Sunday , September 20 2026
Breaking News

बीएलओ व बीएलए यांच्या एसआयआर सर्वेक्षणातील अडचणींबाबत किरण जाधव यांनी खासदार जगदीश शेट्टर यांची घेतली भेट

Spread the love

 

बेळगाव : भारतीय जनता पक्षाचे नेते किरण जाधव यांनी लोकसभेचे खासदार जगदीश शेट्टर यांची भेट घेऊन सुरू असलेल्या विशेष सघन मतदार यादी पुनरिक्षण (SIR) सर्वेक्षणादरम्यान बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) आणि बूथ लेव्हल एजंट (BLA) यांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींबाबत सविस्तर चर्चा केली.

यावेळी किरण जाधव यांनी प्रत्यक्ष सर्वेक्षणाच्या कामात येणाऱ्या अडचणी, नागरिकांशी समन्वय साधताना निर्माण होणाऱ्या समस्या तसेच सर्वेक्षण सुरळीतपणे पूर्ण होण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती खासदार शेट्टर यांना दिली. संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधून या सर्व समस्यांचे तातडीने निराकरण करण्याची विनंती त्यांनी केली.

खासदार जगदीश शेट्टर यांनी सर्व बाबी गांभीर्याने ऐकून घेतल्या असून, बीएलओ व बीएलए यांच्या न्याय्य अडचणी शासन व संबंधित विभागाच्या निदर्शनास आणून त्यावर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी आवश्यक पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. तसेच, एसआयआर सर्वेक्षण यशस्वी करण्यासाठी कार्यरत असलेल्या सर्व बीएलओ व बीएलए यांच्या मेहनतीचे त्यांनी कौतुक केले.

या भेटीदरम्यान हनमंत कागलकर, राजन जाधव, गणेश देढे, पार्थ भोसले आणि विनायक शिनगावकर हे उपस्थित होते.

या बैठकीमुळे एसआयआर सर्वेक्षणाशी संबंधित प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लागतील आणि बीएलओ व बीएलए यांना अधिक कार्यक्षमतेने काम करता येईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *