संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात आज देवशयनी आषाढी एकादशी भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. येथील गांधी चौक विठ्ठल-रखुमाई मंदिर आणि गोंधळी गल्लीतील श्री विठ्ठल मंदिरात सकाळपासून दर्शनासाठी भक्तगणांनी मोठी गर्दी केलेली दिसली. भक्तगण रांगेत उभे राहून विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेवून पुनित होताना दिसले. संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठाचे श्री सच्चिदानंद अभिनव …
Read More »गर्लगुंजीत मराठी मुलांच्या शाळेची दुसरी वर्गखोली जमिनदोस्त
खानापूर (प्रतिनिधी) : गर्लगुंजीत (ता. खानापूर) येथील उच्च प्राथमिक मराठी मुलांच्या शाळेच्या इमारतीची वर्ग खोली एप्रिलमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने जमिनदोस्त झाली. पाठोपाठ शुक्रवारी रात्री पुन्हा एक वर्गखोली कौलारू छतासह जोरदार पावसामुळे जमिनदोस्त झाली तर अजून दोन खोल्या पडण्याच्या मार्गावर आहेत. गेल्या दहा वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या कौलारू वर्गखोलीचे काम निकृष्ट …
Read More »सद्गुरुंचे सानिध्य लाभल्यास अंतरबाह्य सार्थक मिळते!
प. पू. महेशानंद स्वामीजी यांचे प्रतिपादन कोगनोळी : मानवी जीवनाचे अंतरबाह्य सार्थक हे सद्गुरुंच्या सानिध्यामध्ये राहिल्यामुळे मिळते असे विचार प. पू. महेशानंद स्वामीजी यांनी व्यक्त केले. हंचिनाळ के. एस. (ता. निपाणी) येथील प. पू. ईश्वर स्वामीजी भक्ती योगाश्रम मठामध्ये गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त आयोजित प्रवचन सोहळ्यामध्ये संतांचे जीवन चरित्र या विषयावर पाचवे …
Read More »सौंदलगा येथे पावसामुळे निवारा पडल्यामुळे एक म्हैस दगावली
सौंदलगा : सौंदलगा येथे शेतात बांधलेल्या जनावरांचा निवारा पडून संदीप रवींद्र पाटील यांची म्हैस दगावली. सौंदलगा येथील शेतकरी संदीप पाटील यांनी शेतात जनावरांसाठी अड्डा केला होता. मात्र दोन दिवस जोरात झालेल्या पावसामुळे बांधलेला निवारा पडल्यामुळे एक म्हैस दगावली असून बाकीच्या एक म्हैस व दोन रेडके जखमी झाले आहेत. या पडलेल्या …
Read More »खानापूर मराठी मुलींच्या शाळेचे शिक्षक सुतार यांचा निवृत्तीनिमित्त सत्कार
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर येथील चिरमुरकर गल्लीतील मराठी उच्च प्राथमिक मुलींच्या शाळेचे शिक्षक एन. जे. सुतार हे 36 वर्षाच्या शिक्षकी सेवेतून नुकताच निवृत्त झाले. यानिमित्ताने शाळेत निरोप समारंभ कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला शिक्षक संयोजक क्रांती पाटील, एसडीएमसी अध्यक्ष परशराम गुरव, उपाध्यक्षा शितल गुरव, सदस्य जोतिबा गुरव, शिवाजी गोंधळी, संजू …
Read More »अमरनाथमध्ये अडकलेल्या राज्यातील नागरिकांना वाचवण्यासाठी उपाय : मुख्यमंत्री बोम्मई
बेंगळुर : अमरनाथ यात्रेत राज्यातील 100 हून अधिक कन्नडिग सहभागी झाले असून ते सुरक्षित आहेत. आम्ही तिथल्या राज्य सरकारच्या सतत संपर्कात आहोत आणि बचावकार्य सुरू आहे बसवराज बोम्मई यांनी सांगितले. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बंगळुरूमधील त्यांच्या आरटी नगर निवासस्थानी शनिवारी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की, अमरनाथ यात्रेदरम्यान ढगफुटीमुळे 15 लोकांचा …
Read More »वडिलांच्या बाराव्या दिवशी राबवले विविध स्तुत्य उपक्रम
कोगनोळी : हदनाळ तालुका निपाणी येथील कैलासवासी विठ्ठल ज्ञानू राजगुडे वय 79 वर्षे यांच्या निधनानंतर बाराव्या दिवशी पारंपारिक पद्धतीना फाटा देत गावातील सुमारे शंभर वारकऱ्यांना ज्ञानेश्वरीचे वाटप केले. मराठी शाळेतील पहिली ते आठवी विद्यार्थ्यांना 1000 वह्यांचे वाटप केले. तसेच मतिवडे येथील भारतीय सेवा आश्रमास ब्लॅंकेट भेट व खाऊचे वाटप करून …
Read More »शालेय विद्यार्थ्यांना मिळणार बूट, सॉक्सचे दोन जोड
कॉंग्रेसच्या टीकेनंतर मुख्यमंत्र्यांची घोषणा, १३२ कोटी अनुदान मंजूर बंगळूर : सरकार सरकारी शाळांमधील प्रत्येक विद्यार्थ्याला शूज आणि मोज्यांचे दोन जोड वितरित करेल, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी शुक्रवारी जाहीर केले. सरकारने विद्यार्थ्यांना अद्याप बूट, सॉक्स वितरित केले नसल्याबद्दल कॉंग्रेसने सरकारवर जोरदार हल्ला केल्यानंतर सरकारने हा निर्णय जाहीर केला. २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात …
Read More »दोस्ताने ब्लेडने दोस्तांचा गळा चिरला
चिल्लर पैशांच्या व्यवहारातून प्राणघातक हल्ला संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात आज शुक्रवार दि. ८ रोजी दुपारी १२ वाजता वडर गल्लीत दोस्तांने ब्लेडने दोघा दोस्तांचा गळा चिरल्याची घटना घडली आहे. ब्लेडने गळा चिरल्याने दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारार्थ बेळगांव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे …
Read More »काय शाळा, काय ग्राऊंड….
संकेश्वर (प्रतिनिधी) : अंकले तालुका हुक्केरी येथील सरकारी उच्च प्राथमिक कन्नड-मराठी शाळेची दुरावस्था झालेली दिसत आहे. शाळेतील गळक्या वर्गात विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन शिक्षण घ्यावे लागत आहे. शाळेच्या छतावरील बरीच कौले फुटल्याने पावसाचे पाणी थेट शाळेत प्रवेश करु लागले आहे. त्यामुळे शाळेतील शिक्षक ठिक-ठिकाणी बादल्या ठेवून त्यावर कसाबसा तोडगा काढण्याचा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta