Sunday , September 20 2026
Breaking News

रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे कडोली शासकीय हायस्कूलमध्ये वृक्षारोपण

Spread the love

 

बेळगाव : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे कडोली येथील शासकीय हायस्कूलमध्ये वृक्षारोपण मोहीम उत्साहात पार पडली. पर्यावरण संरक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेमाची भावना रुजविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

या मोहिमेचे नेतृत्व क्लबच्या अध्यक्षा रोटेरियन डॉ. स्फूर्ती मस्तिहोळी यांनी केले. क्लबच्या सचिव रोटेरियन ज्योती कुलकर्णी, प्रकल्प अध्यक्षा रोटेरियन सविता हेब्बार तसेच चार्टर अध्यक्षा रोटेरियन शीतल चिलमी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली.

यावेळी रोटेरियन शिवलीला कांपळी, रोटेरियन रक्षा उपाध्ये आणि रोटेरियन सविता वेसणे यांनीही वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

कार्यक्रमादरम्यान शाळेचे मुख्याध्यापक श्री. कांबळी आणि कार्यक्रम समन्वयक सौ. प्रवीणा यांचा सहकार्याबद्दल रोटरी क्लबतर्फे सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना डॉ. स्फूर्ती मस्तिहोळी यांनी पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षारोपणाचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी लावलेल्या प्रत्येक रोपाचे संगोपन करून पर्यावरणाचे जबाबदार रक्षक बनावे, असे आवाहन त्यांनी केले.

रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे पर्यावरणीय शाश्वतता, सामाजिक बांधिलकी आणि भावी पिढ्यांसाठी निरोगी व सुरक्षित भविष्य घडविण्याच्या उद्देशाने अशा समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन पुढेही सातत्याने करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *