बंगळूर : चन्नरायपटण तालुक्यातील करेहळ्ळीजवळ रात्री उशिरा रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला दुचाकीची धडक बसल्याने दोन मुलींसह एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. योगेशचारी (३५), लक्ष्मी (२८) आणि लोकेशच्या बहीणीच्या मुले, गणवी (१२) आणि लेखना (४) अशी मृतांची नावे आहेत. योगेशचारी हे मूळचे तिपातुरु तालुक्यातील एडगरहळ्ळी गावचे असून …
Read More »दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ग्रेस मार्क्स
कोविडच्या परिणामातून विद्यार्थी सावरले नसल्याने निर्णय बंगळूर : मार्च-एप्रिल २०२२-२३ मध्ये होणार्या दहावी (एसएसएलसी) आणि बारावी (द्वितीय पीयूसी) वार्षिक परीक्षा लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाने एक गोड बातमी दिली आहे. मागील वर्षाप्रमाणे यावर्षीही विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स (कृपांक) मिळतील. गेल्या वर्षी कोविडमुळे दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स देण्यात आले होते. असेच …
Read More »अंडी घोटाळ्यामुळे महत्त्वाचे पद गेले
काकासाहेब पाटील : निपाणीत गॅरंटी कार्ड वितरण निपाणी : आपल्या आमदार कीच्या काळात काळम्मावाडी पाण्याचा करार, वेदगंगा नदीपासून पाइपलाइन, खरी कॉर्नर येथे ब्रिज, निपाणी तालुका निर्मिती, निपाणी मतदारसंघ पुनरुज्जीवन अशी शाश्वत कामे केली आहेत. निपाणी रेल्वेसाठी युद्धपातळीवर प्रयत्न करून सर्वेक्षण करेपर्यंत पाठपुरावा केला. पण त्यानंतर मंत्री आणि खासदार झालेल्यांनी या …
Read More »आवरोळी मठात विविध कार्यक्रमाने होणार शांडिल्य महाराजांचा सहावा पुण्यस्मरण कार्यक्रम
खानापूर (प्रतिनिधी) : आवरोळी (ता. खानापूर) येथील श्री रूद्र स्वामी बेळकी आवरोळी मठाच्या आवारात परमपूज्य शांडिल्य महाराजांचा सहावा पुण्यस्मरण कार्यक्रमाचे आयोजन गुरूवारी दि. २ मार्च रोजी सकाळी ९.३० होणार आहे, अशी माहिती मठाधीश पं. पू. चन्नबसव देवरू स्वामी यांनी आयोजित कार्यक्रमात दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, या कार्यक्रमाला …
Read More »कर्नाटक कालव्यातील गाळ काढण्याची मागणी
घाणीचे साम्राज : शेतकरी आक्रमक कोगनोळी : महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्या कालव्यात गाळ व घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे महाराष्ट्रातून येणाऱ्या पाण्याला अडथळा निर्माण होत आहे. पाणी कमी येत असल्याने कर्नाटक सीमा भागातील पिके पाण्याअभावी वाळून जात आहेत. यासाठी कर्नाटक प्रशासनाने महाराष्ट्रातील म्हाकवे गावापासून कर्नाटक हद्दीतील कालव्यातील गाळ व स्वच्छता …
Read More »कर्नाटक राज्यातील हाॅल्टिकल्चर काॅलेजच्या विद्यार्थ्याचे नॅशनल लेव्हल एनएसएस योजनेंतर्गत स्पर्धेत यश
खानापूर (प्रतिनिधी) : नॅशनल लेव्हल राष्ट्रीय सर्विस योजनेंतर्गत दि. १४ फेब्रुवारी ते दि. २० पर्यंत आम्बाला (हरियाणा) येथील महर्षि मार्केडेश्वर डीम्ड विद्यापीठ येथे देशातील १७ राज्यातील विविध काॅलेजच्या २०० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेऊन कर्नाटक राज्यातील हाॅल्टिकल्चर काॅलेजच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे मानकरी शिर्शि …
Read More »बीपीएल कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला १० किलो मोफत तांदूळ कॉंग्रेसची तिसरी घोषणा
बंगळूर : कर्नाटक काँग्रेसने विधानसभा निवडणुकीपूर्वी तिसरी ‘हमी’ योजना जाहीर केली, अन्न भाग्य योजनेंतर्गत दारिद्र्य रेषेखालील (बीपीएल) कुटुंबातील प्रत्येकसदस्याला दरमहा दहा किलो मोफत तांदूळ देण्याचे आश्वासन दिले. शुक्रवारी (ता. २४) बंगळुर येथे एका एका पत्रकार परिषदेत बोलताना प्रद्श कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी जाहीर केले, की पक्षाच्या …
Read More »निपाणी येथील शर्यतीत शिवानंद भोसलेंची घोडागाडी प्रथम महाशिवरात्रीनिमित्त आयोजन
निपाणी (वार्ता) : महादेव गल्लीमधील महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम व स्पर्धा पार पडल्या. गुरुवारी (ता.२३) सायंकाळी आयोजित जनरल घोडागाडी शर्यतीमध्ये निपाणीच्या शिवानंद भोसले यांच्या गाडीने प्रथम क्रमांक पटकावून १५ रुपयांचे बक्षीस मिळविले. या शर्यतीमध्ये यांच्या यमगरणीच्या रामचंद्र मोरे यांच्या गाडीने द्वितीय क्रमांकाचे १० हजार रुपये बक्षीस पटकाविले. तर …
Read More »ट्रक- कारच्या भीषण अपघात; 5 जण जागीच ठार
हुबळी : पादचाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्नात भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटून कारने समोर जाणाऱ्या ट्रकला मागून जोरदार धडक दिल्यामुळे घडलेल्या भीषण अपघातात बालकासह 5 जण जागीच ठार आणि चौघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना काल गुरुवारी रात्री 9 च्या सुमारास धारवाडनजीक पुणे -बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर घडली. अपघातातील मृतांची नावे नागप्पा इराप्पा …
Read More »हंचिनाळ येथे रयत संघटनेच्या शाखेचे उदघाटन
कोगनोळी : हंचिनाळ (तालुका निपाणी) येथे रयत संघटनेच्या ४३ व्या शाखेचे उदघाटन संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू पोवार यांच्या हस्ते झाले. हंचिनाळ शाखाध्यक्ष मोहन नलवडे यांनी स्वागत केले. याप्रसंगी बोलताना राजू पोवार म्हणाले, आम्ही गेली २० वर्षे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासाठी आंदोलने, मोर्चे याद्वारे अहोरात्र झटत आहोत. मात्र देशातील व राज्यातील सत्ताधारी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta