तम पाटील यांनी व्यक्त केला. शहरातील प्रभाग क्रमांक मधील २१ किणेकर गल्ली येथे आयोजित …
Read More »काँग्रेसच्या प्रचारार्थ निपाणीत बुधवारी शरद पवार यांची सभा
निपाणी (वार्ता) : चिक्कोडी लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांच्या प्रचारार्थ बुधवारी (ता.१) माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा होणार आहे. यावेळी निपाणी मतदारसंघातील कार्यकर्ते आणि मतदारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सहकार्य उत्तम पाटील यांनी केले. सोमवारी (ता.२९) दुपारी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta