Sunday , September 20 2026
Breaking News

कर्नाटक मंत्रिमंडळ विस्तारावर मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची खर्गेंसोबत महत्त्वाची चर्चा; नव्या चेहऱ्यांना संधीची शक्यता

Spread the love

 

बंगळूर : राज्याचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी शनिवारी अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (एआयसीसी) अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेऊन राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वपूर्ण चर्चा केली. गेल्या तीन दिवसांपासून खर्गे हे बंगळुरात वास्तव्यास आहेत.

यापूर्वी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि केपीसीसी अध्यक्ष बी. के. हरिप्रसाद यांनी दिल्लीत जाऊन लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसेच एआयसीसीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि रणदीप सिंह सुरजेवाला यांच्याशी मंत्रिमंडळ विस्तार आणि पक्ष संघटनेबाबत सविस्तर चर्चा केली होती. मात्र, त्या वेळी खर्गे दिल्लीत नसल्याने अंतिम निर्णय होऊ शकला नव्हता.

दिल्लीहून परतल्यानंतर डी. के. शिवकुमार यांनी शनिवारी सकाळी सदाशिवनगर येथील खर्गे यांच्या निवासस्थानी भेट घेऊन दिल्लीतील चर्चेची सविस्तर माहिती दिली. काँग्रेस हायकमांडने मंत्रिमंडळ विस्ताराला तत्त्वतः हिरवा कंदील दिल्याचे समजते. मात्र, काही संभाव्य मंत्र्यांच्या नावांबाबत मतभेद असल्याने अंतिम यादीवर अजूनही चर्चा सुरू आहे.

शिवकुमार, सिद्धरामय्या आणि हरिप्रसाद यांनी स्वतंत्र याद्या सादर केल्या होत्या. या याद्यांतील काही नावांबाबत हायकमांडने नाराजी व्यक्त करत विशिष्ट निकष ठरवून त्यानुसार सुधारित यादी तयार करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार डी. के. शिवकुमार यांनी सुधारित प्रस्ताव तयार केल्याचे सांगितले जात आहे.

खर्गे दिल्लीला रवाना झाल्यानंतर ते राहुल गांधी, के. सी. वेणुगोपाल आणि रणदीप सिंह सुर्जेवाला यांच्यासोबत अंतिम चर्चा करणार आहेत. विद्यमान यादीवर एकमत झाल्यास मंत्रिमंडळ विस्ताराला लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. अन्यथा पुढील आठवड्यात मुख्यमंत्री शिवकुमार यांना पुन्हा दिल्लीला बोलावले जाऊ शकते.

दरम्यान, हायकमांडने मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना प्राधान्य देण्याचे संकेत दिल्याने काही ज्येष्ठ नेत्यांमध्ये नाराजीची शक्यता व्यक्त होत आहे. संभाव्य असंतोष हाताळण्यासाठीही शिवकुमार यांनी इच्छुक आमदारांशी चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

About Belgaum Varta

Check Also

गृहलक्ष्मीच्या दोन हजारांसाठी महिलांची धावपळ!

Spread the love    सणासुदीच्या तोंडावर हप्त्याची प्रतीक्षा; पडताळणीच्या कचाट्यात पात्र लाभार्थीही अडकल्या बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *