Monday , September 21 2026
Breaking News

मच्छे येथील व्ही. एस. पाटील सरकारी शाळेत प्रा. वैदेही जाधव यांचे आरोग्याविषयी मार्गदर्शन

Spread the love

 

श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्रामाभिवृद्धी योजनेच्यावतीने विशेष कार्यक्रम 

बेळगांव : मच्छे येथील व्ही. एस. पाटील सरकारी शाळेत ‘स्वास्थ्य संकल्प’ उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती करण्यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमात विद्यार्थ्यांना निरोगी जीवनशैलीचे महत्त्व तसेच तंबाखू, मद्य आणि अमलीपदार्थांच्या व्यसनापासून दूर राहण्याचा संदेश देण्यात आला.

कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्या प्रा. वैदेही जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले. त्यांनी तंबाखूजन्य पदार्थ, मद्य आणि अमलीपदार्थांच्या सेवनामुळे होणारे शारीरिक, मानसिक व सामाजिक दुष्परिणाम विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत समजावून सांगितले. तसेच निरोगी जीवनशैली स्वीकारून व्यसनमुक्त समाज घडविण्यात विद्यार्थ्यांनी सक्रिय भूमिका बजावावी, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस. डी. पाटील होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्रामाभिवृद्धी योजनेच्या माध्यमातून ग्रामीण विकास, स्वावलंबन आणि सामाजिक जनजागृतीच्या क्षेत्रात होत असलेल्या कार्याचा गौरव केला. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी संस्थेचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले.

पर्यवेक्षक मारुती पाटील यांनी धर्मस्थळ ग्रामाभिवृद्धी योजनेच्या विविध सामाजिक उपक्रमांचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे स्वागत शितल यांनी केले, तर ज्ञानविकास समन्वय अधिकारी दीपिका यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला शिक्षकांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *