बंगळुरू : माजी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी गुरुवारी बंगळुरूमध्ये माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची भेट घेऊन त्यांच्या मंत्रिमंडळात तीन वर्षे मंत्री म्हणून सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी बोलताना लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या की, शोषित, वंचित आणि गरीब घटकांचा आवाज बनून लोकाभिमुख प्रशासन देण्याचे श्रेय सिद्धरामय्या यांना जाते. त्यांच्या …
Read More »राष्ट्रीय मिलिटरी स्कूलमध्ये सीबीआयची चौकशी; आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपांची पडताळणी
बेळगाव : देशातील सहा राष्ट्रीय मिलिटरी स्कूलपैकी एक असलेल्या राष्ट्रीय मिलिटरी स्कूल बेळगाव येथे कथित आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपांप्रकरणी सीबीआय पथकाने बुधवारी चौकशी केली. उपअधीक्षक (डीएसपी) यांच्या नेतृत्वाखालील सुमारे १२ अधिकाऱ्यांचे पथक तसेच लष्करी गुप्तचर विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शाळेला भेट देत विविध नोंदींची तपासणी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. मिळालेल्या …
Read More »आदित्यराज कॅपिटल प्रा. लि.वर धाड; आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू
बेळगाव : ठेवीदारांची फसवणूक केल्याच्या आरोपांवरून बेळगाव शहरातील भाग्यनगर येथील आदित्यराज कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेवर गुरुवारी प्रशासनाच्या पथकाने धाड टाकून कागदपत्रांची तपासणी केली. ही कारवाई उपविभागीय अधिकारी शरण नायक यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित संस्था कोणत्याही सरकारी नियमांचे योग्य पालन न करता आणि आवश्यक परवानग्यांशिवाय नागरिकांना …
Read More »पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण व आरोग्य तपासणी शिबिर उद्या
बेळगाव : पाळीव प्राण्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता लक्षात घेऊन शुक्रवार, दि. 5 जून रोजी मोफत लसीकरण व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर दुपारी 12 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत अनगोळ मेन रोड येथील हरी ओम अपार्टमेंटमधील पेट क्लिनिकमध्ये होणार आहे. शिबिरामध्ये पशुवैद्यकीय तज्ज्ञांची टीम पाळीव प्राण्यांची …
Read More »खडेबाजार पोलिसांची मटका अड्ड्यावर धाड; एक आरोपी अटकेत
बेळगाव : खडेबाजार पोलीस ठाण्याच्या पथकाने मटका जुगार विरोधात कारवाई करत एका आरोपीला अटक केली असून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ जून रोजी सदाशिवनगर येथील कार्तिक प्रल्हाद होळेन्नवर (वय ३०) हा बसवण गल्लीतील बंगी बोळ परिसरात सार्वजनिक ठिकाणी अंकांवर पैसे लावून ओसी …
Read More »विद्यार्थ्यांचीही फेस रिडिंगद्वारे हजेरी; शिक्षकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता
बेळगाव : शिक्षकांची उपस्थिती कर्तव्य ॲपद्वारे फेस रिडिंगच्या माध्यमातून नोंदविली जात असतानाच आता विद्यार्थ्यांची हजेरीदेखील फेस रिडिंगद्वारे नोंदविण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. याबाबतचे आदेश नुकतेच जारी करण्यात आले असून, यामुळे शिक्षकांच्या कामाच्या ताणात आणखी भर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या शिक्षकांना स्वतःची उपस्थिती कर्तव्य ॲपवर नोंदविताना …
Read More »कोर्ट परिसर आहे की दारूचा अड्डा; जिल्हाधिकारी लक्ष देतील का?
बेळगाव : न्यायदानाचे पवित्र केंद्र मानल्या जाणाऱ्या कोर्ट परिसरातच मद्यपान करून बाटल्या इतरत्र टाकल्याचे चित्र समोर आले आहे. कोर्ट परिसरात येणारे पक्षकार, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थी यांना अशा प्रकारामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी मद्याच्या बाटल्या, प्लास्टिकचे ग्लास आणि इतर कचरा आढळून येत असल्याने परिसराच्या स्वच्छतेवरही …
Read More »डी. के. शिवकुमार मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच बेळगावात काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष
मृणाल हेब्बाळकर यांच्या नेतृत्वाखाली विजयोत्सव; राणी चन्नम्मा चौकात फटाक्यांची आतषबाजी, मिठाई वाटप बेळगाव : कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी डी. के. शिवकुमार यांनी शपथ घेतल्यानंतर बेळगावात काँग्रेस कार्यकर्त्यांनी उत्साहात विजय उत्सव साजरा केला. युवा काँग्रेस नेते मृणाल हेब्बाळकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामुळे शहरात उत्सवी वातावरण निर्माण झाले. शहरातील काँग्रेस …
Read More »श्रीरामजन्म म्हणजे काळोखावर प्रकाशाने मिळवलेल्या विजयाचा आरंभ होय : डॉ. शेवडे
बेळगाव : पराक्रमी असूनही क्रूरकर्मा असलेल्या रावणाने देव, यक्ष, गंधर्व आणि राक्षस यांच्या हातून वध न होण्याचा वर मिळवला होता. अति आत्मविश्वासाने त्याने यातून मनुष्याला वगळले होते. भगवंतांनी मनुष्यावतार घेऊन त्याचा नाश केला. रामजन्म म्हणजे अमंगलावर मांगल्याने, अभद्रावर भद्राने आणि काळोखावर प्रकाशाने मिळवलेल्या विजयाचा आरंभ होता असे प्रतिपादन ख्यातनाम …
Read More »वैश्यवाणी समाजातर्फे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तसेच शैक्षणिक साहित्य वाटप
बेळगाव : श्री समादेवी संस्थान, वैश्यवाणी समाज, वैश्यवाणी युवा संघटना व वैश्य वाणी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने समाजातील 200 अधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले व इयत्ता आठवी ते बारावी पर्यंतच्या समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले. गोवावेस येथील चिदंबर पांडुरंग व राजाराम महाराज गुरु मठात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta