Monday , September 21 2026
Breaking News

जमिनीच्या वादातून दोन सख्ख्या भावांची हत्या, सहा आरोपी अटकेत

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील सौन्दत्ती तालुक्यातील नुग्गानट्टी गावात जमीन आणि मालमत्तेच्या वाटणीच्या वादातून दोन सख्ख्या भावांची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मुरगोड पोलिसांनी तातडीने कारवाई करत सहा आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

मृतांची नावे बसप्पा फकीरप्पा रामण्णावर आणि लक्कप्पा फकीरप्पा रामण्णावर अशी आहेत. जमीन मोजणी पूर्ण झाल्यानंतर मालमत्तेच्या हक्कावरून कुटुंबीयांमध्ये वाद निर्माण झाला होता. हा वाद विकोपाला गेल्यानंतर मध्यरात्री आरोपींनी संघटितपणे घरात घुसून हल्ला चढवला.

आरोपींनी काठ्या, लोखंडी रॉड आणि दगडांच्या साहाय्याने केलेल्या हल्ल्यात दोन्ही भावांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या हल्ल्यात फकीरप्पा नीलप्पा रामण्णावर यांच्यासह घरातील दोन मुले जखमी झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच मुरगोड पोलिसांनी तात्काळ तपासाची सूत्रे हाती घेत सहा मुख्य आरोपींना अटक केली. जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (डीएसपी) यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तसेच तपासाला गती देण्याचे निर्देश दिले.

पोलीस या प्रकरणात इतर कोणाचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग आहे का, याचाही तपास करत आहेत. मालमत्तेच्या वादातून घडलेल्या या दुहेरी हत्याकांडामुळे नुग्गानट्टी गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *