Sunday , July 26 2026
Breaking News

कर्नाटक

एसएसएलसी विद्यार्थ्यांसाठी 4 डिसेंबरपासून व्याख्यानमालेचे आयोजन

  खानापूर : येत्या 4 डिसेंबर 2022 पासून खानापूर तालुक्यातील एसएसएलसी विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील एकूण 6 केंद्रात मराठी माध्यमासाठी व 3 केंद्रात कन्नड माध्यमासाठी या व्याख्यानाचे आयोजन केले आहे. ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठान खानापूर या संस्थेची बैठक नुकताच खानापूर येथे झाली त्यावेळी ही माहिती देण्यात आली. ज्ञानवर्धिनीचे संचालक …

Read More »

किल्ले श्री सडावर स्वच्छता संवर्धन मोहीम

  छत्रपती शंभूराजे परिवाराचा आदर्शदायी उपक्रम खानापूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गडकोटांची सद्यस्थिती खूपच दयनीय आहे. या गडकोटाना गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी शिवकर्यातील अनेक संघटना कार्यरत आहेत. याच अनुषंगाने छत्रपती शंभूराजे परिवार यांच्या वतीने श्री पावणाई देवीच्या परमपवित्र भूमीत अर्थात किल्ले श्री सडा येथे वार शनिवार 24/12/2022 …

Read More »

खानापूरात जेडीएस पक्षाचा मेळावा संपन्न

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका जेडीएस पक्षाचा मेळावा मंगळवारी येथील लोकमान्य भवनात मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेडीएस नेते ऍड. एच. एन. देसाई होते. तर मेळाव्याला प्रमुख उपस्थिती म्हणून जेडीएस पक्षाचे राज्याध्यक्ष सी. एम. इब्राहिम उपस्थित होते. यावेळी जेडीएस नेते नासीर बागवान, जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण पाटील, नगरसेविका मेघा …

Read More »

सीमाप्रश्नी कर्नाटकाच्या न्याय भूमिकेचा बोम्मईंना साक्षात्कार

  राज्य पुनर्रचना तत्वाच्या पायमल्लीचाच विसर, दिल्लीत वकीलांशी चर्चा बंगळूर : सीमावादावर महाराष्ट्राविरुद्ध कायदेशीर लढाईस कर्नाटक सज्ज असल्याचे सांगून मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मंगळवारी नवीदिल्लीत बोलताना “चांगले परिणाम” होण्याचा विश्वास व्यक्त केला. राज्यघटना आणि राज्य पुनर्रचना कायद्यानुसार राज्याची भूमिका न्याय्य असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले, परंतु सीमाभागाच्या बाबतीत राज्य पुनर्रचनेच्या तत्वाचीच पायमल्ली …

Read More »

इचलकरंजी पाणी योजनेबाबत वेदगंगा काठाची भूमिका काय?

काळम्मावाडी मुळेच वेगवेगळ्या राहणार कायम पाणी : ‘दूधगंगे’च्या लढ्यात सीमावाशीयांनी झोकून द्यावे निपाणी (वार्ता) : इचलकरंजीच्या पाणी योजनेबाबत सीमाभागातील महाराष्ट्रात दूधगंगा काठावर असलेल्या नागरिकास शेतकऱ्यांनी विरोध करून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर ही मोर्चा काढला. त्यामध्ये कर्नाटक सीमाभागातील रयत संघटनेसह विविध शेतकरी संघटना आणि शेतकरीही सहभागी झाले होते. वेदगंगेचे निरंतर पाणी हे …

Read More »

आंतरराज्य पोलिसांची निपाणीत बैठक

बुधवारी सर्वत्र कडेकोट बंदोबस्त : सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांवर कारवाई निपाणी (वार्ता) : महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न बुधवारी (ता.३०) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (ता.२९) सकाळी येथील शासकीय विश्रामधामात आंतरराज्य पोलिसांची बैठक झाली. त्यामध्ये होणाऱ्या सुनावणीनंतर कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी या बैठकीत आंतरराज्य पोलिसांची चर्चा …

Read More »

राज्य विणकर संघातर्फे तहसीलदार कार्यालयावर मोर्चा

विविध मागण्यांचे निवेदन : पावरलूम कारखानदार, कामगारांचा समावेश निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्य विणकर संघाच्या निपाणी आणि चिकोडी तालुक्यातील कारखानदार, मजूर आणि इतर घटकातर्फे विविध मागण्यासाठी सोमवारी (ता.२८) दुपारी येथील तहसीलदार कार्यालयावर विराट मोर्चा काढला. त्यानंतर येथील तहसीलदार कार्यालयाला विविध मागण्यांचे निवेदन देऊन मागण्यांना मान्य केल्यास या पूर्ण काळात तीव्र …

Read More »

बोरगाव अरिहंत संस्थेच्या गळतगा शाखेचा २२ वा वर्धापन दिन

निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील अरिहंत क्रेडिट सौहार्द संस्थेच्या गळतगा शाखेचा २२ वा वर्धापन दिन युवा नेते उत्तम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला. प्रारंभी शाखेचे सल्लागार व मान्यवरांच्या उपस्थितीत सत्यनारायण पूजा झाली. त्यानंतर य उत्तम पाटील यांचा सत्कार करण्यात आला. संजय कागे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ज्येष्ठ …

Read More »

आम आदमी पक्षाच्या निपाणी विभागातर्फे संविधान दिन साजरा

निपाणी (वार्ता) : आम आदमी पक्षाच्या येथील विभागाच्या वतीने संविधान दिवसाचेऔचित्य साधून घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नगरपालिका  येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याशिवाय जत्राट वेस येथील पुतळ्यासही पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले. आम आदमी पक्षाचे निपाणी विभागीय अध्यक्ष डाॅ. राजेश बनवन्ना यांनी भारतीयसंविधानातील सखोल गोष्टींवर …

Read More »

ओलमणीजवळ खासगी बस उलटून अनेक जण जखमी

  खानापूर : ओलमणी गावाजवळ खासगी बस उलटून अनेक जण जखमी झाले. सदर बस गोव्यातील मडगावहून बैलूर गावाकडे जात होती. बसमधील लोक लग्न समारंभासाठी जात होते. पहाटे 4.30 च्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पलटी झाली. अनेक प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी 9 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्वजण …

Read More »