बेळगाव : सावगाव येथील मराठी प्राथमिक शाळेत कन्नडी शाळा सुरू करण्याचा घाट घालण्यात आला. यामुळे संपूर्ण मराठी भाषिकांत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. यावेळी जिल्हा शिक्षणाधिकारी यांना मोठ्या संख्येने जमून निवेदन देण्याचे ठरले होते पण सदर घटनेबाबत वातावरण चिघळले जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने बी ई ओ अधिकारी यांनी थेट …
Read More »शिवानंद महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त स्वच्छता, जनजागृती फेरी व वृक्षारोपण
कागवाड : पर्यावरण संवर्धनाची काळाची गरज ओळखून येथील शिवानंद महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) यांच्यावतीने जागतिक पर्यावरण दिन विविध उपक्रमांनी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यामध्ये महाविद्यालय परिसर स्वच्छता, पर्यावरण जनजागृती फेरी आणि वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी एनसीसी कॅडेट्सनी महाविद्यालय परिसराची स्वच्छता करून स्वच्छतेचा संदेश …
Read More »मराठी शाळेत कन्नड शाळा सुरू करण्यास विरोध; शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देणार
बेळगाव : सावगाव येथील सरकारी हायर प्रायमरी मराठी मुला-मुलींच्या शाळेच्या परिसरात कन्नड शाळा भरविण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर गावातील मराठी बांधव, आजी-माजी विद्यार्थी, पालक आणि विद्यार्थ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. या मागणीसाठी गावातील नागरिकांनी एकत्र येत शालेय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गुरुवारी सकाळी १० …
Read More »सावगावमध्ये मराठी शाळेच्या इमारतीत कन्नड शाळेला विरोध
बेळगाव : सावगाव येथील सरकारी मराठी उच्च मुला-मुलींच्या शाळेच्या इमारतीत कन्नड माध्यमाची शाळा सुरू करण्याच्या हालचालींमुळे गावात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थ, पालक तसेच आजी-माजी विद्यार्थ्यांनी या प्रस्तावाला विरोध दर्शवित कन्नड शाळेसाठी स्वतंत्र जागेची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. सरकारी शाळांमधील घटती पटसंख्या हा आधीच चिंतेचा विषय असताना, …
Read More »उचगाव, हिंडलगा परिसरात उद्या ७ तास वीजपुरवठा खंडित
बेळगाव : वीज वाहिन्यांच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी हेस्कॉमकडून नियोजित वीज बंद ठेवण्यात येणार असल्याने शुक्रवार, दि. ५ जून रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत उचगाव व हिंडलगा उपकेंद्रांवरून वीजपुरवठा होणाऱ्या अनेक गावांमध्ये वीजपुरवठा खंडित राहणार आहे. हेस्कॉम ग्रामीण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उचगाव उपकेंद्राच्या कार्यक्षेत्रातील बिजगर्णी, बोकमूर, कावळेवाडी, …
Read More »पंचकन्यांमध्ये अहल्येला स्थान देणे, ही भारतीय संस्कृतीची महानता : डॉ. शेवडे
बेळगाव : गौतमांच्या वेषात देवराज इंद्र आला आहे हे जाणूनही अहल्या इंद्राच्या आधीन झाली. बऱ्याच जणांना अहल्याच्या हातून हे पाप अजाणतेपणी झाले असे वाटते, परंतु वाल्मिकी रामायणात मात्र अहल्येने जाणीवपूर्वक हे पाप केल्याचे दिसते. गौतमांच्या येण्याची वेळ झाली हे पाहून तिने इंद्राला तातडीने निघून जाण्याचे सांगितले. गौतमांनी इंद्राला पाहिले …
Read More »राजश्री एग्रीवेंचर, शिवसेनेतर्फे सुळगा (उ.) येथील सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी मुला-मुलींच्या शाळेमध्ये वह्यांचे वाटप
बेळगाव तालुक्यातील सुळगा (उ.) येथील सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी मुला-मुलींच्या शाळेमध्ये राजश्री एग्रीवेंचर आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) बेळगाव यांच्यावतीने मुलां-मुलींना वह्यांचे वाटप करण्याचा कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला. नव्या शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या उपक्रमांतर्गत संपूर्ण 230 मुलां-मुलींना वह्या वाटप करण्यात आले. प्रारंभी प्रमुख पाहुण्या राजश्री अग्रीवेंचरच्या संस्थापिका …
Read More »जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला बेहेरे फाउंडेशनतर्फे वृक्षारोपण अभियान
बेळगाव : जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला बेहेरे फाउंडेशनच्या वतीने नंदीहळ्ळी जवळील नागेनहट्टी रोड परिसरात भव्य वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले. यावेळी एकूण ३३० रोपांची लागवड करण्यात आली. यामध्ये सावली देणारी व रस्त्यालगत लावली जाणारी वृक्षप्रजाती, फळझाडे, फुलझाडे तसेच औषधी वनस्पतींचा समावेश होता. यावेळी बोलताना फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. रत्ना बेहेरे यांनी …
Read More »बसथांबे व सार्वजनिक ठिकाणांवरील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर; कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सहकार्याचे आवाहन
बेळगाव : कॅन्टोन्मेंट बोर्ड बेळगावने शहरातील बसथांबे, पदपथ, उद्याने आणि सार्वजनिक ठिकाणांवरील स्वच्छता व सुरक्षेचा प्रश्न गंभीरपणे घेत संबंधित शासकीय विभाग, सामाजिक संस्था आणि नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम हरिविजय मंचलवार यांनी यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक जारी केले. कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने गुरुवारी पहाटे विशेष सफाई पथकाने विविध …
Read More »श्री ब्रह्मचैतन्य रुग्ण सेवा फाउंडेशनचा उद्घाटन सोहळा उत्साहात
बेळगाव : गरजू रुग्णांना आवश्यक वैद्यकीय साहित्य मोफत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या श्री ब्रह्मचैतन्य रुग्ण सेवा फाउंडेशनच्या उद्घाटन सोहळ्याचा कार्यक्रम नुकताच आराम हॉटेल शेजारी, वेंगुर्ला रोड, हिंडलगा येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. विनोद गायकवाड उपस्थित होते. तसेच …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta