Monday , September 21 2026
Breaking News

गुणवंत विद्यार्थिनीचे आयआयटीचे स्वप्न साकार करण्यासाठी संजीवीनी फौंडेशन कटिबद्ध

Spread the love

 

बेळगाव : ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल पण गुणवंत विद्यार्थिनी कु. अश्विनी पुजारी हिच्या उच्च शिक्षणासाठी संजीवीनी फौंडेशनतर्फे यंदाही शैक्षणिक मदत देण्यात आली आहे.
निपाणी तालुक्यातील ढोणेवाडी येथील अश्विनी हिच्या पीयूसी द्वितीय वर्षाचे शैक्षणिक शुल्क फौंडेशनतर्फे भरून तिच्या शैक्षणिक वाटचालीला बळ देण्यात आले आहे.
संजीवीनी फौंडेशनने गतवर्षी अश्विनी हिची शैक्षणिक जबाबदारी स्वीकारून अल्वास महाविद्यालय, मूडबिद्री येथे पीयूसी प्रथम वर्षासाठी प्रवेश मिळवून दिला होता. त्याचबरोबर संपूर्ण वर्षभराचा वसतिगृह खर्चही फौंडेशनने उचलला होता. अश्विनीने उत्कृष्ट गुणांसह प्रथम वर्ष पूर्ण केले असून तिचे स्वप्न आयआयटीमधून अभियांत्रिकी शिक्षण घेण्याचे आहे. त्यासाठी ती सध्या जेईई प्रवेश परीक्षेची तयारी करीत आहे.
तिच्या शैक्षणिक प्रगतीसाठी संस्थापिका डॉ. सविता देगीनाळ आणि शिक्षिका मुक्ता मोटराचे यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन लाभत आहे.
संजीवीनी फौंडेशनचे चेअरमन मदन बामणे यांनी सांगितले की, फौंडेशनतर्फे “वृद्धांना आधार”, “रुग्णांना आधार” आणि “विद्या आधार” या महत्त्वपूर्ण योजना राबविल्या जात आहेत. अश्विनी पुजारी हिला “विद्या आधार” योजनेअंतर्गत मदत करण्यात येत आहे. याच योजनेतून आणखी एका होतकरू विद्यार्थिनीच्या एमबीए शिक्षणाचा संपूर्ण खर्चही संजीवीनी फौंडेशनतर्फे उचलला जात आहे.
ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळावी आणि त्यांची स्वप्ने साकार व्हावीत, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे मदन बामणे यांनी सांगितले.

या उपक्रमाबद्दल अश्विनीच्या पालकांनी आणि शिक्षकांनी संजीवीनी फौंडेशनचे आभार व्यक्त केले आहेत.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *