विजयवाणी कार्यालय व अत्याधुनिक प्रिंटिंग युनिटला सरकारी सरदार्स हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक भेट बेळगाव : दररोज हातात पडणारे वृत्तपत्र नेमके तयार कसे होते? एका छोट्याशा बातमीचे हजारो प्रतींमध्ये रूपांतर कशा प्रक्रियेतून घडते? या प्रश्नांची उत्तरे सरकारी सरदार्स हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून मिळाली. कर्नाटकातील सर्वाधिक खपाचे आणि अग्रगण्य कन्नड दैनिक ‘विजयवाणी’च्या …
Read More »मुस्लिम तरुणाच्या छळाला कंटाळून अल्पवयीन तरुणीची आत्महत्या?; तरुण अटकेत
अथणी : अथणी तालुक्यातील ऐगळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन हिंदू तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली असून, तिच्या कुटुंबीयांनी एका मुस्लिम तरुणावर सतत छळ केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित तरुणाला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणी पीयूसीमध्ये शिक्षण घेत होती. तिची ओळख पिराज काळे या …
Read More »सोन्या-चांदीचे १८ लाखांचे दागिने जप्त; घरफोडी प्रकरणी संशयित अटकेत
बेळगाव : बेळगाव शहर आणि तालुक्यातील विविध भागांत घरफोडी व चोरीच्या घटना घडविणाऱ्या एका संशयिताला वडगाव ग्रामीण पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून तब्बल १८ लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले आहेत. अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव निलेश भरमा सुतार (वय ४१) असे असून तो मूळचा भोवी गल्ली, बेळगाव येथील रहिवासी …
Read More »मराठा बँकेच्या कारभारात भ्रष्टाचार?; कृतीशील मराठा समाज आक्रमक
बेळगाव : मराठा बँकेतील कथित अनियमितता, वाढता खर्च, नियमबाह्य नोकरभरती आणि संचालक मंडळाच्या कारभाराविरोधात ‘कृतीशील मराठा समाजा’च्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. बँकेतील आर्थिक व प्रशासकीय व्यवहारांची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. पत्रकार परिषदेत बोलताना अमित देसाई यांनी रिझर्व्ह बँकेच्या …
Read More »संध्या सुरक्षा योजनेत मोठा गैरप्रकार; अपात्र लाभार्थ्यांच्या संख्येत बेळगाव जिल्हा अव्वल
बेळगाव : वृद्धांना आर्थिक आधार मिळावा या उद्देशाने राज्य सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या संध्या सुरक्षा पेन्शन योजनेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे. पात्र वृद्धांना दरमहा १,२०० रुपये पेन्शन देण्यात येत असताना अनेक अपात्र व्यक्तींनी बनावट कागदपत्रांच्या आधारे योजनेचा लाभ घेतल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे, अपात्र लाभार्थ्यांच्या संख्येत …
Read More »शिक्षणाचा भार यंदाही अतिथी शिक्षकांवरच; कायमस्वरूपी भरतीकडे दुर्लक्ष
बेळगाव जिल्ह्यात १,६१७ अतिथी शिक्षकांची होणार नियुक्ती बेळगाव : राज्यातील सरकारी शाळांमधील शिक्षकांची कमतरता भरून काढण्यासाठी यंदाही अतिथी शिक्षकांवरच शिक्षण व्यवस्थेची भिस्त राहणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात एकूण १,६१७ अतिथी शिक्षकांची नियुक्ती करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला असून त्याबाबतची यादी संबंधित गटशिक्षणाधिकारी कार्यालयांमध्ये प्रसिद्ध करण्यात …
Read More »बालिका आदर्श विद्यालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण
बेळगाव : टिळकवाडी येथील बालिका आदर्श विद्यालयाच्या एनसीसी विभागाच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित वृक्षारोपण उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमात शाळा परिसरासह सार्वजनिक ठिकाणी विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी आणि पालकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत पर्यावरण रक्षणासाठी आपले …
Read More »दुरुस्तीच्या बहाण्याने लंपास केलेले १५.७३ लाखांचे सोने शहापूर पोलिसांनी केले हस्तगत
बेळगाव : दुरुस्तीसाठी विश्वासाने दिलेला सोन्याचा हार अपहार करून लंपास करणाऱ्या आरोपीला शहापूर पोलिसांनी अटक करत १५ लाख ७३ हजार ३७० रुपये किमतीचे १०३.९७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे विश्वासघाताच्या गुन्ह्याचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी कृष्णा मोहन मैती (वय ३६, मूळ …
Read More »आदित्यराज कॅपिटल्सवर छापा; आर्थिक व्यवहार आणि नेटवर्किंगची सखोल चौकशी करण्याची मागणी
बेळगाव : भाग्यनगर येथील आदित्यराज कॅपिटल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीवर गुरुवारी महसूल, सहकार आणि पोलीस विभागाच्या संयुक्त पथकाने छापा टाकल्याने आर्थिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. कंपनीने हजारो गुंतवणूकदारांकडून ठेवी गोळा केल्याचा आरोप असून, दरमहा ५ टक्के व्याजदराचे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आकर्षित करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. …
Read More »मराठी विद्यानिकेतनमध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा
बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये दिनांक ५जून २०२६रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. यावेळी शाळेकडे इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांतर्फे रोपे सुपूर्द करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे शिक्षक गजानन सावंत उपस्थित होते. इयत्ता सातवीची विद्यार्थिनी ओजस्वी तानाजी गुरव हिने आपले मनोगत व्यक्त केले तर सोहम प्रताप बेळगुंदकर याने पर्यावरणासंबंधी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta