Sunday , September 20 2026
Breaking News

बेळगाव विमानतळाला आधुनिकतेचे पंख; २२३ कोटींच्या नव्या टर्मिनलची चाचणी प्रक्रिया सुरू

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव विमानतळाच्या विस्तार आणि आधुनिकीकरणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल पडले असून ₹२२३ कोटी खर्चाच्या नव्या एकात्मिक टर्मिनल इमारतीच्या कार्यान्वयनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. इंटिग्रेटेड टेस्टिंग अँड कमिशनिंग (ITC) अंतर्गत विविध यंत्रणा आणि सुविधांची अंतिम चाचणी सुरू असून, लवकरच हे अत्याधुनिक टर्मिनल प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे.

नवीन टर्मिनल सुरू झाल्यानंतर बेळगाव विमानतळाची क्षमता आणि सुविधा दोन्हीमध्ये मोठी भर पडणार आहे. प्रवाशांना अधिक वेगवान चेक-इन, सुलभ बोर्डिंग, आधुनिक प्रतीक्षागृहे आणि दर्जेदार सेवा उपलब्ध होणार असून, हवाई प्रवासाचा अनुभव अधिक सुखकर होणार आहे.

या प्रकल्पांतर्गत चार अत्याधुनिक एरोब्रिज, १४ चेक-इन काउंटर, दोन बॅगेज कन्व्हेयर बेल्ट उभारण्यात आले आहेत. याशिवाय विमान उभे करण्याची क्षमता तीनवरून थेट बारा विमानांपर्यंत वाढविण्यात आली असून, एकाच वेळी सुमारे २,४०० प्रवाशांची हाताळणी करण्याची क्षमता नव्या टर्मिनलमध्ये असेल.

बेळगावमधील वाढती हवाई वाहतूक, उद्योग-व्यापाराचा विस्तार आणि पर्यटनाची वाढ लक्षात घेऊन हा प्रकल्प साकारण्यात आला आहे. भविष्यात मोठ्या प्रवासी विमानांचे संचालन, नवीन विमानसेवा आणि वाढत्या प्रवासी संख्येचा ताण सहज पेलण्याची क्षमता या विमानतळाला प्राप्त होणार आहे.

बेळगाव विमानतळाच्या इतिहासातील हा महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, उत्तर कर्नाटकाच्या हवाई संपर्काला नवी गती देतानाच बेळगावला प्रादेशिक विमान वाहतुकीचे सक्षम केंद्र बनविण्याच्या दिशेने हा प्रकल्प मैलाचा दगड ठरणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *