Monday , December 15 2025
Breaking News

कर्नाटक

काय शाळा, काय ग्राऊंड….

संकेश्वर (प्रतिनिधी) : अंकले तालुका हुक्केरी येथील सरकारी उच्च प्राथमिक कन्नड-मराठी शाळेची दुरावस्था झालेली दिसत आहे. शाळेतील गळक्या वर्गात विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन शिक्षण घ्यावे लागत आहे. शाळेच्या छतावरील बरीच कौले फुटल्याने पावसाचे पाणी थेट शाळेत प्रवेश करु लागले आहे. त्यामुळे शाळेतील शिक्षक ठिक-ठिकाणी बादल्या ठेवून त्यावर कसाबसा तोडगा काढण्याचा …

Read More »

चिक्कोडी तालुक्यातील 4 बंधारे पाण्याखाली

चिक्कोडी : महाराष्ट्राच्या कोकण भागात पावसाचे थैमान सुरूच आहे. त्यामुळे चिक्कोडी तालुक्यातील 4 पूल पाण्याखाली बुडाले आहेत. महाराष्ट्राच्या कोकण भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे आता चिक्कोडी तालुक्यातील कृष्णा व तिच्या उपनद्या वेदगंगा व दूधगंगा नद्यांच्या पाणी पातळीत क्षणोक्षणी वाढ होत आहे. त्याशिवाय यडूर-कल्लोळ, मांजरी-सौंदत्ती, मलिकवाड-दत्तवाड, एकसंबा-दानवाड हे 4 …

Read More »

स्वराज्यरक्षक प्रतिष्ठानतर्फे जिल्हा पोलीस प्रमुखांचा सत्कार

निपाणी (वार्ता) : बेळगाव जिल्ह्याचे नूतन पोलीस प्रमुख संजीव पाटील यांचा येथील कर्नाटक राज्य स्वराज्य रक्षक प्रतिष्ठान यांच्यामार्फत स्वराज्य रक्षक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नवनाथ चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी निपाणी भागातील कायदा व सुव्यवस्था आणखीन सुरळीत करण्याची विनंती केली. त्यावेळी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष उत्तम कामते, उपाध्यक्ष विजय कामते, …

Read More »

बुदिहाळ- पंढरपूरला दिंडी रवाना

14 वर्षांची परंपरा : वारकर्‍यांच्या लक्षणीय सहभाग निपाणी : आषाढी वारीनिमित्त बुदिहाळ येथील वारकर्‍यांची दिंडी पंढरपूरला रवाना झाली. यावर्षी दिंडीचे 14 वे वर्ष असून त्यामध्ये वारकर्‍यांचा लक्षणीय सहभाग होता. यावेळी गावातील प्रमुख मार्गावरून दिंडी प्रदक्षिणा काढण्यात आली. प्रारंभी रयत संघटनेचे चिक्कोडी जिल्हाध्यक्ष राजू पोवार यांच्या हस्ते दिंडी वाहनांचे पूजन करण्यात …

Read More »

फौजदार नियुक्ती घोटाळा करणार्‍यांची गय नाही

गृहमंत्री आरग ज्ञानेंद्र : निपाणीत पोलीस कार्यालय इमारतींचे उद्घाटन निपाणी (विनायक पाटील) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शाने हे स्थळ शक्तिशाली बनले आहे. पोलीस अधिकारी व कर्मचारी रात्रंदिवस समाजव्यवस्था सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न करतात. पण त्यांच्या कार्यालयासह निवासस्थानाची वानवा होती. ही गंभीर बाब लक्षात घेऊन आपण राज्यभरात कोट्यावधी रुपये मंजूर करून …

Read More »

कोगनोळी-हंचिनाळ रस्त्याची झाली दुरावस्था

प्रवासी वर्गातून नाराजी : त्वरित रस्ता दुरुस्तीची मागणी कोगनोळी : येथील कोगनोळी हंचिनाळ रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे. यामुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. गेल्या दोन-तीन वर्षापासून या रस्त्याची मोठी दुरावस्था निर्माण झाल्याने वाहनधारकांच्यातून मोठी नाराजी निर्माण झाली आहे. सध्या सुरू झालेल्या पावसामुळे या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामध्ये मोठ्या प्रमाणात …

Read More »

कोगनोळी दूधगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ

कोगनोळी : सोमवारी सकाळपासून कोगनोळीसह सीमाभागात संततधार पाऊस सुरु असून मंगळवारीही दिवसभर संततधार पाऊस सुरु होता. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्किल होऊन बसले होते. या पावसामुळे येथील दूधगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत चालली आहे. मागील २४ तासात येथील दूधगंगा नदी पाणी पातळीत ५ फुटांची वाढ झाली आहे. गेले …

Read More »

खानापूर -रामनगर रस्त्याची त्वरित दुरुस्ती करा : खानापूर म. ए. समितीची मागणी

खनापूर : रामनगर ते रुमेवाडी क्रॉस खानापूर हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे निवेदनाद्वारे खानापूर तहसीलदारांकडे करण्यात आली. माजी आमदार दिगंबर पाटील यांच्या नेतृत्वाखाली सदर निवेदन खानापूर तहसीलदारांना देण्यात आले. खानापूर -रामनगर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता असे …

Read More »

केरूर येथे जातीय संघर्षात तिघांवर चाकू हल्ला

चारजण जखमी, जाळपोळीच्या घटना, १८ जणाना अटक बंगळूर : बागलकोट जिल्हा पोलिसांनी केरूर येथे झालेल्या दोन गटातील हाणामारीच्या प्रकरणी नऊ जणांना अटक केली आहे, असे गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांनी गुरूवारी (ता. ७) सांगितले. पोलिस सूत्रांनी सांगितले की, या घटनेच्या संदर्भात केरूर आणि आसपासच्या भागातील १८ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. …

Read More »

खनदाळ येथे आषाढीला श्रीसंत सद्गुरू बाळूमामा धार्मिक उत्सव

संकेश्वर (महंमद मोमीन) : खनदाळ तालुका गडहिंग्लज येथील श्रीसंत सद्गुरू बाळूमामा मंदिरात आषाढीला विविध धार्मिक कार्यक्रमांंचै आयोजन करण्यात आल्याची माहिती देवस्थान विश्वस्त कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. येत्या रविवारी १० जुलै २०२२ रोजी आषाढी एकादशीला निलजी ते खनदाळ श्रीसंत सद्गुरू बाळूमामा मंदिरापर्यंत दिंडी सोहळा संपन्न होणार आहे. सायंकाळी प्रवचन, पूजा, …

Read More »