Thursday , December 11 2025
Breaking News

कर्नाटक

निडगलजवळ वाहनाच्या धडकेने गाईचा मृत्यू

खानापूर (वार्ता) : निडगल (ता. खानापूर) येथील गावच्या नाल्याजवळ बुधवारी दि. 29 रोजी सायंकाळी वाहनाची धडक बसून गाईचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, निडगल गावाजवळील नाल्याजवळ गर्लगुंजीहून खानापूरकडे जाणार्‍या ईको मारूती व्हॅनने निडगल गावचा शेतकरी श्रीकांत पाटील यांच्या गाईल जोराची धडक दिल्याने गाय बाजुच्या खड्ड्यात …

Read More »

जनतेचा विश्वास सार्थ ठरविणार

उत्तम पाटील : पत्रकार बैठकीत माहिती निपाणी (वार्ता) : बोरगाव येथे सहकाररत्न रावसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगर विकास पॅनलच्या माध्यमातून अत्यंत चुरशीने लढवण्यात आलेल्या निवडणुकीत बोरगाव शहरवासीयांनी आपल्यावर जो विश्वास दाखवून आपल्या पॅनलच्या सर्वच उमेदवारांना सर्वाधिक मतांनी निवडून दिले आहे. जनतेच्या विश्वासाला पात्र राहून भावी काळात शहराचा सर्वांगीण विकास करण्याचे …

Read More »

बोरगाववर उत्तम पाटील गटाचे वर्चस्व कायम

हवले गटाला एक जागा : भाजपाला खाते खोलणे अशक्य निपाणी (वार्ता) : जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या बोरगाव नगरपंचायतीसाठी झालेल्या मतदानाची गुरुवारी (ता. 30) येथील जी. आय. बागेवाडी महाविद्यालयात मतमोजणी झाली. त्यामध्ये उत्तम पाटील गटाच्या ग्रामविकास पॅनेलने जोरदार मुसंडी मारुन 17 पैकी 16 जागा हस्तगत केल्या. तर हवले गटाला एका जागेवर …

Read More »

संकेश्वरचे वर्गमित्र 41 वर्षानंतर एकत्र आले…

संकेश्वर (वार्ता) : संकेश्वर एस. डी. हायस्कूलमधील 1980 च्या वर्गमित्रांचा स्नेहमेळावा नुकताच गडहिंग्लज येथील हॉटेल ऐरावतमध्ये पार पडला. प्रारंभी दिवंगत शिक्षक घोरपडे सर, संसुध्दी सर, बी. के. पाटील सर, जागनुरे सर आणि दिवंगत वर्गमित्रांना दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रध्दांजली वाहण्यात आली. वर्गमित्रांनी शालेय जीवनातील गोड आठवणींना उजाळा दिला. यावेळी …

Read More »

गोंधळी समाजाचा एसटीमध्ये समावेश करा : परशराम शिसोदे

संकेश्वर (वार्ता) : कर्नाटक राज्य सरकारने गोंधळी समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी तातडीने कुलशास्त्र अध्ययनाची सुरुवात करुन गोंधळी समाजाचा समावेश एस.टी. प्रवर्गात करावा, अशी मागणी अखिल कर्नाटक गोंधळी समाज हुक्केरी तालुका घटकचे अध्यक्ष परशराम शिसोदे यांनी संकेश्वर विश्रामधाम येथे पत्रकार परिषदेत केली. ते पुढे म्हणाले, मागील येडियुराप्पा सरकारने अलमारी-आलेमारी समाजाच्या विकासासाठी 30 …

Read More »

संकेश्वरचा कु. वैभव कुंभार आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत सुवर्ण पदकाचा मानकरी

संकेश्वर (वार्ता) : संकेश्वरचा कराटेपटू कुमार वैभव राजू कुंभार आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला आहे. नुकतीच राजस्थान उदयपूर येथे चौथी आंतरराष्ट्रीय खुली कराटे चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडली. त्यात कु. वैभव कुंभार यांनी 10 ते 15 वयोगटात सहभागी होऊन सुवर्ण पदकाबरोबर रजत पदकही पटकाविले आहे. त्याला कोच गजेंद्रसिंग ठाकूर …

Read More »

नाईट कर्फ्यूसह प्रतिबंधात्मक उपायांचे पुनरावलोकन करणार

मुख्यमंत्री बोम्माई : व्यवसाईकांचा विरोध बंगळूर (वार्ता) : सरकारने घोषित केलेल्या नाईट कर्फ्यूसह कोविड-19 प्रतिबंधात्मक उपायांचे पुनरावलोकन करण्याची शक्यता मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी बुधवारी हुबळी येथे व्यक्त केली. व्यवसाईकांचा वाढता विरोध विचारात घेऊन यावर फेर विचार करण्याचा मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला आहे. कोविडचा पुढील प्रसार नियंत्रित करण्यासाठी सरकारने 10 दिवसांसाठी जाहीर …

Read More »

कर्नाटकात पेट्रोल 10 तर डिझेल 8 रुपयांनी स्वस्त!

सीमाभागातील 20 पेट्रोलपंप चालक अडचणीत : निपाणी, कोगनोळीत खरेदीसाठी गर्दी निपाणी (वार्ता) : पेट्रोल, डिझेल दरवाढीने वाहनधारकांबरोबरच सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. इंधनाचे दर वाढल्याने त्यावर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांनीही व्यावसायातील वस्तूंच्या दरात वाढ केल्याने सर्वसामान्य नागरिक, शेतकर्‍यांवर आर्थिक भार वाढला आहे. दरम्यान कर्नाटकात पेट्रोल जवळपास 10 रुपये तर डिझेल 8 रुपये …

Read More »

बोरगावच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा

तिरंगी लढतीमुळे धाकधूक वाढली : 11 पर्यंत लागणार निकाल निपाणी (वार्ता) : सोमवारी (ता. 27) बोरगाव नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या. 17 प्रभागांसाठी 50 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. सर्व उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्र बंद झाले. गुरुवारी (ता.30) निकाल असून या निकालाकडे तालुक्याची नजर लागून राहिली आहे. युवानेते उत्तम पाटील, अण्णासाहेब हावले …

Read More »

उमेदवारांना पडतेय नगरसेवकपदाचे स्वप्न!

मतदानानंतर निकालाची प्रतीक्षा : झाल्या मतदानाचा हिशोब सुरू निपाणी (विनायक पाटील) : बेळगाव जिल्ह्यात चर्चेत असलेल्या बोरगाव नगरपंचायतीची 17 प्रभागातील निवडणूक अत्यंत चुरशी लढत झाली. नगरपंचायतीची ही निवडणूक असल्याने प्रत्येक उमेदवारांना आपणच नगरसेवक होणार असल्याचे निकालापूर्वी स्वप्न पडू लागली आहेत. झालेल्या मतदानाची आकडेवारीचा हिशोब उमेदवार करत असल्याचे दिसत आहे. गुरुवारी(ता.30) …

Read More »