Thursday , March 5 2026
Breaking News

कर्नाटक

दिल्लीतील जंतरमंतरवर कर्नाटक सरकारचे आंदोलन

  केंद्राच्या पक्षपाती धोरणाविरुध्द संघर्ष चालूच ठेवणार मुख्यमंत्री सिध्दरामय्या बंगळूर / नवी दिल्ली : कर्नाटक सरकारचे दिल्लीतील आंदोलन हा राजकीय संघर्ष नसून राज्यावर होत असलेल्या अन्यायाविरुध्दचा लढा आहे. केंद्र सरकारच्या सापत्नभावनेमुळे राज्याचे मोठे नुकसान होत आहे. कर्नाटक कर संकलनात देशात दुसऱ्या स्थानावर असूनही कराचा योग्य वाटा राज्याला मिळत नाही. हा …

Read More »

निपाणी बस स्थानकात इचलकरंजीच्या महिलेचे दीड तोळे दागिने लंपास

  निपाणी (वार्ता) : येथील बसस्थानकात निपाणीहून इचलकरंजीला जाणाऱ्या बसमध्ये चढताना अज्ञात चोरट्यांनी महिलेच्या बॅगेतील दीड तोळे सोन्याचे दागिने व रोख दहा हजार रुपये ठेवलेली पर्स लंपास केली. मिलाग्रीन मदर (रा. इचलकरंजी) असे चोरी झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी, मिलाग्रिन मदर यांचे माहेर – हल्ल्याळ (ता.दांडेली) …

Read More »

निपाणी-हुपरी मार्गावर बसची शर्यत; विद्यार्थी, नोकरदारातून संताप

  निपाणी (वार्ता) : निपाणी आगाराच्या नियोजनाअभावी निपाणी-हुपरी मार्गावर एकामागोमाग बस धावताना दिसत आहेत. त्यामुळे बसची त्यामुळे प्रवाशांना बराच वेळ हुपरी, निपाणी बसस्थानकावर थांबावे लागत असल्याने खोळंबा होत आहे. परिणामी संताप व्यक्त होत आहे. बसच्या अपुऱ्या संख्येमुळे अनेक मार्गावर बस फेऱ्या बंद असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. अशा परिस्थितीत फेऱ्यांचे …

Read More »

कर्नाटकचे आज ‘चलो दिल्ली’

  जंतरमंतरवर तयारी, देवेगौडा, कुमारस्वामींसह लोकप्रतिनिधीना सहभागाचे आवाहन बंगळूर : केंद्राकडून राज्यावर होत असलेला अन्याय आणि अनुदानात होत असलेल्या भेदभावाचा निषेध करण्यासाठी राज्यातील काँग्रेस सरकारने आज (ता. ७) दिल्लीत आंदोलन करण्याचे आयोजन केले आहे. ‘माझा कर माझ्या हक्काचा’, या राज्य सरकारच्या घोषणेखाली आंदोलन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली …

Read More »

मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि इतरांना १० हजारचा दंड

  बंगळूर : कर्नाटक उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री सिद्धरामय्या, राज्याचे कॅबिनेट मंत्री एम. बी. पाटील, रामलिंगा रेड्डी आणि काँग्रेस नेते रणदीप सिंग सुरजेवाला यांना १० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यांना प्रत्यक्ष लोकप्रतिनिधी न्यायालयात हजर राहण्याचेही निर्देश दिले आहेत. सहा मार्च रोजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, सात मार्च रोजी परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी, …

Read More »

खानापूरात बीई इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

  खानापूर : लक्ष्मी नगर खानापूर येथील रहिवासी व बीई इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्गात शिक्षण घेत असलेला विद्यार्थी मंथन अशोक वड्डीन्नावर (19) याने आपल्या रहात्या घरात दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना मंगळवार दि. 6 फेब्रुवारी दुपारी घडली आहे. याबाबत समजलेली माहिती लक्ष्मी नगर खानापूर येथील रहिवासी व यडोगा ता. …

Read More »

मराठा बटालियनच्या सायकलस्वारांचे मध्यवर्ती शिवाजी चौकात स्वागत

  निपाणी (वार्ता) : बेळगाव ते सिंहगड या ६०० किलोमीटर सायकल रॅलीने गडकोटला भेट देणाऱ्या मराठा लाइट इन्फंट्रीच्या ११ सायकल स्वार जवानांचे निपाणीत मध्यवर्ती छत्रपती शिवाजी तरुण मंडळ आणि निपाणी भाग आजी माजी सैनिक संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्वागत करण्यात आले. ४ फेब्रुवारीला झालेल्या मराठा दिनानिमित्त ११ लष्करी …

Read More »

कुर्ली क्रिकेट स्पर्धेत रेंदाळचा संघ विजेता

  ग्रामीण भागातून ३२ संघांचा सहभाग निपाणी (वार्ता) : कुर्ली क्रिकेट क्लबतर्फे कुर्ली हायस्कूलच्या मैदानावर खुल्या टेनिसबॉल फुल पिच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये रेंदाळ क्रिकेट क्लबने विजेतेपद पटकावले. या संघाला २५ हजार रुपये व चषक देवून गौरविण्यात आले. कुर्ली संघ उपविजेता ठरला. अंतिम सामन्यात नाथ होलसेलचे मालक …

Read More »

ज्वारी प्रति किलो ७० रुपये

  गरिबाच्या ताटातील भाकरी महागली ; अत्यल्प उत्पादनाचा फटका निपाणी (वार्ता) : पूर्वी गरिबांचा आहार असलेली ज्वारी आता महागली असून ती चक्क गरिबांच्या ताटातून गायबच होऊ लागली आहे. सद्या किरकोळ बाजारात चांगल्या प्रतीची ज्वारी ६० ते ७० रुपये प्रतिकिलोने विकली जात आहे. ज्वारीचे क्षेत्र घटल्याचा हा फटका बसत असल्याचे व्यापाऱ्यांनी …

Read More »

निपाणीत साई यात्रा वार्षिकोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

  निपाणी (वार्ता) : येथील साई नगरातील श्री सदगुरु साईनाथ विश्वस्थ मंडळातर्फे मंगळवारपासून (ता.१३) श्री साई यात्रा वार्षिकोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त बुधवार अखेर (ता.१४) विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी (ता.१३)सकाळी ६ वाजता डॉ. प्रियांका माने व डॉ. अभिषेक माने यांच्या हस्ते ध्वजारोहण, त्यानंतर सुवर्णा मेहता, …

Read More »