Thursday , March 5 2026
Breaking News

कर्नाटक

खानापूर समितीचे सोमवारपासून जनजागृती दौरे

  उद्या नियोजनासंदर्भात बैठक खानापूर : तालुक्यात मराठी भाषिकांची एकजूट रहावी यासाठी सोमवारपासून जनजागृती करण्यात येणार असल्याचा निर्णय आज झालेल्या म. ए. समितीच्या बैठकीत घेण्यात आला. खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक दि. 7 ऑक्टोबर रोजी शिवस्मारक येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी खानापूर तालुक्याचे माजी आमदार दिगंबर पाटील हे …

Read More »

प्रभागात विकासकामांंना चालना देऊन “नारळ फोडणार” : सुचिता परीट

  संकेश्वर (महंमद मोमीन) : प्रभागातील लोकांना आश्वासनाच्या झुल्यावर झुलवत ठेवण्याचे काम आपण कदापी करणार नाही. नगरोथान योजनेतून निधी मिळवून विकास कामांना चालना देऊनच आपण विकास कामांचा नारळ फोडणार असल्याचे प्रभाग क्रमांक १० मधील नगरसेविका सौ. सुचिता श्रीकांत परीट यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. त्या म्हणाल्या, प्रभाग १० मधील कोण-कोणती …

Read More »

संकेश्वरात श्रीनिधी-जगदीश यांचे सहर्ष स्वागत

  संकेश्वर (महंमद मोमीन) : सायकलवरून “निसर्ग वाचवा” चा संदेश घेऊन मंगळूर ते काश्मीर प्रवास दौऱ्यावर निघालेले सायकलपटू श्रीनिधी शेट्टी, जगदीश कोलार यांचे संकेश्वरात हाॅटेल मालक संघ आणि वंदे मातरम् योग केंद्रातर्फे सुधाकर शेट्टी यांनी सहर्ष स्वागत केले. यावेळी बोलताना सुधाकर शेट्टी म्हणाले, श्रीनिधी शेट्टी, जगदीश कोलार हे निसर्ग वाचवा, …

Read More »

संकेश्वरातील स्केटिंग स्पर्धेला उदंड प्रतिसाद..

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात नुकतीच खुली रोलर स्केटिंग स्पर्धा पार पडली. त्याला स्पर्धकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. हुक्केरी तालुका रोलर स्केटिंग अकॅडमी, शाखा संकेश्वरच्या वतीने खुल्या रोलर स्केटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. संकेश्वर अकॅडमीच्या स्केटरनी स्पर्धेत सहभागी होऊन घवघवीत यश मिळवले आहे. स्पर्धेचे उदघाटन हिरण्यकेशी साखर कारखान्याचे व्यवस्थापक …

Read More »

मृतदेह आढळल्याने करोशी गावात खळबळ

  चिक्कोडी : चिक्कोडी तालुक्यातील करोशी गावात एका तरुणाचा मृतदेह आढळल्याची खळबळजनक घटना घडली. दरम्यान मृतदेहाची ओळख पटली असून सुनील साळुंके (रा. करोशी ता. चिक्कोडी) असे त्या मृत व्यक्तीचे नाव आहे. मृत सुनील रविवारी पहाटे आईला कामावर जाणार असल्याचे सांगून घराबाहेर पडला होता. त्यानंतर पाच दिवसानंतर आज शुक्रवार दि. 7 ऑक्टोबर …

Read More »

दर जाहीर केल्याशिवाय शेतकऱ्यांनी ऊस तोड देऊ नये

  राजू पोवार : जिल्हा पंचायत बैठकीत निर्णय निपाणी (वार्ता) : येथील हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांची शंभर किलो मिळणारी साखर रद्द करून केवळ ५० किलो साखर देऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बोळवण केली आहे. त्या संदर्भात वार्षिक सभेत प्रश्न विचारूनही अध्यक्षांनी या प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर समांतर सभा …

Read More »

नवरात्रोत्सवात विद्यार्थ्यांनी केला पोषक आहाराचा जागर

जांबोटी विद्यालयाने राबविले गावोगावी उपक्रम खानापूर : जांबोटी परिसरात अनेक खेड्यात नवरात्र उत्सव जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा झाला. या उत्सवादरम्यान जांबोटी माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अनेक खेड्यात समतोल आहाराचे महत्त्व पटवून देण्याचे काम केले. कापोली (के.सी.), कुसमळी, राजवाडा, रामापुर पेठ, हब्बनहट्टी, मुडगई, चिखले आदी खेड्यात भजन -प्रवचन, दौड, रास दांडिया सुरु असलेल्या …

Read More »

कामगार चौक नवरात्र उत्सव मंडळातर्फे महाआरती

  निपाणी (वार्ता) : शहर आणि उपनगरातील काही नवरात्र उत्सव मंडळांनी दुर्गादेवीच्या मूर्तीचे दसर्‍यानंतर विसर्जन केले आहे. येथील कामगार चौकातील दुर्गा देवी उत्सव मंडळातर्फे शुक्रवारी (ता.7) महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. नगराध्यक्ष जयवंत भाटले यांच्या हस्ते ही आरती करण्यात आली. त्यानंतर बसव गोपाळ अनाथ आश्रमातील विद्यार्थ्यांना जेवणाचे वाटप झाले. त्यानंतर …

Read More »

स्वच्छतेचा खरा संदेश देणारे सफाई कामगारच

  मुख्याधिकारी कल्याणशेट्टी : सफाई कामगारांची आरोग्य तपासणी निपाणी (वार्ता) : मंदिरातील भगवंतांच्या नंतर स्वच्छतेला प्रथम प्राधान्य देण्यात आले आहे. यासाठी आपण सर्वांनी स्वच्छतेला प्राधान्य देऊन आपले आरोग्य, घर, परिसर, गाव स्वच्छ ठेवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजे. लोकांची सेवा करणारे हेच खरे सफाई कामगार आहेत. आपण शासकीय कर्मचारी असलो तरी …

Read More »

निपाणी शहरात दसरा सणानिमित्त विविध ठिकाणी सीमोल्लंघन

  निपाणी (वार्ता): शहर आणि परिसरात दसर्‍यानिमित्त विविध ठिकाणी सीमोल्लंघनाचा कार्यक्रम पार पडला. येथील सोमनाथ मंदिर येथे दसर्‍यानिमित्त सीमोल्लंघन कार्यक्रम उत्साहात पार पडला. बोरगाव येथील युवा नेते उत्तम पाटील यांच्या हस्ते शमीच्या पानाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सोने लुटण्याचा कार्यक्रम झाला. याप्रसंगी नगरसेवक संजय सांगावकर, दिलीप पठाडे, शिरीष कमते, दत्ता …

Read More »