तमिळनाडूतील डीएमके पक्षाचे नेते मंत्री सेंथिल बालाजी यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप आहे. हा घोटाळा उघडकीस आणण्यासाठी आयकर विभाग सातत्याने छापे टाकत आहे. दरम्यान आजही (दि.२६) प्राप्तिकर विभागाने मंत्री सेंथिल बालाजी यांच्याशी संबंधित ४० ठिकाणी छापे टाकले. यामध्ये संबंधित मंत्र्याच्या निवासस्थानावर, सरकारी कंत्राटदारांच्या निवासस्थानांवर आणि कार्यालयांवर छापे टाकण्यात आले आहे. तमिळनाडूचे …
Read More »नवीन संसद भवनाच्या उद्घाटन स्मरणार्थ ७५ रुपयांचे नाणे लाँच करणार
अर्थ मंत्रालयाची मोठी घोषणा नवी दिल्ली : देशाच्या अर्थ मंत्रालयाने आज (दि.२६) मोठी घोषणा केली आहे. २८ मे रोजी नवीन संसद भवनाचे उद्घाटन होणार आहे. या अविस्मरणीय क्षणाच्या स्मरणार्थ अर्थ मंत्रालयाकडून ७५ रुपयांचे नाणे लाँच केले जाणार आहे, असे मंत्रालयाने स्पष्ट केल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी …
Read More »कुनोमध्ये आणखी दोन चित्त्यांच्या पिलांचा मृत्यू, आतापर्यंत एकूण पाच चित्ते मृत्यूमुखी
भोपाळ : मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये चित्त्यांच्या मृत्यूची मालिका थांबायचं नाव घेत नाही. ज्वाला नावाच्या मादी चित्त्याच्या आणखी दोन पिल्लांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. या घटनेनंतर मरण पावलेल्या चित्त्यांची संख्या पाच झाली आहे. यामध्ये आफ्रिकेतून आणलेल्या दोन बिबट्यांचा समावेश आहे. चित्याच्या या पिल्लांचा मृत्यू अशक्तपणामुळे आणि वाढत्या …
Read More »संसदेत राष्ट्रवादी ‘आप’च्या पाठीशी; अरविंद केजरीवाल यांनी घेतली शरद पवारांची भेट
मुंबई : केंद्र सरकारने दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पोस्टिंगसंदर्भात अध्यादेश आणला असून त्याविरोधात अरविंद केजरीवाल यांनी आता विरोधकांची मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. अरविंद केजरीवाल, भगवंत मान आणि …
Read More »अहंकारी, स्वार्थी माणूस देश चालवू शकत नाही ; ‘मातोश्री’वरुन केजरीवालांचा मोदींवर हल्ला
मुंबई : “अध्यादेशाचा निर्णय अहंकारातून आला आहे. अहंकारी आणि स्वार्थी माणूस देश चालवू शकत नाही, दिल्लीच्या लढाईत उद्धव ठाकरेंची साथ मिळाली आहे,” अशा शब्दात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर टीका केली. तर “जनतेला जागं करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत,” असं उद्धव ठाकरे म्हणाले. मुंबईतील संयुक्त पत्रकार परिषदेत …
Read More »प्रत्येक कार्यक्रमावर राजकारण करणे योग्य नाही : संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी
नवी दिल्ली : नवीन संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी विनंती संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी यांनी बुधवारी विरोधी पक्षांना उद्देशून केली. प्रत्येक कार्यक्रमावर राजकारण करणे योग्य नाही, असा टोलाही त्यांनी पत्रकारांशी बोलताना लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या 28 तारखेला नवीन संसद भवनाचे उद्घाटन …
Read More »संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनावर 19 पक्षांचा बहिष्कार तर सरकारकडून जोरदार तयारी
नवी दिल्ली : संसदेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन होतं आहे आणि देशातल्या 19 विरोधी पक्षांनी त्यावर बहिष्कार टाकला आहे. काँग्रेससह महाराष्ट्रातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाही त्यात समावेश आहे. राष्ट्रपतींना या कार्यक्रमातून बेदखल करणं हा लोकशाहीचा अपमान आहे अशी भूमिका घेत सर्वपक्षीयांनी एकत्रित निषेधपत्र जाहीर केलं आहे. …
Read More »जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये भीषण अपघात, मजुरांना घेऊन जाणारं वाहन उलटलं, सहा जणांचा मृत्यू
जम्मू : जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये आज (24 मे) एक भीषण अपघात झाला. इथे धरणावर काम करणाऱ्या मजुरांना घेऊन जाणारे क्रूझर वाहन उलटलं. या अपघातात सहा मजुरांचा मृत्यू झाला. तर तीन मजूर जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. किश्तवाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना डांगदुरु पॉवर प्रोजेक्टजवळ …
Read More »भाजपचे महाजनसंपर्क अभियान; ३० मेपासून महिनाभर केंद्र सरकारच्या योजनांची माहिती तसेच प्रकल्पांबाबत जनजागृती
नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारला महिनाअखेरीस नऊ वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्ताने भाजप देशव्यापी जनसंपर्क मोहीम राबवली जाणार आहे. राजस्थानमध्ये ३१ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीरसभेतून या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. ही मोहीम आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची पूर्वतयारी असल्याचे मानले जात आहे. भाजपचे अध्यक्ष जे. पी. …
Read More »मनीष सिसोदियांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील अबकारी धोरण घोटाळ्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले राज्याचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांना न्यायालयाने कुठलाही दिलासा दिलेला नाही. न्यायालयाने १ जून पर्यंत त्यांच्या कोठडीत वाढ केली आहे. मंगळवारी त्यांना राऊस एव्हेन्यू विशेष न्यायालयात हजर करण्यात आले होते. सुनावणी दरम्यान सिसोदियांनी अध्ययनासाठी एक खुर्ची तसेच टेबल उपलब्ध …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta