बेळगाव : आषाढी एकादशीनिमित्त श्री तुकाराम महाराज सांस्कृतिक भवनतर्फे आयोजित भक्तीरसपूर्ण “अभंगवाणी” कार्यक्रमास रसिक श्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. स्वरांजलीचे गायक विनायक मोरे आणि अक्षता मोरे यांच्या सुश्राव्य गायनाने उपस्थित रसिक श्रोते भारावून गेले. त्यांना सिंथेसायझरवर संतोष पुरी, तबल्यावर नारायण गणाचारी व ऑक्टोपॅडवर स्नेहल जाधव यांनी अप्रतिम साथसंगत दिली. प्रारंभी …
Read More »कोनेवाडीत भगवा ध्वज फडकवल्याप्रकरणी शिवसेना नेते विजय देवणे यांना जामीन
बेळगाव : कोनेवाडी (ता. जि बेळगाव) येथे भगवा ध्वज फडकावून ‘जय महाराष्ट्र’ अशी घोषणा देऊन मराठी व कन्नड भाषिकांमध्ये तेढ निर्माण केल्याप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी दाखल केलेल्या खटल्यातील ५ जणांविरुद्ध न्यायालयाने वॉरंट जारी केला होता. त्यांच्यापैकी शिवसेना नेते विजय शामराव देवणे हे आज सोमवारी बेळगाव चौथे जेएमएफसी न्यायालयात हजर झाल्यामुळे …
Read More »मालमत्तेच्या हव्यासापोटी वकिलांकडूनच वकिलाचे अपहरण करून खून; रायबाग तालुक्यातील घटना
रायबाग : मालमत्तेच्या हव्यासापोटी वकिलांनीच एका वकिलाचे अपहरण करून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यात घडली असून या प्रकरणात एकूण ८ आरोपींना अटक करण्यात आली आहे तर फरार असलेल्या दोन आरोपींचा शोध सुरू आहे, अशी माहिती बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी …
Read More »मराठा मंडळ बस्तवाड हायस्कूलमध्ये कै. सुवर्णाताई मोदगेकर स्मृतिदिनानिमित्त शालेय गणवेश वितरण
बेळगाव : बस्तवाड (हा.) दिनांक 7/7/2025 रोजी मराठा मंडळ संचलित बस्तवाड हायस्कूलमध्ये 16वा कै. सौ. सुवर्णाताई रामचंद्रराव मोदगेकर स्मृतिदिनानिमित्त शालेय गणवेश वितरण कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य रामा मंगेश काकतकर होते. कार्यक्रमाचे सुरुवात मुलींच्या स्वागत गीताने करण्यात आली. त्यानंतर दोन मिनिटे मौन पाळण्यात आले. कै. सौ. …
Read More »न्यायालयाच्या आवारातच वकिलावर जीवघेणा हल्ला!
बेळगाव : बेळगावमध्ये आणखी एक घृणास्पद घटना घडली आहे. न्यायालयाच्या आवारातच गुन्हेगारांनी वकिलावर जीवघेणा हल्ला केला आणि पळून गेले. वकिल जहीर अब्बास हुक्केरी हे केस संपवून बाहेर पडत असताना त्यांच्यावर न्यायालयाच्या आवारातच दगड आणि रॉडने हल्ला केला. गेल्या चार दिवसांपूर्वी शाळेमध्ये मुलांमध्ये झालेल्या भांडणावरून न्यायालय आवारात त्यांच्या पालकांमध्ये हाणामारी …
Read More »बिजगर्णीत घराची भिंत कोसळली; सुदैवाने जीवितहानी टळली
बेळगाव : बेळगाव तालुक्यात संततधार सुरूच असून आज सोमवार दि. 7 रोजी सकाळी 7 वाजता बिजगर्णी, कलमेश्वर गल्ली येथील वसंत कृष्णा पाटील यांच्या घराची भिंत कोसळली. सुदैवाने त्यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. गेल्या पंधरा दिवसांपासून बेळगाव तालुका परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. काल रविवारी रात्री मुसळधार पाऊस बरसत होता. यामध्ये …
Read More »महापौर, नगरसेवक यांच्या सदस्यत्व अपात्रता स्थगितीला 28 जुलैपर्यंत मुदतवाढ
बेंगळुरू : बेळगाव महानगरपालिकेचे महापौर मंगेश पवार आणि नगरसेवक जयंत जाधव यांच्या सदस्यत्व रद्द करण्याच्या विरोधातील स्थगिती आदेश वाढवण्यात आला आहे. आज उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर स्थगिती आदेश 28 जुलैपर्यंत वाढवण्यात आला आहे. राज्य सरकारच्या वतीने उपस्थित असलेल्या वकिलांनी आक्षेप नोंदवण्यासाठी वेळ मागितला. यासंदर्भात खटला पुढे ढकलण्यात आला. या …
Read More »हिरेबागेवाडीजवळ अपघाताची मालिका; दोन ठार
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील हिरेबागेवाडीजवळ राष्ट्रीय महामार्ग ४ वर रविवारी अपघाताची मालिका घडली. एका ट्रकने दुचाकीस्वार असलेल्या दोन जणांना चिरडल्याने झालेल्या अपघाताच्या तीव्रतेमुळे दोघांचा जागीच मृत्यू झाला. दोन ट्रक, एक कार आणि दोन दुचाकींमध्ये हा अपघात झाला. हुबळी येथील रहिवासी शिवप्पा शहापूर आणि नंदगड येथील रहिवासी रफिक जांबोटी यांचा …
Read More »अथणी येथे भीषण रस्ता अपघात: तिघांचा मृत्यू
अथणी : केएसआरटीसी बस आणि कार यांच्यात भीषण अपघात होऊन तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना अथणी तालुक्यातील मुरगुंडी गावात घडली. तर उर्वरितांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. हे सर्वजण कोल्हापूर येथील महालक्ष्मी देवीचे दर्शन घेऊन परत जात असताना मुरगुंडीजवळ हा अपघात झाला. बस आणि कारमध्ये झालेल्या या जोरदार धडकेत कारचा …
Read More »गणेशपूर येथे विद्युत तारेच्या स्पर्शाने म्हैस दगावली
बेळगाव : ट्रान्सफॉर्मर बसवलेल्या खांबाच्या ठिकाणी विद्युत तारेच्या स्पर्शाने एका म्हशीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दुर्गामाता कॉलनी, गणेशपुर येथे आज रविवारी दुपारी घडली. विजेच्या धक्क्याने मृत्युमुखी पडलेली म्हैस दुर्गामाता कॉलनी येथील बाळू अशोक पाटील यांच्या मालकीची होती. पाटील हे आज नेहमीप्रमाणे दुपारी आपल्या म्हशी चरावयास घेऊन जात होते. त्यावेळी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta