Monday , December 8 2025
Breaking News

कर्नाटक

हुतात्मा दिनी कडकडीत हरताळ पाळा; खानापूर तालुका म. ए. समितीतर्फे खानापूर शहरात जनजागृती

    खानापूर : खानापूर तालुका म. ए. समितीतर्फे सोमवारी खानापूर शहरात हुतात्मा दिनानिमित्त शुक्रवारी (ता. १७) खानापूर तालुक्यातील जनतेने आपापले उद्योगधंदे बंद ठेवून कडकडीत हरताळ पाळावा व तसेच सकाळी ८.३० वाजता स्टेशन रोड खानापूर येथे कै. नागाप्पा होसूरकर हुतात्मा स्मारकाला अभिवादन करण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित राहावे. यासाठी पत्रके वाटून जनजागृती …

Read More »

राजमाता जिजाऊंचे विचार आजही महत्वाचे

  मावळा ग्रुपतर्फे जिजाऊ जयंती ; फलकाचेही अनावरण निपाणी (वार्ता) : राजमाता जिजाऊ मासाहेब या खऱ्या अर्थाने स्वराज्याच्या प्रेरिका होत्या. त्यांच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवली व रयतेचे राज्य उभे केले. त्यामुळेच आजही आपल्या देशामध्ये सुखाचे दिवस आपल्याला पाहायला मिळत आहेत. अशी माता प्रत्येक मुलाला मिळाल्यास या जगाचा …

Read More »

शेतीसाठी चांगल्या पीक पद्धतीचा अवलंब करावा

  पंकज पाटील; शेतकऱ्यांना सबसिडी स्वरूपात औषध पंपाचे वाटप निपाणी (वार्ता) : शेतकऱ्यांनी बदलत्या काळानुसार शेती पिकवावी व नवनवीन पिक पद्धतीचा अवलंब करावा जेणेकरून उत्पादन वाढण्याबरोबरच कीडरोगमुक्त पिकांचे उत्पादन निघून अपेक्षित उत्पादन मिळेल, असे मत माजी जि‌ल्ह पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांनी व्यक्त केले. येथील पंकज पाटील युवा मंच व …

Read More »

शंकराचार्य पीठात स्टोन वॉशिंगने स्वच्छता!

  संकेश्वर : दिनांक २४ शंकराचार्य पीठातील शंकरलिंग मंदिरात स्टोन वॉशिंगने स्वच्छतेचे काम मठाधिपती श्री सचिदानंद अभिनव विद्या नरसिंह भारती स्वामींच्या मार्गदर्शनाखाली अंतिम टप्प्यात सुरू आहे. इ. स. १२२२ मध्ये “रट्ट” काळात “जखनाचार्य” यांनी बांधलेले मुख्य शंकरलिंग मंदिर “हेमांडपथी” रचनेचे असून इ. स. १४९९ मध्ये यावर “शंकराचार्य पिठाची परंपरा” सुरू …

Read More »

गौरी लंकेश हत्या प्रकरण; शरद कळास्करला जामीन मंजूर

  प्रकरणातील सर्व आरोपी आता जामीनावर बंगळूर : पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील दहावा आरोपी शरद भाऊसाहेब कळास्कर याला बंगळुरच्या प्रधान शहर दिवाणी व सत्र न्यायालयाने बुधवारी जामीन मंजूर केला. यासोबतच खटल्याला सामोरे जात असलेल्या सर्व १७ आरोपींना आता जामीन मंजूर करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे शरद भाऊसाहेब कळास्कर यांनी दाखल …

Read More »

आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांची शस्त्रेही जप्त

  कोप्पा तालुक्यातील मेगुरु जंगलात सापडली शस्त्रे बंगळूर : नक्षलवाद सोडून मुख्य प्रवाहात सामील झालेल्या सहा नक्षलवाद्यांकडून पोलिसांनी शनिवारी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला. नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. दोन दिवसांच्या सततच्या शोधानंतर पोलिसांना चिक्कमंगळूर येथील मेगुरुच्या जंगल परिसरात सहा बंदुका आणि दारूगोळा सापडला. त्याचप्रमाणे एक एके-५६, …

Read More »

सीमाभागात रोजगार मेळावा घेण्याबाबत समितीच्या शिष्ठमंडळाने घेतली खा. धैर्यशील माने यांची भेट

    बेळगाव : महाराष्ट्र शासनातर्फे सीमाभागातील बेरोजगार तरूणांसाठी शिवजयंतीचे औचित्य साधून रोजगार महामेळाव्याचे आयोजन करण्यात यावे यासाठी पाठपुरावा करावा अशी विनंती करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने आज खासदार धैर्यशील माने यांची भेट घेतली. गेली सहा दशके महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्नाचा लढा म.ए. समितीच्या नेतृत्वाखाली लोकशाही मार्गाने सुरू आहे. तसेच सीमाप्रश्नाचा …

Read More »

सीमाभागात रोजगार मेळावा घेण्याबाबत संजय मंडलिक यांचे महाराष्ट्र शासनाला पत्र

  निपाणी : येथे महाराष्ट्र शासनातर्फे सीमाभागातील बेरोजगार तरूणांसाठी शिवजयंतीचे औचित्य साधून रोजगार महामेळाव्याचे आयोजन करण्यात यावे अशी विनंती करणारे पत्र माजी खासदार संजय मंडलिक यांनी नुकतेच उद्योगमंत्री उदय सामंत यांना पाठवले आहे. याबाबत महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी यांचे शिष्टमंडळ अध्यक्ष लक्ष्मीकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंडलिक यांना मुरगुड येथे …

Read More »

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचा युवा आघाडी मेळाव्याला जाहीर पाठिंबा

  खानापूर : युवा दिनी आयोजित युवा मेळाव्याला खानापूर तालुका म. ए. समितीने महात्मा फुले रोडवरील मराठा सांस्कृतिक भवन, बेळगांव येथे आयोजित युवा आघाडी मेळाव्याला जाहीर पाठिंबा दर्शविला असून तालुक्यातील सर्व युवावर्गाने आणि मराठी भाषिकांनी सदर मेळाव्याला वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष श्री. गोपाळराव …

Read More »

संभाजीनगर शाळेतील चित्रकला स्पर्धेत ३७८ विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग

निपाणी (वार्ता) : येथील संभाजीरातील मराठी मुलांच्या शाळेत सावित्री फुले जयंतीनिमित्त वीरभद्र ऑरगॅनिक अँड सॅंडलवुड अग्रिकल्चर सोसायटी यांच्यातर्फे विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सी. एम. सुगते होते. प्रारंभी एचडीएमसी उपाध्यक्षा वंदना वंजारे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन तर ए. एस. तावदारे, के.डी. खाडे, प्रवीण कोळी, महेश पाटील …

Read More »