Monday , September 21 2026
Breaking News

मोबाईलच्या वादातून मित्राची दगडाने ठेचून हत्या; आरोपीला मुरगोड पोलिसांनी केली अटक

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यातील चिकबुदनूर गावात मोबाईल फोनच्या किरकोळ वादातून एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी मुरगोड पोलिसांनी तातडीने कारवाई करून आरोपीला अटक केली आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी दिली.

मृताचे नाव फकीरप्पा मल्लप्पा हिडकण्णावर (वय ४०) असून ते मजुरी करून उदरनिर्वाह करत होते. आरोपी मल्लिकार्जुन सिद्धप्पा पुजारी (वय २५) हा त्यांचा मित्र असून, त्याने दिलेल्या मोबाईल फोनवरून दोघांमध्ये वाद झाला होता.

शनिवारी सायंकाळी चिकबुदनूर येथील लक्ष्मीदेवी मंदिराच्या आवारात हा वाद उफाळून आला. फकीरप्पा मंदिराच्या ओसरीवर झोपले असताना आरोपीने त्यांच्याकडे मोबाईल परत मागितला. मात्र, “मोबाईल रात्री देतो,” असे सांगत फकीरप्पा यांनी तो देण्यास नकार दिल्याने आरोपी संतापला.

रागाच्या भरात मल्लिकार्जुनने मंदिर परिसरातील मोठा दगड उचलून फकीरप्पा यांच्या डोक्यावर वार केला. गंभीर दुखापतीमुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

या प्रकरणी मृताच्या पत्नी भारती हिडकण्णावर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुरगोड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी सांगितले की, मोबाईल फोनच्या किरकोळ वादातून ही दुर्दैवी घटना घडली असून आरोपीविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येत आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *