Monday , September 21 2026
Breaking News

बेळगाव

पोहण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू

  धर्मट्टी गावातील दुर्दैवी घटना; परिसरात हळहळ मुडलगी : मुडलगी तालुक्यातील धर्मट्टी गावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. मृत भावांची नावे सागर बाबू मादार (वय १५) आणि प्रवीण बाबू मादार अशी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी …

Read More »

शिवम असोसिएट्सच्या मालकाला सीआयडीकडून अटक

  ४० हजारांहून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचा आरोप बेळगाव : राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या ४,५०० कोटी रुपयांच्या कथित आर्थिक घोटाळ्याप्रकरणी सीआयडीने बेळगावस्थित शिवम असोसिएट्सचे मालक शिवानंद नीलण्णवर यांना अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून, गुंतवणूकदारांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याची माहिती सीआयडीचे डीआयजीपी डॉ. भीमाशंकर …

Read More »

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मित्रा फाऊंडेशनतर्फे वृक्षारोपण

  बेळगाव : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मित्रा फाऊंडेशनच्या वतीने वृक्षारोपणाचा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी फाऊंडेशनच्या सदस्यांनी विविध प्रकारची झाडे लावून पर्यावरण संरक्षणाची सामूहिक जबाबदारी अधोरेखित केली. या उपक्रमात फाऊंडेशनचे पदाधिकारी, सदस्य, महिला वर्ग, युवक तसेच पर्यावरणप्रेमी नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. उपस्थितांनी झाडे लावण्याबरोबरच त्यांचे संगोपन …

Read More »

भाऊबंदकीच्या जमीन वादातील मारहाण प्रकरणात पाच जणांची निर्दोष मुक्तता

  बेळगाव : कावळेवाडी येथील चव्हाट गल्ली परिसरात भाऊबंदकीच्या जमीन वाटपाच्या वादातून झालेल्या कथित मारहाण प्रकरणात दुसऱ्या जेएमएफसी न्यायालयाने पाच आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. फिर्यादी लक्ष्मी यशवंत बुरुड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे पती यशवंत बुरुड तसेच राजाराम व यल्लाप्पा बुरुड यांच्यात शेती आणि घराच्या वाटणीवरून दीर्घकाळ वाद सुरू होता. …

Read More »

सहकार क्षेत्रासमोर मोठी आव्हाने; कर्मचारी व संचालकांनी सहकाराची तत्त्वे समजून काम करावे : प्राचार्य आनंद मेणसे

  बेळगाव : “या देशातील गोरगरीब आणि सामान्य माणसाला स्वतःच्या पायावर उभा करणे, हा सहकार क्षेत्राचा आत्मा आहे. पण सहकार क्षेत्रासमोर स्थानिक आणि राष्ट्रीय पातळीवरची अनेक मोठी आव्हाने उभी आहेत. त्याला सरकारचे धोरण कारणीभूत आहे” असे प्रतिपादन प्राचार्य आनंद मेणसे यांनी बोलताना केले. अनगोळ रोड स्थित आदर्श मल्टीपर्पज सहकारी सोसायटीच्या …

Read More »

व्हॅक्सिन डेपोमध्ये स्वच्छता मोहीम जारी

  बेळगाव : व्हॅक्सीन डेपो प्लास्टिक मुक्त करण्याचा चंग बांधलेल्या समर्थ भारत प्रतिष्ठानच्या वतीने सुभाष चंद्र नगरचे रहिवासी आणि उद्योजक आप्पासाहेब गुरव आणि सुरज नेतलकर यांनी या रविवारीही सकाळी वॅक्सीन डेपो परिसर स्वच्छ केला. दोनच दिवसांपूर्वी साजरा झालेल्या जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून त्यांनी हा उपक्रम राबविला. मागच्या रविवारी त्या …

Read More »

पुन्हा एलपीजी सिलिंडर दरवाढ; केंद्राच्या महागाई धोरणावर लक्ष्मी हेब्बाळकर यांचा हल्लाबोल

  बेळगाव : घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा २९ रुपयांची वाढ केल्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर माजी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिक, मध्यमवर्गीय कुटुंबे आणि गृहिणींवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार असल्याची टीका त्यांनी केली. प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रतिक्रिया देताना हेब्बाळकर म्हणाल्या की, …

Read More »

बेननस्मिथ कॉलेज ऑफ फाइन आर्ट्सतर्फे प्रसिद्ध चित्रकार चंद्रशेखर रांगणेकर यांची चित्रकला कार्यशाळा

  बेळगाव : बेननस्मिथ कॉलेज ऑफ फाइन आर्ट्सतर्फे बेळगावचे प्रसिद्ध चित्रकार चंद्रशेखर रांगणेकर यांची चित्रकला कार्यशाळा आयोजित करण्यात आली. यावेळी प्राचार्या वृंदा चेन तसेच आर्ट अफेअर्स मासिकाचे अक्षय बापट उपस्थित होते. अक्षय बापट यांनी विद्यार्थ्यांना कला प्रदर्शने, संग्रहालये आणि कलाक्षेत्रातील विविध संधींबाबत माहिती दिली. तसेच त्यांनी चंद्रशेखर रांगणेकर यांच्या कलाप्रवास …

Read More »

भारत विकास परिषदेच्यावतीने सागर बी. एड्. च्या नागरिक प्रशिक्षण शिबिरात “सेवा-संस्कार” व्याख्यान- वृक्षारोपण

  बेळगाव : सागर बी. एड्. महाविद्यालयातर्फे आयोजित नागरिक प्रशिक्षण शिबिरांतर्गत बेनकनहळ्ळी येथे भारत विकास परिषदेच्यावतीने “सेवा व संस्कार” याबाबत विशेष व्याख्यान आयोजित केले होते. डॉ. जे. जी. नाईक, प्रा. अरुणा नाईक व राष्ट्रीय महिला कार्यकारिणी सदस्य स्वाती घोडेकर यांनी प्रशिक्षणार्थींना बहुमोल मार्गदर्शन केले. सागर बी. एड्.चे प्राचार्य आर. व्ही. …

Read More »

आदित्यराज कॅपिटलच्या कर्मचाऱ्यांकडून पत्रकारांवर हल्ल्याचा प्रयत्न

  बेळगाव : बहुकोटी रुपयांच्या आर्थिक फसवणुकीच्या आरोपांमुळे चर्चेत असलेल्या आदित्यराज कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडच्या भाग्यनगर येथील कार्यालयाबाहेर शुक्रवारी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. प्रकरणाची माहिती घेण्यासाठी आणि वृत्तांकनासाठी घटनास्थळी पोहोचलेल्या पत्रकार व माध्यम प्रतिनिधींना कंपनीच्या काही कर्मचाऱ्यांकडून अडविण्यात आल्याचा तसेच गैरवर्तन करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीविरोधातील कारवाई …

Read More »