Friday , March 6 2026
Breaking News

कर्नाटक

युवतींची बदनामी करणाऱ्या तरुणास अखेर अटक

  खानापूर : मुलींच्या व महिलांच्या फोटोंशी छेडछाड करून इंस्टाग्रामवर अपलोड करून अश्लील कृत्य व बदनामी करणारा लोकोळी गावातील आरोपी मंथन दशरथ पाटील याला ताबडतोब अटक करून त्याला कारागृहात पाठविण्यात यावेत व त्याला कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी लोकोळी गावातील 150 पेक्षा जास्त युवती, …

Read More »

कुरली कुस्तीत सांगलीचा उमेश चव्हाण एक चक्की डावावर विजयी

  हालसिद्धनाथ यात्रेनिमित्त आयोजन : कुस्ती शौकीनांची उपस्थिती कोगनोळी : कुरली तालुका निपाणी येथे हालसिद्धनाथ यात्रेनिमित्त शिंत्रे आखाडा येथे आयोजित कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरचा उमेश चव्हाण व जाधव आखाडा इस्लामपूर येथील अजय निकम यांच्यात उमेश चव्हाण एक चक्की डावावर विजय मिळवला. पैलवान उमेश चव्हाण याला अरिहंत उद्योग समुहाचे कार्याध्यक्ष पृथ्वीराज पाटील, …

Read More »

सिद्धरामय्यांच्या ‘त्या’ विधानाने कॉंग्रेसमध्येच खळबळ

  मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळाबाबत उलट-सुलट चर्चा बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पाच वर्षांसाठी मीच मुख्यमंत्री राहणार असल्याचे वक्तव्य केल्याने काँग्रेस पक्षात मोठी खळबळ उडाली आहे. यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री म्हणून सिध्दरामय्या यांनी केवळ सहा महिने पूर्ण केले असताना अचानक पुढची पाच वर्षे मीच मुख्यमंत्री असे विधान …

Read More »

दिवाळीत हिरव्या फटाक्यानाच परवानगी

  रात्री ८ ते १० यावेळेतच फटाके वाजविण्याच्या सूचना बंगळूर : दिव्यांचा सण दीपावली जवळ येत असताना, कर्नाटक राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ पर्यावरण आणि ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी कठोर नियम लागू करत आहे. रात्री ८ ते १० यावेळेतच हिरवे फटाकेच वाजवावेत अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यात ११ ते १५ …

Read More »

कलाकार अशोक शेवाळे पुरस्काराने सन्मानित

  निपाणी (वार्ता) : आडी येथील रहिवासी व लोकनाट्य तमाशा कलाकार अशोक शेवाळे यांना तमाशा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल वडगाव आंबले (ता. पारनेर जि. अहमदनगर) येथे पुरस्काराने गौरविण्यात आले. सद्गुरु दत्तात्रय महाराज यांची 52 वी पुण्यतिथी व सद्गुरु गोदाराम बाबा महाराज यांचा अमृत महोत्सव सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार देण्यात आला. …

Read More »

बोरगाव अरिहंत दूध उत्पादक संघाकडून विक्रमी बोनस वाटप

  निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील श्री अरिहंत दूध उत्पादक संघाकडून यावर्षी सभासदांना उच्चांकी बोनस दिल्याची माहिती संघाचे प्रमुख उत्तम पाटील यांनी दिली. संघाच्या वतीने संघाच्या सभागृहात सभासदांना बोनस वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. उत्तम पाटील यांनी,संघाकडून यावर्षी म्हैस विभागातून 2 लाख 25 हजार 535 लिटर दूध तर, …

Read More »

कन्या शाळेजवळील व्हॉल्वमधून होणारी पाण्याची गळती रोखण्याची मागणी

  निपाणी (वार्ता) : यावर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने येथील जवाहर तलावातील पाणीसाठा वाढलेला नाही त्यामुळे यावर्षी निपाणीकरांना पाणीटंचाईची झळ जाणवण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीमध्ये येथील कन्या शाळेजवळील भाजी मार्केट परिसरात असलेल्या व्हॉल्वमधून निरंतरपणे पाण्याची गळती होत असल्याने मोठ्या प्रमाणात अपव्यव होत आहे. त्याकडे नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने तात्काळ लक्ष देऊन ही …

Read More »

स्वाभिमानीने अडवली उसाची वाहने

  निपाणी येथे आंदोलन; निर्णयाच्या आश्वासनाने आंदोलन मागे निपाणी (वार्ता) : गतवर्षीच्या हंगामातील प्रतिटन ४०० रुपये देण्यासह यंदाच्या हंगामात ३५०० रुपयांची एफ आर पी जाहीर करूनच उसाचा हंगाम सुरू करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली होती. पण निपाणी शिवाय भागातील काही साखर कारखान्यांनी दर जाहीर न करताच यंदाचा हंगाम सुरू …

Read More »

कलबुर्गीजवळ लॉरी-दुचाकी अपघात; पाच जणांचा मृत्यू

  कलबुर्गी : कलबुर्गी जिल्ह्यातील अफझलपूर तालुक्यातील हळ्ळोळ्ळी क्रॉसजवळ लॉरी आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. नेपाळ वंशाच्या कुटुंबातील दोन मुलांसह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला आहे. दुधणीकडून येणाऱ्या दुचाकीला विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका लॉरीने धडक दिली. सर्व मृतक अफजलपूरमध्ये फास्ट फूड रेस्टॉरंट चालवत …

Read More »

राज्योत्सव संपवून परतताना अपघात; २ जणांचा मृत्यू

  बेळगाव : कर्नाटक राज्योत्सव आटोपून नगरकडे प्रस्थान करताना एम.के. हुबळीजवळील राष्ट्रीय महामार्ग-4 वर बुधवारी रात्री दुचाकीला झालेल्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोघे जखमी झाले. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाला. ज्याठिकाणी मृतदेह पडले तेथून सुमारे 300 मीटर अंतरावर दुचाकी आढळून आली. मृतांची नाव समजू शकलेली नाहीत. …

Read More »