Sunday , December 14 2025
Breaking News

कर्नाटक

हुक्केरी तालुक्यातील होसूरमध्ये महिलेचा खून करून दागिने लंपास

हुक्केरी : हुक्केरी तालुक्यातील होसूरमध्ये घरात एकट्या असलेल्या महिलेचा खून करून दागिने लंपास केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. गावातील निवृत्त पीएसआय भीमराय अक्कतंगेरहाळ यांची दुसरी पत्नी मालुताई या घरात एकटी असल्याचे पाहून दरोडेखोरांनी त्यांच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबून हत्या केली. त्यानंतर त्यांच्या अंगावरील दागिने लुटले. या घटनेने होसूर गावात एकच …

Read More »

सौंदलगा येथील सरकारी जमिनीतील अनाधिकृत घर जमीनदोस्त

सौंदलगा : येथील सरकारी जमिनीतील अनाधिकृत घर पाडले. सर्वे नंबर ३८६/१ ही सरकारी गायरान ५ एकर २३ गुंठे आहे. त्या जागेवर नारायण गणपती माने यांनी अनधिकृत घर बांधले होते. या संदर्भात तलाठी एस. एम. पोळ, ग्राम सहाय्यक नंदकुमार पाटील यांनी वेळोवेळी नारायण गणपती माने यांना तोंडी समज दिली होती. मात्र …

Read More »

संकेश्वरात मृगाने शेतकऱ्यांची चिंता वाढविली..

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर परिसरातील शेतकरी आकाशाकडे डोळा लावून बसलेले दिसताहेत. खरीपाची पेरणी तब्बल पंधरा-वीस दिवस लांबल्याने शेतकरी काळजीत पडलेले दिसत आहेत. संकेश्वर भागातील शेतकऱ्यांनी खरीप पेरणीपूर्वी मशागतीची कामे आटोपून पेरणीची तयारी केलेली दिसत आहे. पेरणीसाठी लागणारी बि-बियाने खरेदी करुन पेरणीसाठी बैलांची, शेतमजुरांची जमवाजमव केली जात आहे. पाऊस बरसताच …

Read More »

संकेश्वरात वटपौर्णिमा उत्साहात साजरी

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात आज सुवासिनी स्त्रियांनी वटपौर्णिमा उत्साही वातावरणात साजरी केली. वडाचे वृक्ष असलेल्या ठिकाणी सुवासिनी स्त्रियांनी पूजेसाठी एकच गर्दी केलेली पहावयास मिळाली. सुवासिनी महिलांनी सौभाग्यवृध्दीसाठी वडाच्या मुळांना पाणी अर्पण करुन वडाच्या झाडाच्या प्रदक्षिणा घालून सुताचे वेष्टण करीत पूजाअर्चा करतानाचे चित्र पहावयास मिळाले. वटपौर्णिमा भक्तीभावाने साजरी करतांना सुवासिनी …

Read More »

चित्रपटाच्या स्क्रिनिंगवेळी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना अश्रू अनावर

बंगळुरु : सध्या एक कन्नड चित्रपट चांगलाच चर्चेत आला आहे. त्या चित्रपटाचे नाव ‘७७७ चार्ली’ असे आहे. या चित्रपटाचे कर्नाटकसह देशात इतर ठिकाणी सुद्धा कौतुक होत आहे. १० जून रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटास सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाच्या स्क्रिनिंग दरम्यान कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई चांगलेच भावूक झाल्याचे …

Read More »

जटग्यात हनुमान मंदिर इमारतीचा स्लॅब भरणी उत्साहात संपन्न

खानापूर (प्रतिनिधी) : जटगे (ता. खानापूर) येथील जीर्णोद्धार करून उभारण्यात आलेल्या हनुमान मंदिराचा स्लॅब भरणी कार्यक्रम सोमवारी दि. 13 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे ज्येष्ठ नागरिक मल्लू धुळापा पाटील होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आम आदमी खानापूर तालुका अध्यक्ष भैरू पाटील, जेडीएसचे नेते नासीर बागवान, बेळगाव येथील …

Read More »

कोगनोळी परिसरात वटपौर्णिमा सोहळा उत्साहात संपन्न

कोगनोळी : कोगनोळी परिसरातील हणबरवाडी, दत्तवाडी, सुळगाव, मत्तीवडे, हंचिनाळ, आप्पाचीवाडी आदी भागात सात जन्मी हाच पती मिळू दे असे म्हणत वडाच्या झाडाची पूजा करत महिलांनी परिसरात वटपौर्णिमा पारंपारिक पद्धतीने व उत्साहात भक्तिमय वातावरणात साजरी केले. यावेळी सुवासिनींनी आपले व आपल्या पतीचे दिर्घआयुष्यासाठी व सातजन्मच्या प्राप्तीसाठी हिंदू धर्मातील स्त्रिया वटपौर्णिमेच्या दिवशी …

Read More »

कावेरी प्रकरणी आम्हाला न्याय मिळेल : मुख्यमंत्री बोम्मई

बेंगळुर : कावेरीच्या पाणी वाटपावरून तमिळनाडू काही तरी कुरापत काढून राजकीय स्टंट करत आहे. मात्र मेकेदाटू योजनेला कसलाही कायदेशीर अडथळा नाही, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले. बेंगळुरातील आरटी नगरातील आपल्या निवासस्थानी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, मेकेदाटू योजनेसंदर्भात कावेरी नदी देखरेख मंडळाकडे डीपीआर मंजुरीसाठी अनेक बैठक झाल्या आहेत. …

Read More »

इंडस्ट्रीत क्वालिटी हवी : श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी

संकेश्वर (महंमद मोमीन) : इंडस्ट्रीत क्वालिटी कंट्रोल करण्याचे कार्य केल्यास उत्पादित वस्तूंना चांगली बाजारपेठ निश्चितच लाभणार असल्याचे निडसोसी मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींनी सांगितले. श्रींच्या दिव्य सानिध्यात दि. बेळगाम इंडस्ट्रीयल को-ऑप बॅंक शाखा संकेश्वरचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. निडसोसी मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी, संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठाचे श्री …

Read More »

अण्णा-तम्माच्या गुजगोष्टी….

संकेश्वर (महंमद मोमीन) : हुक्केरी विधानसभा मतक्षेत्रात अण्णा-तम्माचे राजकारण कार्यकर्त्यांना समजण्या पलिकडचे झाले आहे. त्यामुळे दोन्ही गटांचे नेते आणि कार्यकर्ते चांगलेच संभ्रमावस्थेत दिसत आहेत. येथे अण्णांची भूमिका माजी मंत्री ए. बी. पाटील, तर तम्माची भूमिका राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती उत्तम प्रकारे वठवित आहेत. दोघांमध्ये कधी …

Read More »