Tuesday , March 3 2026
Breaking News

बेळगाव

बिबट्या नव्हे तर ते “रानमांजर”

  बेळगाव : बुधवारी संध्याकाळी शहरातील कॅम्प, लिंगराज कॉलेज परिसरात बिबट्या फिरत असल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली, ज्यामुळे कॅम्प परिसरात मोठी चिंता निर्माण झाली. तथापि, वन विभागाच्या कॅमेरा ट्रॅपने टिपलेल्या फुटेजच्या विश्लेषणातून हे स्पष्ट झाले आहे की तो बिबट्या नव्हे तर ‘रानमांजर’ असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, बुधवारी …

Read More »

मराठी विद्यानिकेतनमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

  बेळगाव : द.म.शि. मंडळ संचलित मराठी विद्यानिकेतन बेळगाव शाळेमध्ये 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मदिवसाच्या औचित्याने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शाळेतील शिक्षिका कमल हलगेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक बी. जी. पाटील, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक एन. सी …

Read More »

ज्योती सेंट्रल स्कूलमध्ये शिवजयंतीचा सोहळा उत्साहात संपन्न

  बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित, ज्योती सेंट्रल स्कूल, कॅम्प, बेळगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत दिमाखात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सोनाली कंग्राळकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व मालार्पण करण्यात आले. यावेळी संपूर्ण शालेय परिसर ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या …

Read More »

‘शांताई विद्या आधार’ संस्थेची आर्थिक मदत

  बेळगाव : गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणात पैशांची अडचण येऊ नये, या उद्देशाने बेळगावमधील ‘शांताई विद्या आधार’ संस्थेने घरातील जुनी वर्तमानपत्रे विकून जमा झालेल्या निधीतून आज शहरातील एका माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी आर्थिक मदतीचा हात दिला. बेळगावमधील राणी चन्नम्मा नगर येथील भारतीय विद्याभवन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता नववीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला …

Read More »

बेळगावात पोलिसांची धडक कारवाई चौघांना अटक

  बेळगाव : बेळगाव शहरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गेल्या २४ तासांत शहरातील विविध भागात छापे टाकून गांजा सेवन, मटका जुगार आणि प्राणघातक शस्त्र बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली. बेळगाव शहरातील खडेबाजार आणि माळमारुती पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. पाटील …

Read More »

शिनोळी बु. येथे शिवजयंतीनिमित्त दहावी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

  शिनोळी बु. (प्रतिनिधी) : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिवशाही संघटनेच्या वतीने राजर्षी शाहू विद्यालय शिनोळी बु. येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना एस.एस.सी. परीक्षेसाठी आवश्यक शैक्षणिक साहित्याचे प्रेरणादायी वाटप करण्यात आले. उद्या दिनांक २० फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या एस.एस.सी. परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना पॅड (पुट्टा), पेन (लेखनी), पट्टी …

Read More »

देसूर प्राथमिक मराठी शाळेत शिवजयंती उत्साहात साजरी; नूतनीकरण व रंगकाम कामाचा ‘श्रीगणेशा’

  मंत्री लक्ष्मीताई हेब्बाळकर यांच्या निधीतून शाळेला नवे रूप; देसूर काँग्रेस कमिटीच्या वतीने पूजन संपन्न देसूर : येथील सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळेत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती (शिवजयंती) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या मंगल दिनाचे औचित्य साधून, राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ना. लक्ष्मीताई हेब्बाळकर यांनी मंजूर केलेल्या …

Read More »

बेळगावात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात; सकल मराठा समाजाकडून अभिवादन

  बेळगाव : सकल मराठा समाज, बेळगाव (१८ पगड जाती व १२ बलुतेदार) यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९४ व्या जयंतीनिमित्त शिवाजी उद्यान येथे मानवंदना व अभिवादनाचा भव्य कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. बेळगाव व परिसरातील मराठा समाज तसेच मराठी भाषिक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवरायांना अभिवादन केले. या …

Read More »

ब्राह्मण नागरिकांच्या मालमत्तांना संरक्षण द्या : जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

  बेळगाव : बनावट कागदपत्रांच्या आधारे मालमत्ता करण्याचा प्रकार सध्या बेळगावसह परिसरात जोरात सुरू आहे. भू माफिया संबंधित खात्यातील अधिकाऱ्याला हाताशी धरून बनावट कागदपत्रे तयार करून जमिनी हडप करत असून बेळगाव जिल्ह्यातील ब्राह्मण समाजाच्या सदस्यांची पिढीजात मालमत्ता बनावट कागदपत्राद्वारे हडप करण्याचा प्रकार सुरू आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित …

Read More »

येळ्ळूर गावकऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे चार मुले आईवडिलांकडे सुखरूप सुपूर्द

  बेळगाव : पिरनवाडी गावातील शाळकरी मुले येळ्ळूर शिवारात फिरताना आढळली. सदर घटना मंगळवारी सायंकाळी घडली असून येळ्ळूर शिवारात शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना सात ते आठ वर्षे वयोगटातील 4 मुले शेतात इकडे तिकडे फिरत असल्याचे निदर्शनास आली. अनोळखी मुले हातात आपल्या कपड्यांच्या पिशव्या घेऊन शेतात फिरतानाचे निदर्शनास येताच शेतकऱ्यांनी प्रसंगावधान …

Read More »