Sunday , September 20 2026
Breaking News

SIR फॉर्म मराठीत देण्याचे निर्देश; भागोजीराव पाटील, मोतेश बारदेशकर यांच्या पाठपुराव्याला यश

Spread the love

 

बेळगाव : सीमाभागातील मराठी भाषिक मतदारांना विशेष पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेतील अर्ज व आवश्यक कागदपत्रे मराठी भाषेत उपलब्ध करून देण्याच्या मागणीला यश आले आहे. यासाठी बेळगावचे सामाजिक कार्यकर्ते भागोजीराव पाटील आणि मोतेश बारदेशकर यांनी दिल्ली येथे जाऊन भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांची प्रत्यक्ष भेट घेत निवेदन सादर केले.

१६ जुलै रोजी सादर करण्यात आलेल्या निवेदनात सीमाभागातील मोठ्या संख्येने असलेल्या मराठी भाषिक नागरिकांना केवळ कन्नड भाषेतील SIR फॉर्म समजून घेण्यात अडचणी येत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले होते. त्यामुळे अनेक मतदारांच्या घटनात्मक मतदानाच्या अधिकारावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.

तसेच महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना सीमाभागातील मराठी भाषिक नागरिकांच्या भाषिक अधिकारांचे संरक्षण करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली होती.

या निवेदनाची दखल घेत केंद्रीय निवडणूक आयोगाने कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना सीमाभागातील मराठी भाषिक नागरिकांसाठी SIR फॉर्म तसेच निवडणूक प्रक्रियेशी संबंधित आवश्यक कागदपत्रे मराठी भाषेत उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिल्याचे भागोजीराव पाटील आणि मोतेश बारदेशकर यांनी सांगितले.

भविष्यात भाषिक अडचणींमुळे मतदारांना त्रास होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेशही निवडणूक आयोगाने दिल्याची माहिती त्यांनी दिली.

या निर्णयामुळे सीमाभागातील मराठी भाषिक मतदारांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणे अधिक सुलभ होणार असून त्यांच्या घटनात्मक अधिकारांच्या संरक्षणाच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय असल्याची प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *