Monday , September 21 2026
Breaking News

23 वर्षांच्या कायदेशीर लढ्याला पूर्णविराम; युनियन जिमखान्याचा ताबा संरक्षण मंत्रालयाकडे

Spread the love

 

बेळगाव : शहरातील नामांकित क्रीडा संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युनियन जिमखान्याच्या सुमारे 6.5 एकर जागेचा ताबा अखेर संरक्षण मंत्रालयाने घेतला आहे. तब्बल 23 वर्षे न्यायालयात सुरू असलेल्या कायदेशीर लढ्याचा कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाच्या निकालानंतर शेवट झाला.

संरक्षण मालमत्ता कार्यालयाच्या कर्नाटक विभागीय अधिकारी दिव्या एस. होसूर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (दि. 16 जुलै) ही कारवाई करण्यात आली. संबंधित जागेचा ताबा संरक्षण मंत्रालयाकडे अधिकृतपणे हस्तांतरित करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, 2002 मध्ये भाडेपट्ट्याचा कालावधी संपल्यानंतरही युनियन जिमखान्याकडून संबंधित जागेचा वापर सुरू होता. यासंदर्भातील वाद न्यायालयात प्रलंबित होता. या प्रकरणात कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाने युनियन जिमखान्याची याचिका फेटाळून लावत भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या बाजूने निकाल दिला.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 16 जुलै 2026 रोजी ताबा हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. डिफेन्स इस्टेट्स ऑफिसर, संरक्षण मालमत्ता विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत ही कारवाई पार पडली. यावेळी बेळगाव शहर पोलीस आयुक्तालय, पोलीस दल, बेळगाव छावणी मंडळ तसेच स्थानिक लष्करी प्राधिकरण एमएलआयआरसी (MLIRC) आणि भारतीय लष्कराने आवश्यक ते सहकार्य केले.

या कारवाईमुळे दीर्घकाळ न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेल्या संरक्षण विभागाच्या महत्त्वाच्या मालमत्तेचा ताबा अखेर केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाकडे आला आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *