Tuesday , March 3 2026
Breaking News

बेळगाव

चर्मकार समाजातील गरीब गरजूंना प्रोत्साहन फाऊंडेशन देणार मदतीचा हात

बेळगाव : चर्मकार समाजाच्या उन्नतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या प्रोत्साहन फाउंडेशनच्या वतीने समाजातील गरीब गरजूंना मदत देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. प्रोत्साहन फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक गंगाप्पा होनगल सभागृहात नुकतीच पार पडली. यावेळी उपस्थित सर्व सदस्यांनी कोरोना काळात चर्मकार समाजातील गरिबांवर मोठे आर्थिक संकट आले आहे. त्यामुळे संत रोहिदास हरळय्या समाजातील गरीब …

Read More »

ऑनलाईन, ऑफलाईन अध्ययन मार्गसूची जाहीर; एक जुलैपासून शैक्षणिक वर्षारंभ

बंगळूरू : सध्याचे शैक्षणिक वर्ष (२०२१-२२) १ जुलैपासून सुरू होणार असून सार्वजनिक शिक्षण विभागाने पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी भौतिक (फिजीकल) वर्गाऐवजी ऑनलाईन व ऑफलाईनमध्ये अभ्यासक्रम शिकविणार्‍या नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.मागील वर्षाप्रमाणे, १६६२ व्हिडिओ पाठ संवेदना कार्यक्रमांतर्गत चंदन वाहीनीवर शिकविले जातील. एफएम रेडिओवरही ऑडिओ धड्यांचे प्रसारण होईल.पहिली ते दहावीच्या …

Read More »

हिंडलगा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात आठ दिवस कडक लॉकडाऊन

बेळगाव : हिंडलगा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन रविवार 13 जूनपासून पुढील 8 दिवस कडक लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवार 19 जूनपर्यंत लॉकडाऊनच्या काळात किराणा दुकाने सुध्दा बंद राहणार आहेत. हिंडलगा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व गावात वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे आणि कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या नियमानुसार आणि …

Read More »

पोलीस दलातील ‘रेम्बो’ हरपला!

बेळगाव : अत्यंत गुंतागुंतीचे खून, हत्याकांड, चोरी, दरोडे अशा गंभीर गुन्ह्यांचा छडा लावण्यात त्याने मोलाची भूमिका बजावली. गुन्हेगारांना गजाआड करण्यात त्याने पोलिसांना मोठी मदत केली. खऱ्या अर्थाने राज्याची शान आणि पोलिसांचा मानबिंदू असलेल्या रॅम्बोने शनिवारी जगाचा निरोप घेतला. त्याला निरोप देताना कर्तव्यकठोर पोलिसांचेही डोळे पाणावले. बेळगाव पोलिसांच्या श्वानदलात गेल्या १२ …

Read More »

जिव्हाळा संस्थेतर्फे गरजूंना रेशन किटचे वाटप

बेळगाव : जिव्हाळा ही संस्था महिलांनी स्थापन केलेली आहे त्यामुळे संस्थेमध्ये बहुतांश महिलांचा सहभाग आहे. या संस्थेतर्फे मोफत रुग्णवाहिका, शववाहिका, शवदहन सेवा, स्वच्छता अभियान, अश्या विविध सेवा पुरविल्या जातात.आज जिव्हाळा संस्थेतर्फे गरजूंना रेशन किटचे वितरण करण्याचा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून संस्थेला हातभार लावलेल्या देणगीदारांना आमंत्रित करण्यात आले …

Read More »

शहरातील सहकारी बँकांकडून म. ए. समिती आयसोलेशन सेंटरला आर्थिक मदत

बेळगाव : म. ए. समितीच्या कोव्हिड आयसोलेशन सेंटरला बेळगाव शहरातील विविध सहकारी बँकानी आर्थिक मदत केली. तुकाराम बँकेने एकवीस हजार, मराठा बँकेने पंचवीस हजार आणि पायोनियर अर्बन बँकेने पंधरा हजार रुपयांची आर्थिक मदत केली. तुकाराम को. ऑप बँकेचे ज्येष्ठ संचालक प्रदीप ओऊळकर यांनी मदतनिधीचा धनादेश मदन बामणे यांच्याकडे सुपूर्द केला. …

Read More »

विजया अर्थो ’म. फुले जन आरोग्य सेवा’ देण्यासाठी प्रयत्नशील – डॉ. रवी पाटील

सुरुते ग्रामस्थांना कार्ड व फ्री बॉडी चेकअप कॅम्प कालकुंद्री (श्रीकांत पाटील) : महाराष्ट्रातील विशेषत: चंदगड, आजरा, गडहिंग्लज, सावंतवाडी व दोडामार्ग या बेळगाव (कर्नाटक) नजीकच्या तालुक्यातील रुग्णांना शासकीय लाभ मिळावा. यासाठी विजया अर्थो अँड ट्रामा केअर सेंटर (VOTC) बेळगाव येथे महाराष्ट्र शासनाची महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरू करण्यासाठी आपण प्रयत्नशील …

Read More »

खानापूर युवा समितीच्यावतीने तिवोली येथे मास्कचे वितरण

खानापूर : खानापूर महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने तिवोली येथे मास्कचे वितरण करण्यात आले.मास्क वितरणावेळी सीमालढ्यातील जेष्ठ कार्यकर्ते गोपाळ हेब्बाळकर यांनी खानापूर युवा समितीतर्फे सुरू असलेल्या कार्याचे कौतुक केले, तसेच यापुढे खानापूर तालुक्यातील महाराष्ट्र एकीकरण समिती, मराठी भाषिक व युवकांनी एकत्र येत सीमालढ्याला बळकटी द्यावी, असे मत व्यक्त केले.गावातील सर्व नागरिकांना …

Read More »

लोंढ्यात सापडलेल्या बेवारस मृतदेहावर अंत्यसंस्कार

खानापूर (प्रतिनिधी) : लोंढा ता. खानापूर येथे ३ जून रोजी जखमी अवस्थेत सापडलेल्या बेवारस इसमाला खानापूर सरकारी दवाखाण्यात दाखल करण्यात आले. मात्र त्याचा उपचारांती मृत्यू झाला. त्यानंतर इसमाच्या मृत्यूची ओळख पटविण्यासाठी बेळगाव येथील शवगृहात पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र पोलिसांनी बेवारस मृत्यूदेहाचे अंत्यसंस्कार करण्यासाठी कदंबा फाऊंडेशन संघटनेचे अध्यक्ष जाॅर्डन गोन्साल्विस …

Read More »

चक्क 366 किलो गांजा पोलिसांनी जाळला

बेळगाव : बेळगाव शहरात पोलिसांनी विविध ठिकाणी छापे टाकून मोठ्या प्रमाणात गांजा जप्त केला होता. 77 घटनांमध्ये जप्त केलेला हा गांजा कडोली गावाजवळील गुंजेनहट्टीजवळ जाळण्यात आला. जप्त गांजा जाळण्यासाठी जेसीबीने खड्डा खणला आणि त्यात तो 366 किलो कोरडा गांजा जाळला.बेळगाव शहर पोलिस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांच्या मार्गदर्शनाखाली डीसीपी सीआर …

Read More »