बेळगाव : आदित्यराज कॅपिटल प्रकरणात तपास यंत्रणांनी कारवाईचा वेग वाढवला असून कंपनीचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) बलराज माने यांच्यासह सहाजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच माने यांनी देश सोडू नये यासाठी त्यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि पोलिस आयुक्त भूषण बोरसे …
Read More »मुक्तांगण विद्यालयात जागतिक पर्यावरण दिन साजरा
बेळगाव : आदर्श गुण विकास प्रतिष्ठान संचलित मुक्तांगण विद्यालय, भाग्यनगर येथे शुक्रवारी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून झालेल्या कार्यक्रमात संस्थेचे सचिव आर वाय पाटील, सदस्य एस एल पाटील हे पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष ए एल गुरव हे होते. शाळेच्या प्राचार्या …
Read More »जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ज्योती सेंट्रल स्कूलची सायकल रॅली उत्साहात संपन्न
बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूल, कॅम्प, बेळगांव, सांच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शालेय प्राचार्य श्री. प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांची भव्य सायकल रॅली आयोजित करण्यात आली. चेन्नम्मा सर्कल येथे आयोजित सायकल रॅलीचे उद्घाटन पर्यावरण प्रेमी व ज्येष्ठ समाजसुधारक श्री. शिवाजीराव कागणीकर व शाळेचे माजी …
Read More »येळ्ळूर म. ए. समितीच्यावतीने दिनेश ओऊळकर यांचे अभिनंदन
येळ्ळूर : बेळगावचे सुपुत्र महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न तज्ञ समितीवर कार्यरत असलेले आणि सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ प्रशासकीय अधिकारी दिनेश ओऊळकर यांची भारतीय रिझर्व बँकेने अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक क्षेत्रासाठी आदर्श उपनिधी तयार करणाऱ्या उच्चस्तरीय समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती भुषणावह आहे. म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने अभिनंदन करण्याचा ठराव संमत …
Read More »जागतिक सायकल दिनानिमित्त ‘संडे ऑन सायकल – स्वच्छता राईड’चे आयोजन
बेळगाव : जागतिक सायकल दिन आणि फिट इंडिया अभियानाच्या पार्श्वभूमीवर रविवार, दि. ७ जून रोजी ‘संडे ऑन सायकल – स्वच्छता राईड’ या विशेष सायकलिंग मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, आरोग्यदायी जीवनशैली आणि स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या सायकल फेरीची सुरुवात सकाळी …
Read More »शिवाजी महाराज काळाच्या पुढचा विचार करणारे द्रष्टे राजे
शिवाजी कोण होता ? पुस्तकावर प्रा. दत्ता नाडगौडा यांचे व्याख्यान बेळगांव : शिवाजी महाराजांनी नेहमी प्रजेच्या कल्याणाचा विचार केला. म्हणूनच सर्वसामान्य माणसाला म्हणजेच रयतेला ते आपले राज्य वाटत होते. शिवाजी महाराज हे काळाच्या पुढचा विचार करणारे द्रष्टे राजे होते, असे उद्गार जी. एस. एस. काॅलेजचे निवृत्त प्राध्यापक दत्ता नाडगौडा …
Read More »शरद पवार साहेब यांच्याशी सीमाप्रश्नी मध्यवर्ती म. ए. समितीच्या शिष्टमंडळाची चर्चा
बेळगाव : महाराष्ट्र–कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याच्या सुनावणीला गती मिळावी आणि महाराष्ट्र सरकारने अधिक प्रभावी पाठपुरावा करावा, अशी मागणी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे केली. कोल्हापूर मुक्कामी मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पवार साहेबांची भेट घेऊन सीमाप्रश्नी …
Read More »बालवीर विद्यानिकेतन शाळेमध्ये पर्यावरण दिन साजरा
बेळगाव : बेळगुंदी येथील बालवीर सोशल फाउंडेशन संचलित बालवीर विद्यानिकेतन बेळगुंदी शाळेमध्ये जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख अतिथी सोनिया जाधव यांच्या हस्ते कुंडीतील रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, पर्यावरणाचे महत्त्व अनन्य साधारण असून आपण सर्वांनी त्याचे जतन व …
Read More »महाराष्ट्र एकीकरण युवा समिती शैक्षणिक उपक्रम २०२६; इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांची पटसंख्या पाठविण्याचे आवाहन
बेळगाव : सालाबाद प्रमाणे मातृभाषेतील शाळेत प्रवेश घेऊन मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने सीमाभागातील सर्व शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. मागील ९ वर्षे हा उपक्रम सलग सुरू असून २०२६ शैक्षणिक वर्षात सीमाभागातील सर्व मराठी प्राथमिक शाळांमध्ये प्रवेश घेतलेल्या *१लीच्या …
Read More »देखभाल-दुरुस्तीमुळे रविवारी वडगाव उपकेंद्र परिसरात दिवसभर वीजपुरवठा खंडित
‘संडे’ ठरणार ‘ब्लॅक संडे’; सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित बेळगाव : वीज वाहिन्यांची देखभाल व दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार असल्याने 110 केव्ही वडगाव उपकेंद्रावरून वीजपुरवठा होणाऱ्या अनेक भागांमध्ये रविवार, 7 जून रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित राहणार असल्याची माहिती हेस्कॉमने दिली …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta