बेळगाव : ‘आयुष’ डॉक्टर्स हे बोगस डॉक्टर्स असल्याचे विधान तालुका आरोग्याधिकारी डॉ. शिवानंद मास्तिहोळी यांनी केले आहे. त्याच्या निषेधार्थ आयुष फेडरेशनच्या बेळगाव तालुका शाखेतर्फे निदर्शने करून जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. बेळगाव तालुका आरोग्याधिकारी डॉ. शिवानंद मास्तिहोळी यांनी एका वृत्तपत्राला ‘आयुष’ डॉक्टर्स हे बोगस डॉक्टर्स असल्याचे सांगितले होते. त्याच्या निषेधार्थ डॉ. …
Read More »आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते वंटमुरी कॉलनीतील कामाचा शुभारंभ
समाज कल्याण विभागातून निधी मंजूर बेळगाव : समाज कल्याण विभागातून येथील वंटमुरी कॉलनीतील विकास कामाला चालना देण्यात आली आहे. या भागात अनेक दिवसांपासून रस्ते, गटार, ड्रेनेज, पथदीप यासह अनेक सुविधांचा अभाव होता. त्यामुळे येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन या भागातील विकास कामाला प्रारंभ करण्यात आला आहे. सदर कामाचा शुभारंभ आमदार …
Read More »चोरटा गजाआड : 11 मोटरसायकली जप्त
बेळगाव : माळमारुती पोलिसांनी एका अट्टल मोटरसायकल चोरट्याला गजाआड करून त्याच्याकडील सुमारे 7 लाख रुपये हुन अधिक किमतीच्या 11 मोटारसायकली जप्त केल्या आहेत. पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलिस अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली मार्केट उपविभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सदाशिव कट्टीमणी आणि माळमारुती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शहर आणि …
Read More »कुंचीमुळे श्वास गुदमरून अर्भकाचा मृत्यू
बेळगाव : डोक्याला घालण्याची कुंचीची दोरी गळ्याभोवती आवळली गेल्यामुळे अवघ्या सहा दिवसांच्या स्त्री जातीच्या एका अर्भकाचा श्वास गुदमरून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना नेहरूनगर येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये नुकतीच घडली. याबाबत समजलेली माहिती अशी की, हिंडलगा येथील ज्योती सागर जाधव (वय 21) या महिलेला बाळंतपणासाठी नेहरूनगर येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल …
Read More »बेळगावात पुन्हा कानडी दादागिरी, मराठी बांधवांच्या आंदोलनाला परवानगी नाकारली!
राज्योत्सव मात्र कोविड नियमावलीनुसार साजरा करणार बेळगाव : कर्नाटक- महाराष्ट्र सीमालढ्याचे केंद्रबिंदू असलेल्या बेळगाव शहरात 1 नोव्हेंबर हा दिवस सीमाभाग महाराष्ट्रापासून तोडून कर्नाटकात घेतला गेल्याच्या निषेधार्थ काळा दिवस म्हणून पाळला जातो. गेल्या सहा दशकात यात कधीही खंड पडला नाही आणि सदनशीर मार्गाने मूकफेरी काढून सीमावासीय मराठी जनता आपला निषेध व्यक्त …
Read More »मंत्रिपदासाठी आ. रमेश जारकीहोळींची थेट दिल्लीतून फिल्डिंग
बेळगाव : मध्यंतरी काही काळ शांत बसलेल्या गोकाकचे आ. रमेश जारकीहोळी यांनी पुन्हा एकदा मंत्रिपदासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. मंत्रिमंडळ विस्ताराची कुणकुण लागल्याने त्यांनी आता दिल्ली गाठली आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची खबर लागल्याने आ. रमेश जारकीहोळी यांनी दिल्ली गाठली आहे. याआधी हात दिलेले मंत्रिपद येनकेन प्रकारे …
Read More »आमदारांनी दांडी मारल्यामुळे बुडाची सभा लांबणीवर
बेळगाव : बेळगाव शहराच्या विकासासंदर्भात महत्वाची चर्चा करण्यासाठी आयोजित केलेल्या ‘बुडा‘च्या बैठकीला भाजप आमदारांच्या अनुपस्थितीचे ग्रहण लागले. त्यामुळे ही बैठक लांबणीवर टाकण्यात आली. बेळगाव नगरविकास प्राधिकरणाची चौथी बैठक सोमवारी बोलावण्यात आली होती. गेल्या सलग दोन बैठकांना गैरहजर असलेले भाजप आ. अभय पाटील आणि अनिल बेनके या बैठकीलाही अनुपस्थित होते. मात्र …
Read More »बेळगाव-तिरुपती विमान सेवा सुरू
बेळगाव : स्टार एअरलाईन्सच्या तिरुपती -बेळगाव -तिरुपती या आरसीएस उडान -3 योजनेअंतर्गत विमान सेवेला आजपासून समारंभपूर्वक प्रारंभ झाला आहे. तिरुपती हे स्टार एअरकडून बेळगावला जोडले जाणारे सातवे शहर आहे. बेळगाव विमानतळावर आज सकाळी आयोजित करण्यात आलेल्या समारंभात प्रमुख पाहुण्या खासदार मंगला सुरेश अंगडी यांच्या हस्ते फित कापण्याससह दीप प्रज्वलन आणि …
Read More »डॉ. सागर मित्तल यांना रुग्णसेवेसाठी पुरस्कार प्रदान
बेळगाव : माधवबाग आयुर्वेद कार्डियाक क्लिनिक व हॉस्पिटल याचा कर्नाटक राज्याचा वार्षिक सन्मान सोहळा नुकताच हुबळी या ठिकाणी पार पडला. यात शहापूर शाखेचे डॉ. सागर मित्तल यांना आऊटस्टँडिंग परफॉर्मन्स इन डायबेटीस व हार्टडीसिज रिव्हरसल कर्नाटक रिजन या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गेले 9 वर्ष डॉ. सागर यांनी माधवबागच्या डिसीज रिव्हर्सल …
Read More »आमदार, नगरसेवक व कार्यकर्त्यांचा एक स्तुत्य उपक्रम
बेळगाव : दक्षिणचे आमदार श्री. अभय पाटील हे गेल्या अनेक वर्षापासून दर रविवारी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह एखाद्या भागात जाऊन त्या भागाचे स्वच्छतेचे काम करतात. रविवार दिनांक 10 ऑक्टोबर रोजी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत हिंदवाडी येथील घुमटमाळ मारुती मंदिर परिसरात भेट देऊन स्वच्छता मोहीम राबविली.त्याचे असे झाले! मंदिराच्या परिसरात बराच कचरा पडलेला …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta