Sunday , December 7 2025
Breaking News

देश/विदेश

संसद सुरक्षा भंग प्रकरण; सहा आरोपींपैकी दोघांचे कर्नाटक कनेक्शन

  बंगळूर : २००१ च्या संसदेवरील दहशतवादी हल्ल्याच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त बुधवारी (१३ डिसेंबर) सुरक्षेचा मोठा भंग करताना, कामकाज सुरू असताना दोघाजणानी अभ्यागतांच्या गॅलरीतून लोकसभेच्या चेंबरमध्ये उडी मारली, घोषणाबाजी केली आणि पिवळ्या रंगाचा रासायनिक धूर सोडल्याने सभागृहात घबराट आणि गोंधळ उडाला. यापैकी दोघा आरोपींचे कर्नाटक कनेक्शन असल्याचे स्पष्ट झाले …

Read More »

अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका; प्रकृती स्थिर

  मुंबई : मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आला आहे. त्याला मुंबईतील अंधेरी येथील बेलेव्ह्यू रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हृदयविकाराच्या झटक्यानंतर लगेचच अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. श्रेयसची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. श्रेयस तळपदेची प्रकृती कशी आहे? अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आल्याने चाहत्यांना मोठा …

Read More »

संसदेच्या सुरक्षेवरून लोकसभेत गोंधळ, काँग्रेसचे ५ खासदार हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित

  नवी दिल्ली : लोकसभेच्या मुख्य सभागृहात दोन घुसखोरांना धुराच्या नळकांड्या फोडल्यामुळे नव्या संसदभवनाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यावरून आज  (१४ डिसेंबर) लोकसभेत खासदारांनी गोंधळ घातला. त्याच पार्श्वभूमीवर असभ्य वर्तन केल्याप्रकरणी काँग्रेसच्या ५ खासदारांना हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आलं आहे. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी खासदारांच्या निलंबनाचा …

Read More »

दोन अज्ञात संसदेत घुसले, कामकाजादरम्यान खासदारांच्या बाकांवरून उड्या, पिवळा धूर अन्…

  नवी दिल्ली : संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असून आज लोकसभेत मोठा गोंधळ पाहायला मिळाला. लोकसभेचं कामकाज सुरू असताना दोन अज्ञात व्यक्ती सभागृहात शिरले. प्रेक्षक गॅलरीतून हे दोघे सभागृहात आले. सुरक्षा व्यवस्था भेदून सभागृहात आले आणि खासदारांच्या बाकांवरून उड्या मारत लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीच्या दिशेने धावू लागले होते. यावेळी पिठासीन अध्यक्षांनी …

Read More »

गुटखा कंपन्यांच्या जाहीराती! शाहरुख खान, अक्षय आणि अजय देवगणला नोटीस

  नवी दिल्ली : केंद्र सरकारने अलाहाबाद न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाला प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान, अक्षय कुमार आणि अजय देवगण यांना गुटखा कंपन्यांच्या जाहिरातींबद्दल नोटीस जारी केल्याची माहिती देऊन अवमान याचिकेला उत्तर दिले आहे. अवमान याचिकेला उत्तर देताना डेप्युटी सॉलिसिटर जनरल एसबी पांडे यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाला माहिती …

Read More »

१३ संशयित दहशतवाद्यांना अटक

  एनआयची कारवाई; बंगळूरसह पुणे, ठाणे, भाईंदरमध्ये छापे बंगळूर : जागतिक दहशतवादी संघटना ‘इसिस’ देशाच्या अनेक भागांत तोडफोडीची कृत्ये करण्याचा कट रचत असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) अधिकाऱ्यांनी कर्नाटक आणि महाराष्ट्रात ४४ हून अधिक ठिकाणी अचानक छापे टाकले. १३ संशयित दहशतवाद्याना ताब्यात घेतले आहे. एनआयएच्या अधिकाऱ्यांनी कर्नाटकात १, पुण्यात …

Read More »

कांद्यावर निर्यातबंदी! केंद्र सरकारचा मोठा निर्णय, बळीराजाला बसणार फटका

  नवी दिल्ली : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना निराश करणारा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. स्थानिक बाजारपेठांतील कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी सरकारनं निर्यात बंदी करण्याचा निर्णय घेतलाय. 31 मार्च 2024 पर्यंत कांदा निर्यातबंदी राहणार असल्याचे परिपत्रक सरकारकडून काढण्यात आलं आहे. याचा मोठा फटका कांदा उत्पादक …

Read More »

तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का, महुआ मोईत्रा यांची खासदारकी रद्द

  नवी दिल्ली : पैसे घेऊन प्रश्न विचारल्या प्रकरणात तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांची लोकसभेतील सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. पैसे घेऊन लोकसभेत प्रश्न विचारण्याच्या प्रकरणात संसदेच्या एथिक्स कमिटीने मोईत्रा यांची खासदारकी रद्द करण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. ‘पैसे घेऊन प्रश्न’ …

Read More »

पाकव्याप्त काश्मीरसाठी जम्मू-काश्मीरच्या विधानसभेत २४ जागा राखीव; लोकसभेत विधेयक मंजूर

  नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मीरमधून विस्थापित झालेल्यांच्या कुटुंबाना प्रतिनिधित्व देण्यासाठी जम्मू-काश्मीर विधानसभेत एक जागा राखीव ठेवण्यात आली आहे. तसेच जम्मू-काश्मीरमधून विस्थापित झालेल्या नागरिकांसाठी दोन जागा राखीव ठेवल्या आहेत. तीन पैकी एका जागेवर महिला असणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे पीओके हे आमचेच आहे, असे सांगत पाकव्याप्त काश्मीरसाठी जम्मू-काश्मीरच्या विधानसभेत २४ …

Read More »

रेवंत रेड्डी तेलंगणाचे मुख्यमंत्री, 7 डिसेंबरला होणार भव्य शपथविधी

  हैदराबाद : तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदासाठी रेवंत रेड्डी यांचे नाव निश्चित करण्यात आलं असून ते 7 डिसेंबरला शपथ घेणार आहेत. रेवंत रेड्डी हे तेलंगणाच्या विजयाचे शिल्पकार ठरले आहेत. सुरुवातीला रेवंत रेड्डी यांच्या नावाला काही नेत्यांनी विरोध केला, पण हायकमांडने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. न्यूज एजन्सी एएनआयच्या मते, हैदराबादमध्ये सीएलपीच्या बैठकीत एकमताने …

Read More »