३० सप्टेंबर अंतिम तारीख; बँकात होणार गर्दी निपाणी (वार्ता) : नोटबंदी काळात चलनाची धुरा सांभाळणारी दोन हजारांची नोट गेल्या सहा वर्षांपासून चलनात आहे. मात्र सध्या ती फार कमी प्रमाणत बघायला मिळते. केंद्र सरकारने २३ मे ते ३० सप्टेंबर या कालावधीत या नोटा बँकेत जमा करण्याचे आदेश दिले आहे. आता …
Read More »व्हनशेट्टी पार्क गणेश मंडळातर्फे आर. के. धनगर यांचा सत्कार
निपाणी (वार्ता) : निपाणी तालुका धनगर समाज अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आर. के. धनगर व सुनीता प्रताप यांची निपाणी तालुका शिक्षक संघ उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा येथील व्हनशेट्टी पार्क गणेश मंडळातर्फे उत्तम पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी निपाणी तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रा.एन. आय. खोत ममदापूर ग्राम …
Read More »ओढ्यातील उघड्यावरील मूर्तींचे पुनर्विसर्जन
‘श्रीराम सेना हिंदुस्थान’चा पुढाकार; प्रबोधन केल्याने मन परिवर्तन निपाणी (वार्ता) : दरवर्षी गणेशोत्सवामध्ये गणेशाची प्रतिष्ठापना पूजन, मिरवणुका झाल्यानंतर मूर्तींचे विसर्जन होते. पण काही भाविक पाणी कमी असलेल्या तलाव अथवा ओढ्यामध्ये मूर्तीचे विसर्जन केल्यामुळे ते तात्काळ उघड्यावर पडतात. त्यामुळे त्यांची विटंबना होऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन येथील श्रीराम सेना …
Read More »“त्या” तरुणाचा घातपात झाल्याचा संशय!
खानापूर : गेल्या शनिवारपासून बेपत्ता झालेल्या कोडचवाड येथील तरुणाचा शोध मंगळवारी दिवसभर सुरू होता. त्या तरुणाचा खून झाल्याचा संशय बळावत असल्याने मलप्रभा नदी प्रवाहात अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक वेणुगोपाल यांच्या नेतृत्वाखाली सायंकाळी पाच वाजेपर्यंत शोध घेण्यात आला. दरम्यान, तरुणाचा मोबाईल फोन आणि शाळेची बॅग नदीत सापडली असून तरुणाची हत्या …
Read More »रोटरीच्या ‘राष्ट्र निर्माता’ पुरस्काराने कुर्लीचे युवराज पाटील सन्मानित
निपाणी (वार्ता) : कुर्ली येथील रहिवाशी व म्हाकवे इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज म्हाकवे शाळेचे गणित विषयाचे शिक्षक युवराज पाटील यांना कोल्हापूर येथील रोटरी क्लब ऑफ मुव्हमेंट यांच्यातर्फे ‘राष्ट्र निर्माता’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवन येथे झालेल्या कार्यक्रमात कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी संतोष पाटील, …
Read More »खानापूर समितीच्या वतीने इस्रोच्या शास्त्रज्ञाचा सन्मान!
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने चांद्रयान-३ मोहिमेत सहभागी झालेले खानापूर तालुक्यातील अनगडी गावाचे सुपुत्र कनिष्ठ शास्त्रज्ञ श्री. प्रकाश पेडणेकर यांचा त्यांच्या अनगडी येथील निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्या आई-वडीलांच्या समवेत शाल, श्रीफळ व म. ए. समितीचे स्मृतिचिन्ह देऊन समितीचे अध्यक्ष श्री. गोपाळराव देसाई, कार्याध्यक्ष श्री. मुरलीधर पाटील, …
Read More »सोशल मीडियावर बाप्पांची एकच धूम
‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ गाण्याची भुरळ; उत्सवाच्या शुभेच्छांचा पाऊस निपाणी (वार्ता) : सर्वांचाच लाडका असणाऱ्या गणपती बाप्पांचे दिमाखात आगमन झाले आहे. पाहता पाहता ७ दिवस उलटले. मागील मंगळवार (ता. १९) पासून सोशल मीडियावर गणेशोत्सवाची धूम सुरू झाली आहे. घरातील गणपतीची आरास, गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देणारे मेसेज मित्र- मैत्रिणींना शेअर केले …
Read More »उद्या बंगळूर, शुक्रवारी कर्नाटक बंद
एकाच आठवड्यातील दोन बंदमुळे संभ्रम बंगळूर : कावेरी पाणी वाटप वादावर एकाच आठवड्यात दोन बंद पुकारण्यात आल्याने संघटना संभ्रमात आहेत. अनेक संघटनांनी उद्या (ता. २६) होणाऱ्या ‘बंगळूर बंद’ला पाठिंबा न देण्याचा निर्णय घेतला आहे, तर शुक्रवार दि. २९ सप्टेंबर रोजी पुकारलेल्या ‘कर्नाटक बंद’लाच पाठिंबा दिला आहे. शुक्रवारी (ता. २९) …
Read More »कावेरी प्रश्नी पंतप्रधान मोदीनी हस्तक्षेप करावा
देवेगौडांचे पत्र; स्वतंत्र बाह्य एजन्सी नेमण्याची विनंती बंगळूर : कावेरीतील सर्व जलाशयांचा अभ्यास करण्यासाठी या वादात पक्षकार असलेली राज्ये आणि केंद्र सरकार यांच्यापासून स्वतंत्र अशी बाह्य एजन्सी नेमण्याचे निर्देश जलशक्ती मंत्रालयाला द्यावेत, असे आवाहन माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले. देवेगौडा यांनी या …
Read More »प्रतिटन ४०० रुपयासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर ९ ऑक्टोबरला मोर्चा
निपाणी (वार्ता) : आंतरराष्ट्रीय पातळीवर साखरेला चांगला दर मिळत असल्याने कर्नाटकतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ४०० रुपयाप्रमाणे दुसरा हप्ता देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. त्याला रयत संघटना व हसिरू क्रांती सेनेने पाठिंबा दिला आहे. यासह विविध मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta