Sunday , December 14 2025
Breaking News

कर्नाटक

खानापूर – रामनगर रस्त्याचे काम लवकरच करण्याचे आश्वासन

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालयास निवेदन खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आज धारवाड येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालयातील प्रकल्प संचालक यांना निवेदन देण्यात आले.  खानापूर ते रामनगर पर्यंत हा महामार्ग निर्माण करण्याचे काम काही वर्षापासून या-ना त्या कारणाने रखडलेला आहे. या महामार्गावर अवलंबून …

Read More »

कस्तुरीरंगन अहवालाविरोधात खानापूर तालुक्यातील सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्रीत लढा उभारावा; मणतुर्गा ग्रामस्थांची मागणी

  खानापूर (प्रतिनिधी) : केंद्र सरकारने कस्तुरीरंगन अहवालाच्या अंमलबजावणीसाठी सुचना जारी केली असून 60 दिवसाची मुदत दिली आहे. याला तालुक्यातील विविध गावातून तसेच संघटनांतून विरोध करण्यात येत असून यासाठी तालुक्यातील सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्रीत येऊन अभ्यासु जानकाराच्या सल्ल्यानुसार यावर चर्चा करून योग्य ती पावले उचलावी, अशी माहिती मणतुर्गा गावचे व …

Read More »

टिप्परने ५४ बकऱ्यांना चिरडले

  अंमणगी-मुगळी रस्त्यावर अपघात संकेश्वर (महंमद मोमीन) : अंमणगी-मुगळी रस्त्यावर आज सायंकाळी ५ वाजता भरधाव टिप्परने बकऱ्यांना चिरडून झालेल्या अपघातात सर्व ५४ बकरी दगावले आहेत. अपघाताची पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी अंमणगी-मुगळी येथे बकरी चारवून घराकडे परतणाऱ्या हालप्पा हेगडे, लगमण्णा हेगडे यांच्या कळपातील बकऱ्यांना अंमणगीहून मुगळीकडे भरवेगात निघालेल्या टिप्पर क्रमांक …

Read More »

श्रींचा वाढदिवस भक्तीभावाने साजरा

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठाचे श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजींचा वाढदिवस भक्तगणांनी श्रींच्या आशीर्वादाने भक्तीमय वातावरणात साजरा केला. आज दिवसभर भक्तगणांनी श्रींची प्रत्यक्ष भेट घेऊन श्रींना शाल श्रीफळ पुष्पहार अर्पण करून सविनय शुभेच्छा प्रदान केल्या.सोबत श्रींचा आर्शीवादही घेतला. श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजी …

Read More »

संकेश्वर येथील अंबिका नगर रस्ता मुरुमीकरणाला चालना..

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर अंबिका नगरला जाणारा रस्ता खड्डेमय बनल्याने या मार्गे ये-जा करणाऱ्या शाळकरी मुलांची, शेतकऱ्यांची आणि नागरिकांची चांगलीच गैरसोय होऊ लागल्याची तक्रार युवा नेते महेश दवडते यांनी केली होती. त्यांनी येथे गटारची सोय नसल्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यांवरून वाहताना दिसत असल्याचे तसेच पावसाचे पाणी खड्ड्यात साचून राहिल्याने …

Read More »

डीकेशी, सिद्धू अन एचडीकेंना मुख्यमंत्र्यांचा टोला

  बेेंगळुरू : मुख्यमंत्री कोणी व्हायचे हे जनता ठरवेल. लोक निर्णय घेण्यापूर्वीच मुख्यमंत्री पदासाठी स्पर्धा करत आहेत, असा टोला आज डी. के. शिवकुमार, सिद्धरामय्या आणि एचडीके यांना मुख्यमंत्र्यांनी लगावला. वक्कलिगा समाजाच्या मुख्यमंत्र्याच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री बोम्मई यांनी आज गुरुवारी मंड्या जिल्ह्यातील केआरपेटे येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ही त्यांच्या पक्षाची अंतर्गत बाब …

Read More »

निट्टूर मराठी शाळेची इमारत व व्यायाम शाळेची खोली जमीनदोस्त; तहसीलदारांना निवेदन

खानापूर (प्रतिनिधी) : निट्टूर (ता. खानापूर) येथील उच्च प्राथमिक मराठी शाळेची इमारत तसेच श्री स्वामी विवेकानंद व्यायाम शाळेची खोली नुकताच झालेल्या मुसळधार पावसामुळे जमिनदोस्त झाल्या. त्यामुळे मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांना तसेच श्री स्वामी विवेकानंद व्यायाम शाळेच्या व्यायामपट्टूची मोठी समस्या निर्माण झाली आहे. तेव्हा तहसीलदारांनी पाहणी करून समस्या दुर करावी, अशा मागणीचे …

Read More »

बिडी येथील नेहरू मेमोरियल संयुक्त पदवीपूर्व महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

  खानापूर : बिडी ता. खानापूर येथील नेहरू मेमोरियल संयुक्त महाविद्यालयत इयत्ता दहावीच्या आणि बारावी परीक्षेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच इयत्ता अकरावी, नववी व आठवीत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला. विद्यार्थ्यांनी सकारात्मक विचार करून, आई-वडीलांचे कष्ट डोळ्यासमोर ठेवून तसेच मोबाईलचा कमीत वापर करावा, नवीन शैक्षणिक तंत्रज्ञानाच्या …

Read More »

टोल नाक्यावर रुग्णवाहिकेचा भीषण अपघात, रुग्णासह चौघांचा मृत्यू; धक्कादायक घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद

  उडुपी : कर्नाटकमधील उडुपी जिल्ह्यामधील शिरुर येथे एका रुग्णवाहिकेचा भीषण अपघात झाला असून हा घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. बुधवारी (२० जुलै) झालेल्या या अपघातामध्ये रुग्णवाहिका टोल नाक्यावरील गेटला धडकून रस्त्याच्या बाजूला पडल्याचं सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसत आहे. या अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे. समोर …

Read More »

सौंदलगा येथे श्री मरगुबाई देवीची यात्रा उत्साहात साजरी

  सौंदलगा : सौंदलगा येथे मंगळवारी (ता.१९) श्री मरगुबाई देवीची यात्रा ग्रामस्थांकडून उत्साहात साजरी करण्यात आली. मरगुबाई देवीची यात्रा परंपरेनुसार श्रावण महिना सुरू होण्याअगोदर एक आठवडा आधी साजरी करण्यात येते. या देवीच्या यात्रेनंतर येणाऱ्या श्रावण महिन्यातील पाच मंगळवार पाळक पाळला जातो. या यात्रेनिमित्त परंपरेनुसार कुंभार गल्लीतील सर्व महिला एकत्र येऊन …

Read More »