प्रादेशिक आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश निपाणी (वार्ता) : येथील तहसील कार्यालयाच्या भूमी विभागात लाच घेताना लोकायुक्त कारवाई करण्यात आली होती. यामध्ये भूमी विभागाचे अधिकारी उपतहसीलदार अभिषेक बोंगाळे व संगणक चालक पारिस सती यांना जेरबंद करण्याची कारवाई झाली होती. या माध्यमातून उपतहसीलदार अभिषेक बोंगाळे यांना प्रादेशीक आयुक्तांनी तर संगणक चालक पारिस …
Read More »आवरोळी येथे शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या
खानापूर : कर्जाचा बोजा सहन न झाल्याने विष प्राशन करून शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना खानापूर तालुक्यातील आवरोळी गावात घडली. याबाबत समजलेली माहिती अशी की, महेश लक्ष्मण नागन्नावर (वय 50) या शेतकऱ्याला कर्जाचा बोजा जास्त झाला होता. त्यांनी अनेक सोसायटी, बँका, फायनान्स मधून कर्जे काढली होती. त्यातच पाऊस नसल्याने 4 …
Read More »ढोकेगाळी – हरूरी रस्त्यावर अस्वलाचा दुचाकीस्वारावर हल्ला
खानापूर : खानापूर तालुक्यातील ढोकेगाळी – हरूरी गावांच्यामध्ये दोन पिल्लांसह वावरणाऱ्या एका अस्वलाने दुचाकीस्वारावर हल्ल्याचा प्रयत्न केला. सदर घटना आज सकाळी 9.30 दरम्यान घडली. दुचाकीचा वेग वाढविल्याने दुचाकीस्वार बचावला. ही घटना पाठीमागून चालत शाळेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी दूरवरून पाहिली. घाबरलेल्या त्या मुलांनी धावत ढोकेगाळी गावातील स्वतःचे घर गाठले. या घटनेमुळे येथील …
Read More »‘पीओपी’ मूर्ती, डॉल्बी लावल्यास थेट गुन्हा!
मंडल पोलीस निरीक्षक तळवार; कारवाईचा बडगा उगारणार निपाणी (वार्ता) : यंदाचा गणेशोत्सव चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्या पार्श्वभूमीवर गावागावांत मूर्तीवर अखेरचा हात फिरविला जात आहे. उत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) गणेशमूर्तीनिर्मितीसह प्रतिष्ठापना करण्यास जिल्हा प्रशासनाने यंदाही पूर्णपणे बंदी घातली आहे. शिवाय डॉल्बीही हद्दपार करण्याचा निर्णय पोलिस प्रशासनाने घेतला …
Read More »बेळगाव जिल्ह्यातील १३ तालुके दुष्काळग्रस्त
अधिकृत घोषणा; राज्यातील १९५ तालुके, बेळगाव, खानापूरला वगळले बंगळूर : राज्यातील ३१ जिल्ह्यांतील २३६ तालुक्यांपैकी राज्य सरकारने २०२३ मधील १९५ तालुके दुष्काळग्रस्त म्हणून अधिकृतपणे घोषित केले आहेत. त्यात बेळगाव जिल्ह्यातील १३ तालुक्यांचा समावेश असून दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीतून बेळगाव व खानापूर तालुक्याना वगळण्यात आले आहे. मध्यम अवर्षण प्रवण तालुक्यातही त्यांचा …
Read More »खानापूर तालुक्यातील कांही गावांमध्ये शुक्रवार आणि शनिवारी वीज खंडित
खानापूर : कर्नाटक विद्युत पारेषण महामंडळाच्या वतीने वीज क्षमता वाढविण्याच्या कामामुळे खानापूर तालुक्यातील बीडी गावातील 110 केव्ही सबस्टेशनद्वारे पुरवठा करण्यात येणाऱ्या भागात शुक्रवार 15 सप्टेंबर व शनिवार 16 सप्टेंबर रोजी सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित राहणार आहे. हिंडलगी, मंगेनकोप्प, केरवाड, बीडी, कक्केरी, चुंचवाड, रामापुर, सुरापुर, गोलिहळ्ळी, …
Read More »खानापूर तालुक्यातील सागरे येथे भरदिवसा घरफोडी
खानापूर : खानापूर तालुक्यात घरफोडीचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच आहेत. समोरील कुलूप बंद दरवाजा पाहून पाठीमागच्या दरवाजाने घरफोडीचे प्रकार घडत असतानाही घरात दागिने पैसे ठेवून कुलूप बंद घरे करून बाहेर जाणे धोक्याचे ठरत आहे. असाच प्रकार बुधवारी खानापूर तालुक्यातील सागरे गावात घडला. सागरे येथे बंद घरांचे कुलूप तोडून 5 तोळे …
Read More »निपाणी महादेव मंदिरात श्रावण महिन्यातील धार्मिक कार्यक्रमाची महाप्रसादाने सांगता
निपाणी (वार्ता) : श्रावण महिन्या निमित्त येथील महादेव गल्लीमधील महादेव मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गुरूवारी (ता.१४) महाप्रसाद वाटपाने या सोहळ्याची सांगता करण्यात आली. प्रारंभी बसवप्रभूस्वामी यांच्या उपस्थितीत डॉ. महेश ऐनापुरे व ज्योती ऐनापुरे दाम्पत्यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. बसवप्रभू स्वामी, हालशुगर संचालक महालिंग कोठीवाले यांच्या हस्ते …
Read More »काँग्रेस सत्तेसाठी युवक काँग्रेसचे कार्य महत्त्वाचे
लक्ष्मणराव चिंगळे; चिकोडी जिल्हा युवक काँग्रेसची सभा निपाणी (वार्ता) : पक्ष संघटना मजबूत असल्याने होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार विजयी होणार आहेत. त्यासाठी युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारीला लागले पाहिजे. राज्यात काँग्रेस सत्ता येण्यासाठी युवक काँग्रेसचा सिंहाचा वाटा आहे. हे लक्षात घेऊन पुन्हा या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य …
Read More »राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी ‘सद्गुरु’च्या तनुजा पाटीलची निवड
निपाणी (वार्ता) : येथील श्रीपेवाडी रोडवरील व्हीएसएम आयटी कॉलेज येथे पीयुसी जिल्हास्तरीय तायक्वांदो, ज्युदो व कराटे स्पर्धा पार पडल्या. स्पर्धेत तायक्वांदो या क्रीडा प्रकारात ५९ किलो वजन गटात मुलींच्या गटामध्ये सद्गुरु तायक्वांदो अकॅडमीच्या तनुजा पाटील हिने प्रथम क्रमांक पटकावला. तिला पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta