Thursday , March 5 2026
Breaking News

कर्नाटक

महामेळाव्याला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचा निर्धार

  जांबोटी विभागात समितीच्या वतीने जनजागृती खानापूर : कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाच्या निषेधार्थ 19 डिसेंबर रोजी आयोजित मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचा निर्धार जांबोटी भागातील समिती कार्यकर्त्यांनी केला. खानापूर तालुका म. ए. समिती नूतन कार्यकारिणी निवड करण्यासाठी व महामेळाव्यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी मध्यवर्तीने नियुक्त केलेल्या आठ सदस्यीय कमिटी व …

Read More »

पंचायत निवडणुकीस विलंब; सरकारला पाच लाखाचा दंड : उच्च न्यायालयाचे निर्देश

  बंगळूर : कर्नाटक उच्च न्यायालयाने बुधवारी राज्य सरकारला जिल्हा पंचायत आणि तालुका पंचायत निवडणुका घेण्याच्या कथित “दिरंगाईचे डावपेच” म्हणून पाच लाख रुपयांचा दंड ठोठावला. उच्च न्यायालयाने या निवडणुकांसाठी सीमांकन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तसेच ओबीसींच्या आरक्षणाची यादी पूर्ण करण्यासाठी राज्याला तीन महिन्यांची मुदत दिली आहे. सरन्यायाधीश प्रसन्ना बी. वराळे आणि …

Read More »

महाराष्ट्र – कर्नाटक राज्यात सौहार्द राखण्यासाठी मंत्र्यांची समिती स्थापन करण्याची केंद्रीय गृहमंत्र्यांची सूचना : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई

  बेंगळुरू : केंद्रीय गृहमंत्र्यांनी सीमावादाचे प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याची सूचना केली आहे. त्याचप्रमाणे कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यांमध्ये सौहार्द राखण्यासाठी प्रत्येकी तीन मंत्र्यांची नियुक्ती करण्याची सूचना देखील केल्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले. ते आज नवी दिल्लीत माध्यमांना उत्तर देत होते. केंद्रीय गृहमंत्री, कर्नाटक आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्यात आज बैठक …

Read More »

सौंदलगा हायस्कूलमध्ये शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम

  सौंदलगा : येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद रावजी पवार साहेब यांच्या रयत मधील पन्नास वर्षाच्या कारकिर्दीबद्दल कृतज्ञता सप्ताह साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या सांगता समारंभात स्कूल कमिटीचे चेअरमन रघुनाथ चौगुले हे अध्यक्षस्थानी होते. मान्यवरांच्या हस्ते रोपाला पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात केली. या कार्यक्रमात …

Read More »

सीमावादावर चर्चा करण्यासाठी सहा मंत्र्यांची समिती; अमित शाह यांचे दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निर्देश

  नवी दिल्ली : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सध्या सर्वोच्च न्यायालयात असून त्या ठिकाणी निर्णय येईपर्यंत दोन्ही राज्यांनी कोणताही वाद घालू नये, कोणताही दावा करु नये असे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिले आहे. तसेच दोन्ही राज्यांतील प्रत्येकी तीन-तीन अशा एकूण सहा मंत्र्यांची एक समिती तयार करावी आणि सीमावादावर चर्चा करावी …

Read More »

दि. जांबोटी मल्टीपर्पज को- ऑपरेटिव्ह सोसायटीच्यावतीने दिनदर्शिकेचे प्रकाशन

  खानापूर (प्रतिनिधी) : जांबोटी (ता. खानापूर) येथील दि. जांबोटी मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीच्या वतीने बुधवारी दिनदर्शिकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच मॅरेथॉनमधील विजयी स्पर्धकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दि. जांबोटी मल्टीपर्पज को- ऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक चेअरमन विलासराव बेळगांवकर उपस्थित होते. तर व्यासपीठावर उपाध्यक्ष पुंडलिक नाकाडी, नगराध्यक्ष नारायण मयेकर, नगरसेवक …

Read More »

खानापूर शहराच्या गटारीचे दुषित पाणी मलप्रभेत, ग्रामपंचायत संघटनेने घेतली दखल

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील गटारीचे दुषित पाणी मलप्रभा नदी घाटावरील ड्रेनेज पाईप फुटून नदीच्या पाण्यात मिसळत आहे. याचा परिणाम शहरावासीयाच्या आरोग्याला तसेच मलप्रभा नदीवर येणाऱ्या भाविकांना स्नान केल्याने त्रास होत आहे. या शिवाय गटारीचे दुषित पाणी मलप्रभा नदीत मिसळत असल्याने कुप्पटगिरी, जळगे, करंबळ, पारिश्वाडसह बैलहोंगल तालुक्यातील गावाना या …

Read More »

खानापूर म. ए. समिती तात्पुरती स्थगित, बरखास्त नव्हे!

  खानापूर : 2018 पासून खानापूर तालुक्यात महाराष्ट्र एकीकरण समितीचे दोन गट कार्यरत होते. निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार मध्यवर्तीच्या नेतृत्वाखाली ऍड. राजाभाऊ पाटील, प्रकाश मरगाळे, रणजित चव्हाण पाटील, ऍड. एम. जी पाटील यांच्या उपस्थितीत विखुरलेल्या दोन्ही गटात 9 नोव्हेंबर रोजी खानापूर समितीत एकी घडवून आणली होती. त्यावेळी खानापूर म. ए. समिती …

Read More »

खानापूर तालुका समितीची महत्वपूर्ण बैठक आज

  खानापूर : दि. 19 डिसेंबर रोजी होणाऱ्या महामेळाव्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक आज बुधवार दि. 14 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता शिवस्मारक येथे बोलाविण्यात आली आहे. तरी समितीच्या कार्यकर्त्यांनी वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन खानापूर तालुका म. ए. समितीच्या आठ सदस्यीय कमितीतर्फे करण्यात आले …

Read More »

सीमाप्रश्नी गृहमंत्र्याच्या नेतृत्वाखाली आज दिल्लीत बैठक

  महाराष्ट्र – कर्नाटकाचे मुख्यमंत्री रहाणार उपस्थित बंगळूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दीर्घकाळ रेंगाळत पडलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर चर्चा करण्यासाठी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची उद्या (ता.१४) नवी दिल्ली येथे बैठक बोलाविली आहे. त्यामुळे कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्यासाठी नवी दिल्लीला रवाना होतील, असे …

Read More »